बॉलीवूडच्या यंग ब्रिगेडमधील अभिनेत्रींमध्ये तापसी पन्नू (Taapsee Pannu)चं नाव घेतलं जातं. सध्या तापसी तिच्या आगामी चित्रपट ‘मिशन मंगल’ च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान तिने कंगनाच्या बहिणीने आणि कंगनाने केलेल्या टीकेबाबत विचारलं असता बिनधास्त उत्तर दिली.
काय आहे डबल फिल्टर प्रकरण
तापसीने काही दिवसांपूर्वी कंगनाला सल्ला दिला होता की, तिने काहीही बोलण्याआधी डबल फिल्टर लावावं. यानंतर कंगना रणौत (Kangana Ranaut) ची बहीण रंगोली चंडेल (Rangoli Chandel)ने ट्विट करत तापसीवर तिरकसपणे टिका केली होती की, काही लोकं कंगनाला कॉपी करून स्वतःचं दुकान चालवत आहेत. कारण त्यांना कोणी ओळखत नाही. एवढं की ट्रेलरमध्ये त्यांचं नाव लिहीलं जात नाही. त्यामुळे तापसीने स्वस्तातली कॉपी करणं बंद करावं. हे ट्विट प्रकरण चांगलंच गाजलं होतं.
मी कोणाचीही माफी मागणार नाही
याबाबत मीडियाशी बोलताना तापसीने सांगितलं की, मी खरंच याबाबत तिची माफी मागणार नाहीयं. मला माहीत नाही की, त्यांच्याकडे कुरळ्या केसांचं पेटंट आहे. माझा जन्म तर कुरळ्या केसांसकटच झालाय. कदाचित यात माझ्या आईवडिलांची चूक आहे. याशिवाय मला माहीत नाही की, मी काय कॉपी केलं आहे.
कॉपी म्हणवून घेणं माझ्यासाठी कॉम्प्लीमेंट
जर मी कंगनासारख्या चांगल्या अभिनेत्रीची कॉपी करत असेन तर माझ्यासाठी मीही कॉम्प्लीमेंट मानते. मी स्वतःच म्हणते की, हो, मी स्वस्तातली कॉपी आहे. कारण मी काही हायेस्ट पेड अभिनेत्री नाही. त्यामुळे तुम्ही मला स्वस्त म्हणू शकता. तसंही अशा लोकांना उत्तर देणं माझ्यासाठी महत्त्वाचं नाही.
मी फक्त मीडियाशी बोलेन
जर उत्तर द्यायचंच असेल तर मी मीडियाच्या माध्यमातून माझ्या फॅन्सना सांगू शकते की मी कोण आहे. अशाप्रकारे कंगना आणि कंगनाची बहीण रंगोलीने तापसीवर केलेल्या टिकेला तापसीने बेधडक अंदाजात उत्तर दिली.
अभिनेत्री तापसीने खूपच कमी वेळात तिच्या अभिनयाचं नाणं खणखणीत असल्याचं दाखवून दिलं आहे. तिच्या प्रत्येक चित्रपटाला चांगलीच वाहवा मिळाली आहे. मग तो पिंक असो बदला असो वा मुल्क किंवा मनमर्झिया तापसीने विविध भूमिका केल्या असून त्यांचं कौतुक झालं आहे. तिचा आगामी मिशन मंगल 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अक्षयकुमार, विद्या बालन, किर्ती कुल्हारी, सोनाक्षी सिन्हा आणि नित्या मेनन दिसणार आहेत.
हेही वाचा –
तापसी पन्नू कंगनाची स्वस्तातली कॉपी….कंगनाच्या बहिणीने पुन्हा उधळली मुक्ताफळ
शूटर आजीच्या अवतारात भूमी आणि तापसी मारणार ‘सांड की आँख’
तापसी पन्नूला करायची आहे ‘या’ क्रिकेटरची भूमिका
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje