‘जिद्द असेल तर अशक्य गोष्टही सत्यात उतरवता येते’ हे आपण सगळेच जाणतो. पण मनी बाळगलेली स्वप्न सत्यात उतरवण्याचा जे प्रयत्न करतात तेच आपला ठसा उमटवून जातात. अशाच काही महिलांच्या यशोगाथा आज आपण जाणून घेणार आहोत. या यशस्वी उद्योजिका सांताक्रुझ येथील एस. एन. डी. टी. विद्यापीठाच्या प्रेमलीला विठ्ठलदास पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी असून या महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन लड्ढा यांनी त्यांच्या यशोगाधा POPxomarathi ला सांगितल्या आहेत. तुमच्यापैकीही अनेकींना काहीतरी वेगळे करण्याची इच्छा पण मार्ग मिळत नसेल तर तुम्हाला या यशोगाथा नक्कीच प्रेरणा देतील. मग करुया सुरुवा
कुटुंबाशी लढा देत ती झाली उद्योजिका
काजल आनंद, संचालिका, डेबॉन हर्बल्स
आता अनेक महिला उद्योजिका आहेत. पण एक काळ होता ज्यावेळी महिलांना नोकरी करण्याची तर परवानगी होती पण उद्योजिका होण्याची नाही. त्या काळात स्वत:ची जिद्द कायम ठेवली ती उद्योजिका काजल आनंद यांनी. प्रेमलीला विठ्ठलदास पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचच्या त्या विद्यार्थिनी. अभ्यासात हुशार आणि जिद्दी असल्यामुळेच त्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूमधून नोकरीची संधी मिळाली. पण लग्नानंतर अनेक गोष्टी बदलल्या. त्यांना जे मिळवायचे होते त्यासाठी घरातून पाठिंबा मिळणे शक्य नव्हते. तरीही नवऱ्याची साथ मिळवत त्यांनी कॉस्मेटिक क्षेत्रात उतरवण्याचे ठरवले. 1984 साली त्यांनी भागीदारीत कॉस्मेटिक मॅन्युफॅक्चरिंग करायचे ठरवले. याच काळात त्या आई झाल्या. पण तरीही त्या थांबल्या नाहीत. 40 दिवसांच्या मुलीला घेऊन त्यांनी कॉस्मेटिक्स मॅन्युफॅक्चरींग संदर्भात सगळे धडे गिरवले. मग काय त्या मागे कधीच वळल्या नाहीत यातूनच निर्मिती झाली DEBON HERBALS ची. आज त्याचे कॉस्मेटिक्स जगभर जातात. हा प्रवास आम्ही अगदी काही ओळींमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवला असला तरी त्या वर्षांमध्ये अनेक आव्हान काजल आनंद यांच्या समोर आली पण त्या थांबल्या नाहीत. महिला दिनाच्या शुभेच्छा पाठवून महिलांचा सन्मान या दिवशी अगदी हमखास करायला हवा
Womens Day Special : तिच्या योगदानाचा होणार सन्मान…
तुमचा आर्थिक परिस्थिती नाही महत्वाची
सूची गुप्ता, व्यवस्थापकीय संचालिका, DSA कम्फर्टसोल प्रायव्हेट लिमिटेड
कोण म्हणतं की उद्योजक फक्त श्रीमंतच होऊ शकतात. खिशात पैसा असेल तरच उद्योग करता येतो असे नाही. हे सिद्ध करुन दाखवले आहे याच महाविद्यालयातील सूची गुप्ता या मुलीने. वडील रिक्षा चालक.. बेताची आर्थिक परिस्थिती. पण त्या परिस्थितीचा बाऊ न करता सूचीने आपले शिक्षण पूर्ण केले. 2011 साली अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस हा डिप्लोमा तिने पूर्ण केला. त्यानंतर तिने काही काळ नोकरी केली. पण तिच्या मनात काहीतरी वेगळे करणे होतेच. नोकरी करता करता तिने उद्योग क्षेत्राची माहिती घेतली आणि स्वत:ची सोल कंपनी सुरु केली. आता सोल कंपनी ऐकून तुम्हाला थोडे आश्चर्य वाटले असेल. पण हो तिने चपलांसाठी आवश्यक असलेल्या सोल कंपनीची निर्मिती केली. उद्योग करावा तर असा हटके अगदी सूचीसारखा. कदाचित ही कंपनी तुम्हाला दिसायला तितकी फॅन्सी वाटणार नाही. यश मिळवण्यासाठी पैसाच लागतो असे नाही. तर जिद्द लागते.
सूचीकडून आणखी एक गोष्ट शिकण्यासारखी आहे ती म्हणजे तिने तिचा पहिला पगार हा तिच्या महाविद्यालयाला दिला. तिच्या सारख्या मुलींचे शिक्षण अर्धवट राहू नये .म्हणून तिने हे पाऊल उचलले आणि आजही ती न चुकता तिला जमेल तशी आर्थिक मदत गरीब विद्यार्थिनींसाठी करते. तिच्यामुळेच अनेक मुली त्यांचे शिक्षण पूर्ण करु शकत आहेत.
ऑनलाईन पेमेंटची रोवली मुहूर्तमेढ
प्रिती शहा, सहसंचालिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, पेस्विफ्ट
हल्ली आपण सगळ्याच गोष्टी एका क्लिकवर करतो. अगदी पैशांचे व्यवहारही आपल्याला तसेच करायला आवडतात. जर तुम्ही Payswiff हे नाव स्वाईप करणाऱ्या मशीवर कधी वाचले असेल तर त्याची सर्वेसर्वा आहे प्रिती शहा. जिने 2013 साली या कंपनीची निर्मिती केली आणि आपले जीवन सुखकर केले. प्रेमलीला विठ्ठलदास तंत्रनिकेतन महाविद्यालयातून तिने शिक्षण पूर्ण केले. त्याच महाविद्यालयात तिने काही वर्ष प्राध्यापिकेची नोकरीसुद्धा केली. कालांतराने तिने नव्या गोष्टी करण्याचा विचार केला आणि आर्थिक क्षेत्राशी निगडीत कामाची निवड केली. आधीच पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात कामाची सुरुवात करताना तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण तरीही ती मागे हटली नाही. तिने यशस्वीरित्या तिचा डोलारा सांभाळला. आज तिला स्पर्धा देण्यासाठी अनेक नव्या कंपन्या उभ्या राहिल्यात पण आजही ती या क्षेत्रात आपले नाव टिकवून आहे.
*तर या होत्या काही यशस्वी विद्यार्थिनींच्या यशोगाथा. तुम्हाला त्यांनी कामं केलेली क्षेत्रही वेगळीच वाटली असतील. तुम्हालाही उद्योजिका व्हायचं असेल तर वाट पाहू नका काहीतरी करा.
महिला दिनाच्या निमित्ताने या यशस्वी उद्योजिकांना आणि त्यांना घडवणाऱ्या प्रेमलीला विठ्ठलदास पॉलिटेक्निकल महाविद्यालयाला हॅटस ऑफ…
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.
पुढे वाचा –
Mothers Day best Quotes in Hindi
Women’s Day Quotes 2021 in English
यशाची व्याख्या सांगणारे सक्सेस कोट्स (Best Success Quotes In Marathi)
Read More From लाईफस्टाईल
Diwali Padwa Wishes, Quotes, Messages In Marathi 2022 | दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
Dipali Naphade