बाजारात छान कैऱ्या येऊ लागल्या की, त्यापासून चटकदार पदार्थ बनवले जातात. कैरीपासून लोणचं, मुरांबा, मेथांबा असे काही साठवणीचे पदार्थ तयार केले जातात. इतकेच नाही तर डाळ, भेळ यामध्ये मस्त कैरीचे तुकडे घातले जातात. पण तुम्हाला माहीत आहे का चैत्र महिन्यात कैरीपासून एक पदार्थ हमखास बनवला जातो तो म्हणजे आंबेडाळ… जर तुम्ही अजूनही आंबेडाळ हा चटकदार पदार्थ खाल्ला नसेल तर ही रेसिपी नक्की करुन पाहा. कारण एकदा ही डाळ चाखल्यानंतर तुम्हाला हमखास ती पुन्हा पुन्हा करुन खावीशी वाटेल. मग करुया सुरुवात
घरच्या घरी बनवा 15 मिनिट्समध्ये झटपट रव्याचे गुलाबजाम
कैऱ्यांची निवड
बाजारात कोणत्या प्रकारची कैरीवर अनेकदा आपल्या रेसिपी अवलंबून असतात. पण मी आंबेडाळ करताना अगदी कोणतीही कैरी वापरते. म्हणजे तोतापुरी, रायवळ अशा आंब्यांच्याच कैऱ्या बाजारात असतात .यापैकी कोणतीही पण चवीला आंबट असलेली कैरी आपल्याला यासाठी हवी असते. थोडी मोठी कैरी निवडा कारण ही कैरी किसणे फारच सोपे जाते. बाजारातून घेताना छान कडक कैरी निवडा म्हणजे त्याचा गर थोडा आंबट असतो.
अशी करा आंबे डाळ
आता करुया आंबे डाळच्या रेसिपीला सुरुवात
साहित्य: किसलेली कैरी, चणा डाळ, मोहरी, चवीनुसार कडिपत्ता, मोहरी,हिरव्या मिरच्या, हिंग,हळद, कोथिंबीर, साखर, तेल
कृती: कैरीच्या गराच्या साधारण दुप्पट चण्याची डाळ आपल्याला यासाठी लागते. त्यामुळे त्या अंदाजानुसार चण्याची डाळ भिजत घाला. चणाडाळ चांगली 8 तास तरी भिजवा. ज्यावेळी तुम्ही ही रेसिपी करण्यासाठी तयार असाल. त्यावेळी भिजलेली चणाडाळ, मिरच्या मिक्सरमध्ये घेऊन ते जाडसर वाटून घ्या. (चणाडाळ ही जाड वाटणेच गरजेचे आहे.) वाटलेल्या चणाडाळीच्या मिश्रणात तुम्ही अंदाजानुसार कैरी घाला. कैरी घातल्यानंतर तुम्ही हे मिश्रण खाऊन बघा. जर तुम्हाला अजून आंबट हवे असेल तर तुम्ही त्यामध्ये कैरीचा गर आवश्यकतेनुसार घाला. एका फोडणीपात्रात थोडं जास्तीच तेल गरम करुन त्यामध्ये कडिपत्ता, मोहरी, हिंग, वाटलेली कोथिंबीर, हळद घाला.तयार चुरचुरीत फोडणी कैरीच्या मिश्रणात घाला. त्यात तुमच्या आवडीनुसार साखर घाला. आंबेडाळीची चव थोडी आंबट- तिखट- गोड अशी लागायला हवी.
तुम्ही बनवलेले कांदे पोहे होतील परफेक्ट तेही दोन मिनिटात, वाचा कसे
मस्त खा आंबे डाळ
आता अनेकांना यातली डाळ कच्ची आहे त्याचा त्रास होईल असे वाटते. जर तुम्हाला अशी भीती असेल तर तुम्ही ही डाळ खाऊ नका. पण पोळीसोबत, आमटी भातासोबत ही आंबेडाळ अप्रतिम लागते. बाजारात कैऱ्या दिसल्या तर एकदा तरी ही मस्त चमचमीत आंबेडाळ करा. तुमच्या तोंडाला चव आणतील. अनेकांकडे चैत्रात असणाऱ्या कार्यक्रमांमध्ये हमखास चमचाभर वाटली डाळ दिली जाते.
आता तुम्ही करा घरच्यांनाही खावू घाला मस्त आंबा डाळ. आणि आम्हाला कळवा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.