आरोग्य

तुमचे वजन अचानक कमी होऊ लागले आहे का

Leenal Gawade  |  Aug 17, 2021
वजन कमी होणे

वजन कमी व्हावे असे कोणाला वाटत नाही. वजन कमी करण्याची सगळ्यांची कसरत ही सुरु असते. पण काही जणांचे वजन काही केल्या कमी होत नाही. तर काही जणांचे वजन अगदी काहीही न करताही पटकन कमी होते. तुमच्या वजनातही असा फरक पडू लागला आहे का? तुमचे वजन अचानक कमी होऊ लागले आहे का? जर काहीही आणि कोणतेही कष्ट न करता जर तुमचे वजन कमी होऊ लागले असेल तर असे वजन कमी होणे ही चिंतेची बाब आहे. तुमचे वजन अचानक कमी का होते याचे कारणही जाणून घेणे तितकेच गरजेचे आहे. जाणून घेऊया अचानक वजन कमी होण्याची कारणे

कोरोना

हल्ली जिथे जावे तिथे कोरोनाबद्दल बोलले जाते. या आजाराने दोन वर्ष सगळ्यांचीच पळता भुई करुन ठेवली आहे. कोरोनाची वेगवेगळी लक्षणे आतापर्यंत दिसून आली आहे. त्यामध्ये असिम्टेमॅटिक प्रकारामध्ये वजन कमी होणे हे लक्षण देखील दिसून आले आहे. खूप जणांना कोरोना झाल्यानंतर त्यांचे वजन झपाट्याने कमी झालेले दिसून आले आहे. असे वजन कमी होणे हे अजिबात चांगले नाही. तुम्हाला कोरोनाची इतर कोणतीही लक्षणे नसतील पण तुमचे वजन दिवसेंदिवस कमी होऊ लागले असेल तर त्यामागे न दिसणारा कोरोना किंवा होऊन गेलेला कोरोना असू शकतो. असा त्रास सुरु झाला की, तुम्ही लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधे सुरु करावीत.

मधुमेह

ज्यांना मधुमेहाचा त्रास असतो अशांचे देखील अचानक वजन कमी होऊ लागते. खूप जणांना त्यांचे वजन अचानक कमी का होते हे कळत नाही. शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण बिघडले की, मधुमेहाचा त्रास होऊ लागतो. मधुमेह तुम्हाला झाला असेल तर शरीर काही संकेत देऊ लागतात. वारंवार लघवीला होणे, वजन कमी होणे असा त्रास होऊ लागतो. टाईप 1 चा डाएबिटीस झाल्यानंतर अचानक वजन कमी होऊ लागते. असे वजन कमी होत असेल तर ते अजिबात चांगले नाही. त्यामुळे मधुमेहाचा त्रास असलेल्यांनी याकडे विशेष लक्ष द्यायला हवे.

डिप्रेशन

ताणतणाव हा हल्ली वाढत चालला. ताणतणावाखाली असलेल्या लोकांचेदेखील वजन कमी होते. तणावाखाली गेलेल्या लोकांचे वजन अचानक कमी होऊ लागते. तणाव हा माणसाला आतून खंगवत असतो. जर तुम्हाला कोणत्या गोष्टीचा त्रास झालेला असेल तर तो तुम्हाला अचानक वजन कमी करण्यास भाग पाडू शकतो. काही जणांचे डिप्रेशनमध्ये वजनही वाढते तर काही जणांचे वजन कमीही होते. त्यामुळे तणाव हा एक प्रकारे अचानक वजन कमी करण्यासाठी आणि तुम्हाला वयाआधी म्हातारे करण्यासाठी कारणीभूत ठरतो.

ओव्हर अॅक्टिव्ह थायरॉईड

खूप जणांना थायरॉईडचा त्रास असतो. महिलांना होणाऱ्या या त्रासामध्ये त्यांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल घडून येतात. ज्यांना अॅक्टिव्ह थायरॉईडचा त्रास असेल तर अशांचे वजन कमी होण्यास अॅक्टिव्ह थायरॉईड कारणीभूत ठरते.  थायरॉईडग्रंथी पचनक्रिया नियंत्रणात ठेवण्याचे काम करत असते.  जर तुम्हाला थायरॉईडचा त्रास असेल तर अचानक वजन कमी होऊ शकते. धाप लागणे, खूप घाम येणे असा त्रास होऊ लागला की तुम्हाला थायरॉईडचा त्रास आहे असे समजून जावे

आता या काही कारणांमुळे तुमचे वजन अचानक कमी होऊ शकते. त्यामुळे याकडे योग्यवेळी लक्ष द्या आणि आरोग्याची काळजी घ्या.

अधिक वाचा

वजन कमी करण्याच्या प्रयत्नात हमखास केल्या जातात या चुका

स्तनावर येत असतील केस तर केस काढण्यासाठी हे आहेत योग्य पर्याय

सतत चहा गरम करुन प्यायल्याने होऊ शकतात हे नुकसान

Read More From आरोग्य