भूलभुलैया या चित्रपटात 2007 मध्ये अक्षय कुमारच्या कॉमेडीचा तरका पाहायला मिळाला होता. बॉक्स ऑफिसवर तुफान चाललेल्या या चित्रपटाच्या लोकप्रियतेमुळे आता लवकरच त्याचा सिक्वलही केला जाणार आहे. नव्या भूल भुलैयामध्ये मात्र सध्या तरूणाईच्या गळ्यातला ताईत असलेला कार्तिक आर्यन असणार आहे. ज्यामुळे कार्तिकच्या या आगामी भूल भुलैया 2 ची चर्चा गेलं वर्षभर सुरू आहे. कार्तिकने ही त्याच्या धमाका चित्रपटाचं शूटिंग पूर्ण होताच या आगामी हॉरर कॉमेडीचं शूटिंग सुरू करणार असं ठरवलं होतं. मात्र आता निर्मात्यांनी भूल भुलैया 2 चं शूटिंग अनिश्चित काळासाठी पुढे ढकललं आहे. एवढंच नाही तर या मागचं कारण नव्याने या चित्रपटात प्रवेश केलेली तब्बू आहे असं सांगितलं जात आहे.
का पोस्टपोर्न झालं ‘भूल भुलैया 2’ चं शूटिंग
नव्या भूल भुलैया स्किवल मध्ये जुनी स्टारकास्ट नसून पूर्ण नवी स्टारकास्ट घेण्यात आली आहे. ज्यात कार्तिक आर्यन, कियारा आडवाणी आणि तब्बू महत्त्वाच्या भूमिकेत असेल. पहिल्या भूल भुलैयामध्ये आमी जो तोमर हे गाणं खूपच लोकप्रिय झालं होतं. ज्या गाण्यावर विद्या बालन थिरकली होती आणि या गाण्याला एक वेगळी ओळखच मिळाली. विशेष म्हणजे नव्या भूल भुलैयामध्येही हे हिट गाणं असणार आहे आणि त्या गाण्यावर तब्बू डान्स करताना दिसणार आहे. थोडक्यात या चित्रपटात तब्बूची भूमिका सर्वात महत्त्वाची असणार आहे. मात्र तब्बू कोरोनाच्या काळात शूटिंग करण्यासाठी तयार नाही. जोपर्यंत कोरोना महामारी पूर्णपणे नाहिशी होत नाही तोपर्यंत तब्बू शूटिंग करण्यासाठी तयार नाही. या चित्रपटात तब्बूची भूमिका महत्त्वाची असल्यामुळे निर्मात्यांनी तब्बूच्या निर्णयाचा मान राखला आहे. ज्यामुळे सध्या अनिश्चित काळासाठी भूल भुलैयाचं शूटिंग पोस्टपोर्न करण्यात आलं आहे.
तब्बूच्या निर्णयाचा राखला मान
या चित्रपटाच्या शूटिंगबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भूल भुलैया 2 चं शूटिंग मागच्या वर्षी मार्चमध्ये जयपूरमध्ये शेड्यूल करण्यात आलं होतं. मात्र अचानक लॉकडाऊन झालं आणि शूटिंग अर्ध्यावर बंद करावं लागलं.नाहीतर हा चित्रपट मागच्या वर्षी जुलैमध्ये प्रदर्शितही झाला असता. लॉकडाऊन संपल्यावर हळू हळू सर्व काही सुरळीत सुरू झालं. अनेक चित्रपट आणि मालिकांचं शूटिंग नवीन वर्षीच्या सुरूवातीला पुन्हा नव्याने सूरू करण्यात आलं. मात्र अजूनही भूल भुलैयाच्या या सिक्वलचं शूटिंग सुरू होण्याचं नाव नाही. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनीस बज्मी करत आहेत. त्यांनी कलाकार आणि शूटिंगच्या टीमला आता शूटिंग पुन्हा सुरू करण्यास सांगितलं होतं. ज्यामुळे कार्तिक आणि कियारासह सर्वांनी शूटिंगला येण्याची तयारी दाखवली. मात्र या चित्रपटातील मुख्य भूमिका असलेली तब्बू मात्र शूटिंगसाठी तयार नाही. तिच्या मते जोपर्यंत कोरोनाचा धोका कमी होत नाही तोपर्यंत ती शूटिंगला येणार नाही. ज्यामुळे आता निर्मात्यांना तब्बूसाठी शूटिंग बंद करण्याशिवाय मार्गच उरला नाही. एवढंच नाही तर यामुळे हे शूटिंग पुन्हा कधी सुरू होणार याबाबत कुणीच काही सांगू शकत नाही. तब्बूच्या निर्णयाचा निर्मात्यांनी मान तर राखला एवढंच नाही तर रागावून तिच्या बदली दुसऱ्या कोणत्याही अभिनेत्रीला कास्टही केलं नाही. ज्यामुळे भूल भुलैयाच्या सिक्वलबाबत अधिकच उत्सुकता आता चाहत्यांना निर्माण झाली आहे. कारण तब्बू सारख्या दिग्गज अभिनेत्रीच्या अभिनयाची जादू आता यामुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहता येईल.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे नाते करणार का घोषित, चर्चांना उधाण
पवित्रा रिश्तामधील या अभिनेत्यानेही उरकले लग्न, फोटो झाले व्हायरल
Good News: कपिल शर्मा पुन्हा झाला बाबा, मुलाच्या जन्माची दिली बातमी
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje