उन्हाळात सतत सुरू असलेल्या घामाच्या घारांमुळे तुमची त्वचा चिकट आणि तेलकट होते. त्वचेवरील चिकटपणा कमी करण्यासाठी त्वचा पाण्याने धुणे हा एक उत्तम मार्ग आहे. ज्यामुळे त्वचेवरील घाम निघून जातो आणि त्वचा स्वच्छ होते. मात्र सतत असं करणं शक्य नसतं. म्हणूनच घाम कमी यावा आणि फ्रेश वाटावं यासाठी अनेक जण त्वचेवर टाल्कम पावडर (Talcum Powder) लावतात. कारण टाल्कम पावडर तुमच्या त्वचेतील ओलावा आणि मॉईस्चर शोषून घेते. घामाचं प्रमाण कमी झाल्यामुळे तुम्हाला उन्हाळ्यात त्वचेवरील चिकटपणा कमी जाणवतो. असं केल्याने तुम्हाला थोडाकाळ बरं वाटत असलं अथवा त्वचा मऊ झाल्यासारखी वाटत असली तरी त्वचेसाठी असं करणं योग्य असेलच असं नाही. वास्तविक असं केल्यामुळे तुमच्या त्वचेच्या समस्या अधिकच वाढू शकतात. कारण सतत त्वचेवर असं टाल्कम पावडर लावणं मुळीच योग्य नाही. यामुळे तुमच्या त्वचेचे पोअर्स बंद होतात शिवाय त्वचेला गंभीर समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. यासाठीच जाणून घ्या उन्हाळ्यात टाल्कम पावडरच्या अती वापरामुळे तुमच्या त्वचेचं काय नुकसान होऊ शकतं.
उन्हाळ्यात सतत टाल्कम पावडर वापरणं त्वचेसाठी ठरेल घातक
बाजारात विविध प्रकारच्या टाल्कम पावडर मिळतात. ब्युटी प्रॉडक्टमध्ये टाल्कम पावडर खूप महत्त्वाची समजली जाते. त्यामुळे उन्हाळा सुरू होताच सर्वांच्या ड्रेसिंग टेबल आणि हॅंड बॅगमध्ये टाल्कम पावडरच्या बॉटलला खास स्थान मिळतं. अनेक वर्षापासून अनेकांचा असा समज आहे की टाल्कम पावडर लावण्यामुळे उन्हाळ्यात घाम कमी येतो. आता याबाबत थोड्या फार प्रमाणात जागरुकता झाल्यामुळे उन्हाळ्यात त्वचेवर टाल्कम पावडर लावण्याचं प्रमाण कमी झालं आहे. कारण सध्या त्वचेच्या समस्या अधिकच वाढताना दिसत आहेत. आणि या समस्यांसाठी करण्यात आलेल्या संशोधनात याचं मुख्य कारण उन्हाळ्यात अती प्रमाणात टाल्कम पावडर लावणं आहे असं आढळून आलं आहे.
टाल्कम पावडरचे दुष्परिणाम (Talcum Powder Side Effects)
टाल्कम पावडरचे जसे फायदे आहेत तसेच दुष्परिणामही आहेत.
त्वचा कोरडी होते
घाम कमी येण्यासाठी तुम्ही त्वचेवर सतत टाल्कम पावडर लावता. याचा परिणाम असा होतो की त्वचा अती प्रमाणात कोरडी होते. जर तुमची त्वचा तेलकट असेल तरीही त्वचेवर सतत टाल्कम पावडर लावू नका. कारण असं केल्यामुळे तुमच्या त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होतं आणि त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. अशी त्वचा संक्रमणाला लवकर बळी पडते आणि त्वचेच्या समस्या वाढू शकतात.
त्वचेला सतत खाज येते
काही वर्षांपासून याबाबत करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार जर त्वचेवर सतत टाल्कम पावडरचा वापर केला तर त्वचेला सतत खाज येते. याचं कारण टाल्कम पावडरमध्ये असे काही केमिकल्स असतात जे त्वचेच्या नाजूक भागाच्या संपर्कात आल्यामुळे त्वचेवर पूरळ येणे, त्वचा लालसर होणे आणि त्वचेवर खाज येण्याचे प्रमाण वाढू शकते.
त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढतो
काही संधोधनानुसार त्वचेच्या कर्करोगाचे हे एक प्रमूख कारण आहे. ज्यामुळे उन्हाळ्यात असं त्वचेवर सतत टाल्कम पावडर लावणं धोक्याचं ठरू शकतं. टाल्कम वापरण्यामुळे त्वचेप्रमाणे इतर कर्करोगाचाही धोका वाढू शकतो असं या संशोधनात आढळलं आहे. यासाठी टाल्कम पावडर खरेदी करताना त्यामध्ये असलेले घटक अवश्य तपासून घ्या. शिवाय शक्य असल्यास टाल्कम पावडर लावणं टाळणंच योग्य राहिल.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
मेकअप टिकवण्यासाठी सेटिंग पावडर की बनाना पावडर कशाचा करावा उपयोग
घरीच बनवा केमिकल फ्री आणि सुगंधी टाल्कम पावडर
मेकअपनंतर सेटिंग पावडर वापरणे आहे गरजेचे, जाणून घ्या कसे