Fitness

रोज दही खाताय? मग तुमच्या शरीराला येऊ शकते ‘सूज’

Leenal Gawade  |  Mar 24, 2019
रोज दही खाताय? मग तुमच्या शरीराला येऊ शकते ‘सूज’

उन्हाळा सुरु झाला की, लगेच आहारात बदल केले जातात. अनेक जण जेवणात दही रोज खाण्यास सुरुवात करतात.. पण रोज दही खाणे देखील शरीरासाठी चांगले नाही. हे आम्ही नाही तर आयुर्वेद सांगत आहे. रोज दह्यच्या सेवनामुळे तुमच्या शरीराला सूज येऊ शकते. आता दही शरीराला चांगले नाही म्हणून ते दही खाणे सोडू नका. कारण दह्याचे जसे फायदे आहेत तसे तोटे देखील आहेत.दह्यामुळे शरीराला सूज येऊ शकते. त्यामुळे दही नेमके कसे, कधी खायला हवे याचेही काही नियम आहेत.

दह्याचे बदलते रुप

नव्या पिढीच्या घरी दही विरजत घालण्याच्या आठवणी फार कमी असतील.कदाचित नसतीलसुद्धा. पण माझी आई नेहमी सांगते की, त्यांच्या लहानपणी घरात खूप दूध असल्यामुळे तिची आई रोज दही विरजत खालायची. दही पटकन लागावे म्हणून ती चुलीच्या आजुबाजूला ठेवून द्यायची. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मातीच्या भांड्यात घट्ट दही यायचे. ते दही इतके गोड असायचे की, आताचे तुमचे पॅकेटबंद दही खावत नाही. आता आपण ते दही खाल्लेच नाही म्हणून आपल्याला त्या दह्याची चवच माहीत नाही. कारण आपण बाजारात जाऊन पटकन दह्याचा डबा आणतो आणि तेच दही आपल्याला आवडते. आपल्या दृष्टिकोनातून दह्याचीही  वेगळी चव असते हे आपल्याला माहीत नाही. काळानुसार दह्याचे रुप पालटत गेले आहे. आता तर बाजारात फ्लेवर्ड दही देखील मिळू लागले आहे. पण हे बंद डब्यातील दहीच शरीराला हानीकारक आहे.

व्हजायनाबाबतच्या १० गोष्टी महिलांना नक्की माहीत हव्यात

शरीराला का येते सूज?

शरीराला सूज येण्याची अनेक कारणे असू शकतात. पण जर तुम्ही सतत दह्याचे सेवन करत असाल तर याकडे अधिक लक्ष द्या.कारण त्यामुळेही शरीर सुजते. या संदर्भात आयुर्वेदात लिहून ठेवले आहे की, दही हे शरीरामधील सूक्ष्म स्रोतांमध्ये पाणी वाढवण्याचे काम करते. जर असे सातत्याने होत राहिले तर मग शरीरकोष अधिक सुजत जातात. तुमचे शरीर काटक राहात नाही. तर तुम्ही जाडजूड दिसू लागता. दह्याचा त्रास प्रत्येकाला होईलच असे नाही. पण काहींना दह्याच्या अतिसेवनानंतर हा त्रास होऊ शकतो.

जाणून घ्या जायफळाचे फायदे आणि तोटे

दह्याचे योग्य सेवन म्हणजे काय?

 १. ग्रीष्म, वसंत आणि शरद ऋतुंमध्ये दह्याचे सेवन योग्य नाही. जर तुम्हाला या ऋतुमध्ये दही खायचे असेल तर तुम्ही त्यात तूप, साखर, मुगाची डाळ, मध किंवा आवळा घालून खावे.

२. रात्रीच्यावेळी दही खाऊ नये. दही मोडूनही रात्री खाऊ नका. त्यामुळे कफ वाढून खोकला होऊ शकतो.

३.  अर्धवट लागलेले दही खाऊ नये त्याने पोट बिघडून शकते.

४. अत्यंत आबंट दही खाऊ नये. त्यामुळे पचनाचे विकार, पित्त होते.

५. सर्दी झाली असेल तरी दह्याचे सेवन करु नये असा सल्ला दिला जातो. पण त्याच दह्यात जर मिरपूड आणि गूळ मिसळून खाल्ले तर सर्दी बरी होते.

६. पोटात मुरडा आला असेल तर  गोड दह्यात शंखजिरे घालावे.लगेच आराम पडतो.

७. मुतखड्यावर दही चांगला उपाय आहे. पण दह्यात गोखारुचे मूळ घालून दही खाल्ले तर मुतखडा बरा होऊ शकतो. तुम्हाला त्यासाठी किमान सात दिवस  असे दही खावे लागेल. तर मुतखडा फुटून बाहेर पडेल.

केशराचे जसे आहेत फायदे तसे आहेत तोटे! अधिक माहितीसाठी

कोणत्या दूधाचे दही चांगले?

आता  अनेकांना प्रश्न पडला असेल की हा काय प्रश्न आहे. पण तुमच्या माहितीसाठी सांगायला आवडेल की, गाय, म्हैस वगळता बकरीच्या दुधाचेही दही लावले जाते. देशी गायीचे दही हे शरीरासाठी चांगले असते. तर म्हशीचे दूध पचायला कठीण असते त्याचप्रमाणे म्हशीच्या दुधापासून तयार केलेले दही देखील पचायला जडच असते. तर बकरीच्या दुधाचे दही पचायला हलके. असते .त्याने भूक वाढते शिवाय अशक्तपणाही कमी होतो.

(फोटो सौजन्य-Instagram)

 

 

Read More From Fitness