बॉलीवूड

‘श्रीदेवी बंगलो’तून श्रीदेवीच्या मृत्यूचे भांडवल

Leenal Gawade  |  Jan 16, 2019
‘श्रीदेवी बंगलो’तून श्रीदेवीच्या मृत्यूचे भांडवल

प्रिया वारियरच्या श्रीदेवी बंगलो हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सिनेमाच्या टीझरनंतरच यातील काही दृश्ये ही खऱ्या श्रीदेवीच्या आयुष्यातील असल्यामुळे बोनी कपूर यांनी या सिनेमाच्या निर्मात्याला नोटीस पाठवली होती. आणि आता श्रीदेवीचे फॅन्सही सोशल मीडियावर या चित्रपटाविरोधात प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. या सिनेमात श्रीदेवीचा जसा मृत्यू झाला तसाच चित्रपटातील अभिनेत्रीचा दाखवण्यात आला आहे. त्यामुळे श्रीदेवीच्या मृत्यूचे भांडवल करण्याचा प्रयत्न या चित्रपटातून होत आहे, असा आरोप आता श्रीदेवीचे फॅन्स करु लागले आहेत.

का चिडले बोनी कपूर ‘श्रीदेवी बंगलो’वर ?

का दुखावले फॅन्स?

श्रीदेवीच्या अकाली जाण्याने तिच्या फॅन्सना आधीच धक्का बसला आहे. तिचा मृत्यू नेमका कसा झाला असावा?  याचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही. पण आता या धक्क्यातून सावरत श्रीदेवीचे फॅन्स तिच्या जुन्या आठवणींना सोशल मीडियातून उजाळा देत असतात. श्रीदेवी बंगलो या सिनेमाच्या टीझरनंतर हा चित्रपट श्रीदेवीचा बायोपिक असेल अशी अनेकांची धारणा होती. पण काल्पनिक घटनेवर आधारीत असलेल्या या चित्रपटात नायिकेचा दाखवलेला मृत्यू हा श्रीदेवीच्या मृत्यूसारखा आहे. नायिकेचा बाथटबमध्ये  दाखवण्यात आलेला मृत्यू श्रीदेवीच्या मृत्यूसारखाआहे. जर हा सिनेमा काल्पनिक आहे तर मग या सिनेमात खऱ्या श्रीदेवीच्या मृत्यूचा प्रसंग घेणे आवश्यक नाही. पण तरीही चित्रपटात ते घेण्यात आले कारण त्यातून निर्मात्याला चांगली कमाई करायची आहे. अशा प्रतिक्रिया सोशल प्लॅटफॉर्मवरुन उमटताना दिसत आहेत.

जाणून घ्या ‘श्रीदेवी बंगलो’ संदर्भात सर्वकाही

श्रीदेवी कधीही एकटी नव्हती

एका फॅनने केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, सिनेमात श्रीदेवी एकाकी जीवन जगताना दाखवण्यात आली आहे. असे कधीच नव्हते. ती कायम तिच्या कुटुंबासोबत राहत होती. जर हा सिनेमा काल्पनिक आहे. तर मग केवळ मृत्यू खऱ्या श्रीदेवी प्रमाणे दाखवण्याची गरज काय? असा प्रश्न देखील अनेक फॅन्सनी निर्मात्याला विचारला आहे. मुळात श्रीदेवी हे नाव घेतल्यानंतर पहिल्यांदा डोळ्यासमोर उभी राहते ती दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी कपूर. हे माहीत असूनही निर्मात्याने मुद्दाम असे प्रसंग का घेतले आहेत. दाक्षिणात्य सिनेमे हे नेहमी चांगले असतात. पण केवळ नावाचा उपयोग करुन आणि खासगी आयुष्यातील काही प्रसंग घेऊन या सिनेमाने फॅन्सना मात्र नाराज केले आहे. 

निर्मात्याने दिले स्पष्टीकरण 

बोनी कपूर यांनी चित्रपट निर्माते प्रशांच माम्बुली यांना नोटीस पाठवली होती. ती नोटीस माम्बुली यांनी देखील स्विकारली. त्याला ते कोर्टात उत्तर देणार असे तर म्हणालेच. पण सिनेमात केवळ श्रीदेवी हे नाव वापरल्यामुळे सगळा गोंधळ झाला आहे. श्रीदेवी हे अगदी सर्वसाधारण नाव आहे. म्हणून ते सिनेमात घेतले आहे. सिनेमाचा आणि श्रीदेवीचा काही संबंध नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. 

प्रिया म्हणाली, वादाची कल्पना होतीच

सोशल मीडिया सेन्सेशन प्रिया वारियर या सिनेमात श्रीदेवीची भूमिका साकारत आहे. सिनेमाच्या टीझरनंतर सुरु झालेल्या वादाला ती तयार असल्याचे तिने प्रसारमाध्यमांना सांगितले. या नावाशी लोकांच्या भावना जोडलेल्या असल्यामुळे ते होणारच होते, असे म्हणत तिने चित्रपटाची पाठराखण केली आहे. पण या चित्रपटामुळे सोशल मीडिया सेन्सेशन ठरलेल्या प्रियाला कशी हा होईना प्रसिद्धी तर मिळणारच आहे.

(फोटो सौजन्य- Instagram)

Read More From बॉलीवूड