उन्हाळ्याच्या दिवसात येणाऱ्या मराठी महिन्यांमध्ये लग्नाचे अनेक मुहूर्त असतात. या दिवसातील सुट्ट्यांमुळे अनेक जण लग्न अटेंट करण्याचा विचार करतात. उन्हाळ्यातील लग्न सुट्ट्यांच्या दृष्टिकोनातून सोयीस्कर असली तरी देखील खूप जणांना या दिवसात ड्रेसअप व्हायला खूपच कंटाळा असतो. या दिवसात उकाडा इतका असतो की, कोणतेही कपडे घालायची इच्छा अजिबात होत नाही. अशा या उन्हाळी लग्नांमध्ये तुम्ही नेमके कोणते आऊटफिट घालायला हवे जे ट्रेंडी दिसतील आणि तुम्हाला गरमही होणार नाही. चला बघुया असेच काही आऊटफिट जे तुम्हाला ट्रेंडी दिसण्यास मदत करतील. शिवाय ड्रेसना स्टायलिंग कसे करायचे ते देखील जाणून घेऊया. लग्नासाठी खास उखाणे शोधत असाल तर खास मराठी उखाणे देखील तुम्ही वाचा.
एव्हरग्रीन साडी
लग्नात साडी हा असा पर्याय आहे जो नेहमीच ट्रेंडी आणि चांगला दिसतो. पण या दिवसात काठापदराच्या साड्या नेसाव्या असे अजिबात वाटत नाही. अशावेळी तुम्ही हल्ली मिळणाऱ्या हलक्या फुलक्या डिझायनर साड्या नेसा. हल्ली शिफॉन, ऑर्गेन्झा, टिश्यू अशा मटेरिअलच्या साड्या मिळतात. या साड्या जरी काठाच्या नसल्या तरी देखील अशा साड्या दिसायला खूपच छान दिसतात. त्यामुळे लग्नात जर पहिले जर काही घालायचे असेल तर तुम्ही साडीच निवडा. या साड्या साध्या असल्या तरी देखील त्यावर हेवी ब्लाऊज घातल्यामुळे साड्या चांगल्याच दिसतात.
ट्रेंडी कुडता
खूप जणांना साडीही नेसायचा कंटाळा असतो. अशावेळी जर काही साधं पण तरीदेखील थोडं ट्रेंडी हवं असेल तर तुम्ही मस्त कुडता सेट घाला. हल्ली छान पॅटर्नमध्ये कुडते मिळतात. जे दिसायला खूपच सुंदर आणि एलिगंट मिळतात. दुसऱ्यांच्या लग्नात आपल्याला नीट वावरायचे असते. अशावेळी केवळ हेवी काही घालण्यापेक्षा मस्त असे ट्रेंडी कुडते घालावे. आता यातील फॅब्रिक निवडताना तुम्ही कॉटन निवडण्यापेक्षा सिल्कच्या कुडत्यांची निवड करावी.यात फार गरमही होत नाही.
कफ्तान
तुम्ही एकदम स्टाईल फॉलो करणारे असाल तर तुमच्यासाठी कफ्तान हा मस्त असा पर्याय आहे. कफ्तान हे दिसायला सुंदर असतात. यात गरम होण्याचा किंवा काही फिट्ट बसण्याचा प्रश्नच नसतो. कारण ते मोकळे मोकळे असतात. हल्ली इतके सुंदर डिझायनर कफ्तान मिळतात की ते इतर कोणत्याही कपड्यांपुढे उठून दिसतात. कफ्तान हा हल्ली चांगलाच ट्रेंडमध्ये आहे. त्यामुळे समर वेडिंग किंवा लग्नासंदर्भातील कोणत्याही कार्यक्रमांसाठी हा उत्तम असा पर्याय आहे.
स्कर्ट सेट
खूप जणांना ट्रेंडी दिसायचे असते पण गरम ही होऊ द्यायचे नसते. अशावेळी तुम्हाला स्कर्ट देखील घालता येतील. स्कर्ट हे दिसायला खूपच सुंदर असतात. यावर तुम्हाला लाँग किंवा शॉर्ट ब्लाऊज घालता येतो. इतकेच नाही, तर त्यावर दुपट्टा घेऊन तुम्हाला स्टायलिग करता येऊ शकते.
लग्नातील सगळ्या साध्या कपड्यांना अधिक चांगले करायचे असेल तर तुम्हाला ज्वेलरी घालून त्याला अधिक चांगला लुक देता येऊ शकेल.