आला फायनली करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ चा ट्रेलर फायनली आला. तारा सुतारीया, अनन्या पांडे आणि टायगर श्रॉफ या नव्या विद्यार्थ्यांना घेऊन हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. पण याचा ट्रेलर पाहिला की, पहिल्याच वाक्यात तुम्हाला हसू आल्यावाचून राहणार नाही. आभासी कॉलेजच्या दुनियेवर तयार करण्यात आलेला हा दुसरा भाग म्हणजे शिळ्या कढीला उत अशी प्रतिक्रिया आल्यावाचून राहणार नाही.
दोन बायका फजिती ऐका
आता हा वाक्प्रचार इथे वापरण्याची गरज काय असे तुम्हाला वाटत असेल तर करणच्या या नव्या विद्यार्थ्यांमध्ये रंगणारी प्रेमकथा ‘दोन बायका फजिती ऐका’अशी आहे. जर तुम्हाला पहिला भाग आठवत असेल तर त्यात आलिया भटच्या मागे सिद्धार्थ आणि वरुण धवन असतात तर आताच्या भागात टायगरच्या मागे तारा आणि अनन्या आहेत. त्यामुळे प्रेमाचा हा ट्रँगल करणकडून काही सुटेनासा झाला आहे.
टायगरच्या या डान्स मुव्हज तुम्ही पाहिल्यात का?
सबकुछ फेक
हा ट्रेलर पाहिल्यानंतर पहिलीच एक प्रतिक्रिया येते ती म्हणजे असे कॉलेज आहे कुठे ? म्हणजे अशी स्पर्धा, असे कपडे, अशा गाड्या, नाच- गाणी, भांडणं आणि त्यातही कसं सगळं फॅन्सी. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलाला जीमची आवड असेल. तो फिट असेल पण टायगरसारखा सिक्स पॅक असलेला नक्कीच नसतो. म्हणजे या वयात मुलांना मिसुरडही फुटत नाही. त्यावेळात या कॉलेजमधील मुलं वेगवेगळे प्रताप करत आहेत. त्यामुळे हे सगळे फेक आहे.अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहे.
काजोल आणि अजय झाले बेघर? मुंबईत शोधत आहेत नवीन घर
कमेंट वाचाल तर लोटपोट हसाल
दुपारी १२ वाजता चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. आता करणचे चित्रपट कितीही फॅन्सी असले तरी या चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता होती कारण दोन नवे चेहरे या निमित्ताने प्रेक्षकांसमोर येणार आहेत ते म्हणजे तारा सुतारीया आणि चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे.त्यांना पापाराझींनी इन्स्टावरुन इतकी प्रसिद्धी दिली होती की, सिनेमा सुपरडुपर हिट होईल असे वाटले होते. म्हणूनच लोकांनी या ट्रेलरची वाट पाहिली. पण प्रत्यक्षात मात्र ट्रेलर इतका फुसका निघाला हे आम्ही नाही तर लोकांनीच सांगितले. लोकांनी ट्रेलरखाली अशा काही कमेंट दिल्या की, ते ऐकून तुम्ही नक्कीच लोटपोट व्हाल. खरंतरं तुम्हालाही पटेल की, ते खरंच आहे.
आलियावर पुन्हा बरसली कंगना,आता अभिनयाला केले टार्गेट
पाहा चित्रपटाचा ट्रेलर
ट्रेलरमध्ये काय आहे.
- टायगर श्रॉफच्या तोंडी ‘दिन तेरा था साल मेरा होगा’ असा डायलॉग आहे. स्टुडंट ऑफ द इयरचा किताब मिळण्यासाठी तो हा डायलॉग मारुन बोअर करत आहे.
- तारा सुतारीया म्हणजे आलियाची मोठी बहीण वाटते इतकाच फरक आहे. तिला नृत्याची आवड आहे आणि त्यातच करीअर करायचे आहे.
- भारतात मुलांना दहावी झाली की, बारावीचं टेन्शन असतं. ते होत नाही की मग ग्रॅज्युएशनचं आणि इकडे या ट्रेलरमध्ये ते सोडून सगळ्यांना स्टाईल आणि फॅशनची पडली आहे असं वाटतं.
- पहिल्या स्टुडंट ऑफ द इयरमध्ये दोन मुले एका मुलीच्या मागे होती. आता फरक इतकाच आहे की, दोन मुली एका मुलाच्या मागे लागल्या आहेत.
- एकूणच काय ‘सब मोह माया है’
जुन्या गाण्याचा केला वापर
आता इतका सगळा तामछाम छान छान गोष्टी दाखवण्यासाठी करणने केलाच आहे. तर तो गाण्यात पैसे खर्च करणार नाही असे होणार नाही. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ‘ये जवानी हे दिवानी’ हे जुने गाणे घेण्यात आले आहे. आता या गाण्याचा आधार घेऊन करण चित्रपट हिट करु पाहात असेल तर जरा कठीणच आहे.
(फोटो सौजन्य- youtube,Instagram)
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje