बॉलीवूड

स्वराने ओढवून घेतला नवा वाद, युजर्सने दिला पाकिस्तानात जाण्याचा सल्ला

Dipali Naphade  |  Jul 14, 2019
स्वराने ओढवून घेतला नवा वाद, युजर्सने दिला पाकिस्तानात जाण्याचा सल्ला

स्वरा भास्कर आणि वाद हे समीकरण आता नवं राहिलेलं नाही. दर आठवड्यात स्वराचा कोणतातरी नवा वाद आपल्याला ऐकायला येत असतो. आता तुम्ही विचार कराल पुन्हा स्वराने काय केलं असं की, तिला युजर्सने पाकिस्तानातच जाण्याचा सल्ला दिला आहे. स्वरा कधीही आपले विचार मांडण्यापासून भीत नाही. पण यावेळी स्वराने आपले जे विचार मांडले आहेत त्यामुळे तिने पुन्हा नवा वाद ओढवून घेतला आहे आणि आता हा वाद लवकर मिटण्याची चिन्हं दिसत नाहीत. 

काय आहे नवा वाद?

स्वराने नुकतंच एक आर्टिकल शेअर करत ट्विट केलं की, भारत देश हा मुघलांचं राज्य आल्यामुळे श्रीमंत झाला. हे आर्टिकल शेअर केल्यानंतर स्वराला युजर्सने ट्रोल करायला सुरुवात केली. याआधीदेखील तिला तिच्या बोलण्यामुळे बऱ्याचदा ट्रोल करण्यात आलं आहे. पण यावेळी स्वराने जे आर्टिकल शेअर केलं त्यामध्ये लिहिण्यात आलं आहे की, मुघल भारतातमध्ये विजेता म्हणूनच आले. त्यांनी भारतामध्ये व्यापार, विकसित रस्ते, समुद्री मार्ग, बंदर आणि टॅक्स या गोष्टींना प्रोत्साहन दिलं. मुघलांच्या राज्यात हिंदू सर्वात जास्त श्रीमंत होते. पैशाची कमतरता ही ईस्ट इंडिया कंपनीच्या काळानंतर सुरु झाली. हे आर्टिकल शेअर केल्यानंतर युजर्सना आपला राग आवरता आला नाही. त्यावर एका युजरने लिहिलं की, ‘हो खरं आहे, इतका समृद्ध होता की, त्यांचे अधिकांश वंशज आता जगातील सर्वात समृद्ध देश असलेल्या पाकिस्तानात राहतात’ तर एका युजरने म्हटलं की, ‘आज तर हद्दच झाली हिने आज इतिहासातही नाक खुपसलं आहे.’ तर एका युजरने ‘ती मुघलांची चाहती आहे वाटतं, तिला भारताचा इतिहास माहीत नाही. जेएनयूमध्ये तिने शिक्षण घेतलं असल्यामुळे ही तिची चूक नाही’ असाही उपहासात्मक टोला लगावला आहे.

याआधीदेखील स्वरा बऱ्याच वेळा झाली आहे ट्रोल

Instagram

स्वरा भास्कर याआधीदेखील बऱ्याच गोष्टींसाठी ट्रोल झाली आहे. तर थोड्याच महिन्यांपूर्वी निवडणुकीमध्ये कन्हैय्याला पाठिंंबा दिल्याबद्दलही तिला ट्रोल करण्यात आलं होतं. स्वरा आपल्या मनाला जे येईल ते बोलत असते. त्यामुळे तिला नेहमीच युजर्सच्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं. पण तरीही ती अशा तऱ्हेचे ट्विट करणं थांबवत नाही. तिला काही युजर्स पाठिंबा देतात पण ट्रोल करणारेच जास्त असतात. 

थोड्याच दिवसांपूर्वी झालं ब्रेकअप

Instagram

स्वरा भास्कर नेहमीच गंभीर गोष्टींवर आपलं मत व्यक्त करताना दिसली आहे. पण जेव्हापासून हिमांशू शर्मा आणि स्वराच्या नात्याच्या ब्रेकअपची चर्चा सुरु झाली आहे. स्वराने कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. सध्या अशी चर्चा असली तरीही हिमांशू अथवा स्वरा दोघांनीही याबाबत कोणतंही स्टेटमेंट दिलेलं नाही. आपल्या भविष्याबाबत या दोघांचेही विचार वेगळे असल्यामुळे या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला असल्याचं कारण सध्या समोर आलं आहे. पण नक्की कारण काय आहे हे आता दोघेही जेव्हा बोलतील तेव्हाच सर्वांना कळू शकतं. जोपर्यंत हे बोलणार नाहीत तोपर्यंत रोज नवीन नवीन कारण समोर येत राहणार. 

सध्या ‘शीर कोरमा’मध्ये व्यग्र

स्वरा सध्या एका क्राईम थ्रिलर सिरिजमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तसंच ती अभिनेत्री दिव्या दत्ताबरोबर ‘शीर कोरमा’ मध्ये लेस्बियन असल्याची भूमिका साकारत आहे. यामध्ये या दोघी एकमेकींबरोबर रोमान्स करताना दिसणार आहेत. त्यामुळे आता स्वरा कोणत्या नवीन वादाला तर नाही ना तोंड फोडणार? याकडेही तिच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान स्वराने याव्यतिरिक्त कोणत्याही नव्या चित्रपटाची घोषणा केलेली नाही. तिच्या अभिनयापेक्षा सध्या ती अनेक वादविवादांमध्येच अडकली असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे स्वरा आता आपल्या ब्रेकअपवर काय बोलणार याकडेही तिच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 

हेदेखील वाचा 

5 वर्ष रिलेशनशिप नंतर स्वरा भास्करचं झालं ब्रेकअप!

स्वरा भास्करची आता नवी ‘स्टंटबाजी’

तापसी पन्नूला करायची आहे ‘या’ क्रिकेटरची भूमिका

 

Read More From बॉलीवूड