DIY सौंदर्य

नाक आणि कपाळ होते तेलकट, करा हे सोपे उपाय

Leenal Gawade  |  Jan 15, 2021
नाक आणि कपाळ होते तेलकट, करा हे सोपे उपाय

काहींची त्वचा इतकी छान चमकते की, ती पाहिल्यानंतर अशी त्वचा आपलीही असावे असे कायम वाटते. चेहरा तुकतुकीत आणि चकचकीत असणे हे हेल्दी त्वचेचे लक्षण आहे. पण चेहऱ्याची ही चकाचकी अधिक दिसू लागली की, त्वचा लवकर काळवंडते. विशेषत: नाक आणि कपाळ या भागावर त्वचा अधिक चकचकीत दिसू लागते. तुमचा चेहरा नीट निरखून पाहा. तुमच्या नाकावर आणि कपाळावर त्वचा अधिक तेलकट दिसत असेल तर अशा त्वचेसाठी काही खास स्किनकेअर टिप्स जाणून घेणे गरजेचे आहे. चला करुया सुरुवात

चारकोल पील ऑफ मास्क नक्की कोणी वापरावा?

चेहरा करा स्वच्छ

Instagram

तुमची त्वचा ही अशा पद्धतीने तेलकट होत असेल तर चेहऱ्याची स्वच्छता ही फार महत्वाची आहे. ज्यावेळी तुम्ही बाहेर जाता. त्यावेळी उन्हात जाणं किंवा एसीमध्ये बसणं असं बरेचदा होतं. अशावेळी कपाळ आणि नाकावर तेलकटपणा जाणवतो. चेहरा असा ओला झाला की, मेकअप जाण्याची शक्यता जास्त असते. अशा त्वचेवरील पोअर्स हे ओपन असतात. त्यामुळे घामाच्या आतून मेकअप आत जाण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तेव्हा चेहरा स्वच्छ करा. तुम्ही मेकअप केला असेल तर टिश्यू पेपरने चेहरा सतत डॅब करा. त्यामुळे चेहऱ्यावर असलेले जास्तीचे तेल टिपले जाईल आणि चेहरा चांगला दिसेल.

लावू नका तेलकट प्रॉडक्ट

तुमची त्वचा ही फक्त टी झोनमध्ये तेल असल्यामुळे तेलकट होत नाही. अशी त्वचा सर्वसाधारणपणे  मिश्र त्वचा मानली जाते. अशा त्वचेने काळजी घेण्यासाठी तेलकट प्रॉडक्टचा वापर टाळणे फारच गरजेचे आहे. तुमच्या त्वचेच्या बेसवर मॉईश्चरायझर, प्राईमर किंवा फाऊंडेशन मुळीच तेलकट लावू नका. कारण तुम्हाला जरासा घाम आला तरी देखील तुमची त्वचा अधिक तेलकट दिसू शकते. त्यामुळे मेकअप प्रॉडक्ट किंवा स्किनकेअर प्रॉडक्ट निवडताना ही काळजी घ्या. 

 मिश्र त्वचा असणाऱ्यांनी अशी घ्या काळजी (How To Take Care Of Combination Skin)

करु नका खूप मेकअप

Instagram

तुकतुकीत त्वचा  ही आधीच खूप सुंदर दिसते. अशा चेहऱ्याने फार मेकअप केला नाही तरी अशी त्वचा खूप सुंदर दिसते. जर तुम्हाला चेहऱ्यावर बेसची शक्यता नसेल तर  तुम्ही तो लावण्याची अजिबात घाई करु नका. कारण जास्त मेकअप करणे तुमच्या त्वचेसाठी हानिकारक ठरु शकते. चेहऱ्याला आवश्यक इतकाच मेकअप लावा. त्यामुळे तुमची त्वचा अधिक चांगली दिसेल. त्यामुळे मेकअप शक्यतो टाळा किंवा चांगला मेकअप निवडा.

त्वचा ठेवा हायड्रेट

त्वचा तेलकट वाटत असली तरी ती हायड्रेट ठेवणे गरजेचे असते. त्वचेचा प्रकार कोणताही असला तरी त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी चांगले फेस मिस्ट किंवा सीरम वापरा त्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. त्वचेवरील असलेला अतिरिक्त तेलकटपणा हा कमी झाला तरी त्वचेला हवे असलेले मॉईश्चर मिळते. त्यामुळे त्वचा हायड्रेट राहील याची काळजी घ्या.

टोनरचा करा वापर

टोनर हे त्वचेचे पोअर्स बंद करण्यासाठी टोनर हे फारच फायद्याचे असते. जर तुम्ही टोनरचा प्रयोग केला तर त्यामुळे त्वचा अधिक चांगली दिसते. तेलकटपणा कमी दिसतो आणि त्वचा चांगली दिसते. शिवाय तुमच्या त्वचेवरील पोअर्सचा आकारही कमी होण्यास मदत मिळते. 


आता तुम्हालाही असा त्रास असेल तर त्वचेची अशी काळजी घ्या आणि या काही टिप्स लक्षात ठेवा. 

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे कमळाचे तेल, जाणून घ्या फायदे

Read More From DIY सौंदर्य