जीवन हे सुख-दुःखांचे प्रसंग सर्वांनाच भोगावे लागतात. जीवनाची वाट जशी आनंदाने भरली आहे तशी संघर्षाच्या काट्याकुट्यांनीही भरलेली आहे. भगवान कृष्ण असो वा श्रीराम जिथे परमेश्वराच्या अवतारालाही संघर्ष टाळता आला नाही तिथे माणसाने त्यापासून पळवाट का काढावी. अशा या संघर्षमयी आयुष्याच्या वाटेवर कधी यश मिळतं तर कधी अपयश… मात्र लक्षात ठेवा अपयश हे काही काळापुरतंच असतं. कारण अपयशापाठोपाठ पुन्हा यश तुमची पाठराखण करणारच असतं. फक्त गरज असते अपयशाने खचून न जाता अविरत प्रयत्न करण्याची. यासाठी कठीण काळात प्रेरणा देणारे विचार अथवा माणसं सतत तुमच्या आजूबाजूला असायला हवीत. जर तुमचे मन खंबीर असेल तर जगातील कोणतीच गोष्ट तुम्हाला कधीच हरवू शकत नाही. यासाठीच सतत मनात प्रेरणादायी विचार स्फुरत ठेवा. संघर्षावर मात करत सतत प्रयत्नरत राहण्यासाठी आम्हील तुमच्यासोबत शेअर करत आहोत. संघर्ष स्टेटस मराठी (Struggle Quotes In Marathi )संघर्ष सुविचार मराठीतून (Struggle Status In Marathi)
Table of Contents
- संघर्ष सुविचार मराठीतून | Life Struggle Quotes In Marathi
- संघर्ष स्टेटस मराठी | Sangharsh Status In Marathi
- विद्यार्थ्यांसाठी स्ट्रगल स्टेटस मराठीतून | Struggle Status In Marathi For Students
- प्रेरणादायी संघर्ष कोट्स | Inspirational Struggle Quotes Marathi
- संघर्ष शायरी मराठी | Sangharsh Shayari Marathi
संघर्ष सुविचार मराठीतून | Life Struggle Quotes In Marathi
जीवनात न हरता यशाला गवसणी घालायची असेल तर वाचा हे संघर्ष सुविचार मराठीतून ( Struggle Quotes In Marathi).
1. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वतःला खूप नशिबवान समजा. कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते.
2. कष्ट इतक्या शांततेत करा की यश धिंगाणा घालेल
3. संघर्ष करत राहा साम्राज्य एका दिवसात तयार होत नाही.
4. संघर्ष केल्याशिवाय जीवनात कोणीही यशस्वी होत नाही. जोपर्यंत छन्नीचा घाव घेत नाही तोपर्यंत दगडसुद्धा देव होत नाही.
5. संघर्षाशिवाय कधीच काहीच नवे निर्माण झालेले नाही.
6. तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. त्यामुळे विचार बदला आयुष्य बदलेल.
7. सतत लोक काय म्हणतील याचा विचार करता, कधी देव काय म्हणेल याचा विचार केला आहे का
8. जीवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करेल त्यालाच उद्याचे यश अनुभवायला मिळेल.
9. वाईट पाहणे आणि ऐकणे ही वाईट काळाची सुरूवात आहे.
10. जीवनात विशिष्ठ उंची गाठेपर्यंत सर्वांनाच संघर्ष करावा लागतो. पण एकदा अपेक्षित उंची गाठली की तुमच्या समस्या ती उंचीच सोडवते
वाचा – Best Marathi Status On Life.
संघर्ष स्टेटस मराठी | Sangharsh Status In Marathi
संघर्षाच्या वाटे ही सहज सोपी नक्कीच नसते पण या वाटेवरून चालणाऱ्याला त्याच्या आयुष्यात जगल्याचं समाधान नक्कीच मिळू शकतं. यासाठी वाचा संघर्ष स्टेटस मराठी (Struggle Status In Marathi)
1.संघर्षाच्या वाटेवर धीटाने चालत राहा कारण चालण्यामुळे एकतर तुम्हाला तुमचा मार्ग तरी सापडेल किंव्हा तुम्ही तुमचा स्वतःचा मार्ग तरी निर्माण कराल.
2. संघर्ष असा करा की विरोधकांनी पण कौतुक केले पाहिजे.
3. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा!!!
4. जीवनात याच्यासाठी तरी संघर्ष करा ज्यामुळे तुमच्या मुलांना तुम्हाला इतरांची उदाहरणे द्यावी लागू नयेत.
5. जितका मोठा संघर्ष यशही तितकेच शानदार !
6. नशिबाला मी दोष देत नाही, कारण संघर्ष करायला मी घाबरत नाही.
7. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस मात्र नक्कीच देते. तसंच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, मात्र संघर्ष करण्याची प्रेरणा मात्र नक्कीच देते.
8. संघर्ष नाही, कोणतीच समस्या नाही, मग काय अर्थ आहे जीवनाला… कारण जेव्हा मनात आग असते तेव्हा मोठ मोठी वादळंही शमतात.
9. संघर्ष हा वडिलांकडून आणि संस्कार आईकडून शिकावे. कारण बाकीचं सगळं तर दुनियाच शिकवते.
10. आयुष्य जगून समजते. वाचून अथवा ऐकून नाही.
विद्यार्थ्यांसाठी स्ट्रगल स्टेटस मराठीतून | Struggle Status In Marathi For Students
विद्यार्थी दशाही आयुष्याला कलाटणी देणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे. म्हणूनच या वयात माणूस मोठेपणी काय होणार हे ठरत असतं. विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी सुविचार वाचणे म्हणजे स्वतःमध्ये स्वतःसाठी ऊर्जा निर्माण करण्यासारखे असते. म्हणून प्रत्येक विद्यार्थी आणि युवा ने हे सुविचार वाचायला हवेत.अशा तुमच्या नाजूक वयासाठी. संघर्ष स्टेटस मराठी (Struggle Quotes In Marathi)
1. केवळ मीच माझे आयुष्य बदलू शकते. कारण माझ्यासाठी कोणीच ते करू शकणार नाही.
2. जीवनात जे मिळवायचे आहे ते मिळवा, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की, तुमच्या ध्येयाकडे जाणारा रस्ता कधी लोकांची मने दुखवणारा नसावा.
3. तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहिच दोष नाही. पण जर तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर तुमचा दोष तुमचा असू शकतो.
4. पानझडीशिवाय झाडाला नवी पालवी फुटत नाही, तशीच संघर्षाशिवाय जीवनात नवी दिशा मिळत नाही.
5. संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यात खरी लढण्याची ताकद असते.
6. ध्येय उंच असलं की झेप देखील उंचच घ्यावी लागते.
7. संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे.
8. संघर्ष करताना माणूस एकटा असतो, यशात त्याच्यासोबत सर्व असतात.
9. आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही. मात्र आपला पतंग मात्र नक्कीच नियंत्रित करू शकतो.
10. आयुष्यात अश्रूंशी संघर्ष केल्यानंतर चेहऱ्यावर उमटलेल्या हास्याइतकं सुंदर दुसरं काहीच नसते.
स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार (Swami Vivekananda Thoughts In Marathi)
प्रेरणादायी संघर्ष कोट्स | Inspirational Struggle Quotes Marathi
जगात अशी मोठमोठी माणसं होऊन गेली त्यांनी संघर्ष करून यश मिळवलं. अशा लोकांचा जीवन प्रवास आणि अनुभव सर्वांनाच प्रेरणा देणारा ठरतो. यासाठी वाचा हे अनुभवी लोकांचे Struggle Status In Marathi – संघर्ष सुविचार मराठीतून
1. उठा, जागे व्हा आणि उदिष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका – स्वामी विवेकानंद
2. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत देवही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही – स्वामी विवेकानंद
3. जिथे संघर्ष नाही तिथे प्रगती नाही – फ्रेडरिक डग्लस
4. यशासाठी संघर्ष करणं कठीण आहे पण त्याहून कठीण आहे जगण्याचा संघर्ष एन. एफ, मूनझाजर
5. सातत्य आणि संघर्षातूनच शक्ती आणि विकास निर्माण होतो – नेपोलियन हिल
6. आयुष्यात माझ्यावर सतत दगडफेक होत गेली ज्यातूनच मी मात्र त्यातून हिरे शोधले – अॅना क्लॉडिया अॅट्यूनस
7. जीवनात संघर्षाशिवाय यश नाही – विल्मा रूडाल्फ
8. जीवन संघर्ष आहे पण युद्ध नक्कीच नाही – जॉन बुरोज
9. संघर्ष आपले चरित्र बनवतो आणि चरित्र ठरवते की आपण काय बनणार – जेफ गोयन्स
10. जिथे संघर्ष नाही तिथे शक्ती नाही – ऑप्रा विनफ्रे
जगण्याला उभारी देतील या मराठी प्रेरणादायी कविता (Motivational Kavita In Marathi)
संघर्ष शायरी मराठी | Sangharsh Shayari Marathi
शायरीतून मनाच्या व्यथा सहज सर्वांसमोर मांडता येतात. अशाच काही शब्द रचना खास तुमच्यासाठी (Sangharsh Shayari Marathi) संघर्ष शायरी मराठीतून
1. ज्यांनी तुमचा संघर्ष पहिला आहे, त्यांनाच त्याची किंमत आहे. बाकिच्यांसाठी तर तुम्ही नशिबवानच आहात.
2. आयुष्य कठीण आहे पण फक्त तक्रार करून ते सोपेही होणार नाही… म्हणून सतत प्रयत्न करत राहा
3. स्वप्न ती नसतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत. स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत.
4. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे नसते, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.
5. वेळ येऊ दे फक्त उत्तरही देणार आणि हिशोबही करणार
6. प्रत्येकाला आपल्या समस्या सांगू नका, कारण प्रत्येकाकडे औषध असेलच असं नाही मीठ मात्र नक्कीच असतं.
7. कठीण काळात सतत स्वतःला सांगत राहा. शर्यत असून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही.
8. क्षमतेपेक्षा जास्त धावलो की दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायलाही दम लागतो.
9. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळं अधिक भयानक असतात.
10. जरी यशश्वी होण्याची खात्री नसेल तरी संघर्ष करण्याची धमक असली पाहिजे.
तणावातून बाहेर काढतील असे स्टेटस (Depression Status In Marathi)
Read More From xSEO
Sankashti Chaturthi Wishes, Quotes, Status In Marathi | संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
Dipali Naphade
अष्टविनायक दर्शन संपूर्ण माहिती | Ashtavinayak Darshan Information In Marathi
Vaidehi Raje