xSEO

Taunting Quotes On Relationships In Marathi | नात्यांची फिरकी घेणारे मराठी सुविचार टोमणे

Leenal Gawade  |  May 19, 2022
Taunting Quotes On Relationships In Marathi

नात्यात थोडं खट्टा-मीठा असेल तर त्या नात्यामध्ये अधिक जास्त प्रेम टिकून राहते. पण काहीही म्हणा कधी कधी एकमेकांना उगाचच नाहक टोमणा मारायला तुम्हाला सुद्धा आवडते का? तर नात्यावरील मराठी टोमणे (Taunting Quotes On Relationships In Marathi) तुमच्यासाठी आहेत एकदम परफेक्ट. वाढदिवसाला भन्नाट जोक्स तुम्ही आतापर्यंत तुमच्या मित्रांना पाठवल्या असतील. पण आता आपले हटके प्रेम व्यक्त करण्यासाठी मराठी सुविचार टोमणे, Marathi Tomne Whatsapp Status,मराठी टोमणे स्टेटस, Marathi Tomne Status पाठवा. तुम्ही ज्याला पाठवता त्याला ते नक्की आवडतील यात काहीही शंका नाही.

नात्यांवरील मराठी सुविचार टोमणे | Taunting Quotes On Relationships In Marathi

Taunting Quotes On Relationships In Marathi

नाती जपायची असतील तर त्यामध्ये थोडी मजा तर असायलाच हवी. अशा मजा देण्यासाठी खास नात्यावरील मराठी सुविचार टोमणे (Taunting Quotes On Relationships In Marathi)  पाठवा. यातून त्यांना तुमची किंमत कळण्यास मदत होईल. या शिवाय एखाद्याला विश्वास देण्यासाठी विश्वास मराठी सुविचार नक्की पाठवा.

  1.  पुरुष हा लग्नाआधी वाघ असतो,
    आणि लग्नानंतरही तो वाघच असतो,
    पण लग्नानंतर दूर्गादेवी त्या वाघावर बसलेला असतो. (marathi tomne)
  2.  हे बघा मित्रांनो तुम्हाला जे काही बदलायचे असेल
    ते लग्नाआधीच बदला कारण,
    लग्नानंतर तुम्ही साधा रिमोट घेऊन चॅनेलमध्ये बदल करु शकत नाही. (marathi tomne)
  3.  संपूर्ण LIFE बदलण्यासाठी एक WIFE पर्याप्त आहे,
    पण एका WIFE ला बदलायचे असल्याच संपूर्ण LIFE ही
    अपूर्ण आहे
  4.  तुझं माझं करण्यापेक्षा,
    कधी तरी आपलं म्हणून जगायार
  5.  आपण आपल्या
    स्वत: बद्दल कधी वाईट विचार करु नका,
    कारण देवाने या कामाचा ठेका,
    नातेवाईक आणि शेजाऱ्यांना देऊन ठेवलाय
  6.  वाईट वेळ सगळ्यांवर येते आणि जाते,
    पण त्याच वेळेस कोणाते रंग किती बदलले,
    हे आयुष्यभरासाठी लक्षात राहते
  7.  माझा अनुभव हाच सांगतो,
    नेहमी शांतता चांगली,
    कारण नाजूक शब्दांनी लोक पटकन नाराज होतात
  8.  माणसाचा चेहरा बदलला तर एवढा त्रास होत नाही,
    पण त्याचा स्वभाव बदलला की, खूप त्रास होतो
  9.  आवडीचे लोक सवडीने वागायला लागले
    की, नात्याला कवडीची किंमत राहात नाही
  10.  काही माणसं ही काजव्यासारखी असतात,
    जी विनाकारण जळत राहतात (मराठी सुविचार टोमणे)

हेही वाचा – स्वार्थी माणसे स्टेटस मराठी

टोमणे स्टेटस मराठी | Marathi Tomne Status

टोमणे स्टेटस मराठी

एखाद्याला टोमणा मारायचा असेल आणि चांगल्या गोष्टी शिकवायच्या असतील तर तुम्ही टोमणे स्टेटस मराठी (Marathi Tomne Status) पाठवू शकता. जे तुम्हाला नक्की आवडतील.

  1.   माझ्या स्वभावात कधी बदल जाणवला तर वाईट वाटून घेऊ नका,
    कारण लोकांच्या मनात झालेला बदल मी मोठ्या मनाने Accept केलेला आहे
  2.  मूर्ख असल्याचे सिद्ध करण्याची एक संधी,
    प्रत्येकाला मिळते, पण काही जण त्यातही घाई करतात
  3.  दिसणं आणि असणं यातला फरक कळला,
    तर फसणं बंद होतं
  4.  एक पायरी सोडून चालणाऱ्याचे
    पाय नेहमीच दुखतात
  5.  पाय ओढण्याऐवजी
    हाताला धरुन ओढा,
    पाहा सगळेच पुढे जातील
  6.  अनुभवाने एक शिकवण दिली आहे,
    कुणाच्या चुका उणिवा शोधत बसू नका,
    नियती बघून घेईल,
    हिशेब तुम्ही करु नका
  7.  हे देवा माझा तिरस्कार करणाऱ्यांना
    दीर्घायुष्य लाभू दे,
    आणि आयुष्यभर
    माझे यश पाहून जळत राहू दे
  8.  जर मिळाली कोणाला संधी
    तर सारथी बना स्वार्थी नाही
  9.  मी लोकांचा अपमान करत नाही,
    फक्त त्यांना कुठं चुकतंय
    तेवढच दाखवून देतो
  10. आम्ही वाईटचं ठीक आहोत
    किमान चांगलं बनण्याचे नाटक तरी करत नाही

मराठी टोमणे SMS | Marathi Tomane Sms

Marathi Tomne SMS

मराठीतून बेस्ट टोमणे मारायचे असतील तर तुम्ही मराठी टोमणे (Marathi Tomane Sms) पाठवा आणि त्याचा आनंद घ्या. 

  1.  जगात खूप शोध लागले आहेत.
    पण फाटलेल्या अंडरवेअरचा तुकडा
    नेमका कुठे जातो, ते अजूनही कळत नाही
  2. म्हणतात, एकदा आपल्याला
    फसवले की, त्याच्याकडे परत कधी जायचे नसते,
    पण काय करणार सासरवाडीला जावेच लागते
  3. लोकांना डोक्यावर
    घेऊन बसू नका,
    मान लचकेल
  4.  माणूस हा स्व:तच्या चुकांसाठी
    उत्तम वकील असतो,
    आणि दुसऱ्यांच्या चुकांसाठी न्यायाधीश असतो
  5.  त्याचं ते प्रेम म्हणजे चार- पाच दिवसांनी होणारा ब्रेकअप,
    आणि आमचं प्रेम म्हणजे आयुष्यभर चालणारा सेटअप
  6.  कोणाला कोपऱ्यात सेटिंगसोबत
    फोनवर बोलताना बघा,
    तेव्हा माहीत होईल, वाघाचे मांजर कसे होते
  7.  सावध राहा या दुनियेत
    कारण येथे इच्छा पूर्ण झाली नाही तर
    देव पण बदलला जातो
  8.  हाताता कॅडबरी असताना,
    समोर आलेले बिस्किटं तुला  सोडवत नाहीत
  9.   रांगोळीत रंग आणि नाकावर राग,
    काही बोलायले गेले की, ओकायची आग
  10.  विचार असे मांडा की,
    समोरच्याने तुम्हाला म्हटलं पाहिजे
    की, चल उठ इथून

मराठी टोमणे वॉट्सअप स्टेटस | Marathi Tomne Whatsapp Status

Marathi Tomne Whatsapp Status

मराठी टोमणे हे एकदम झक्कास असतात. त्यातून ओठांवर हसूही येते आणि त्यातून काहीतरी शिकताही येते. अशावेळी तुम्ही मराठी टोमणे वॉट्सअप स्टेटस (Marathi Tomne Whatsapp Status) पाठवू शकता. जे तुम्हाला नक्कीच आवडतील.

  1.  चला मतदानानाच्या निमित्ताने हे कळलं की
    किती मुली या 18 वर्षांच्या झाल्या आहेत ते
  2. या जगात एकच गोष्ट सोपी आणि साधी आहे,
    ती म्हणजे दुसऱ्याला नाव ठेवणे
  3.  हल्ली चांगल्या कामाला
    मांजरापेक्षा माणसेच
    जास्त आडवी येतात
  4.  गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना
    कधीच  कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुराद घेता येत नाही
  5.  सल्ला नेहमी स्पष्ट वक्त्यांकडून घ्यावा,
    गोडबोल्यांकडून नाही
  6.  सगळेच प्रश्न सोडवून सुटत नसतील
    तर काही सोडून द्या ते आपोआप सुटतात
  7.  कधी लोक चपलासारखे असतात,
    साथ देतात, मग मागून चिखल उडवतात
  8.  जग खूप सुंदर आहे,
    पण मी नालायक आहे
  9.  लाखमोलाचा सल्ला मला देणाऱ्याला
    मी कोट्यवधीचा सल्ला देतो
  10.  काही लोकं टोमणे इतके चांगले मारतात
    की असे वाटते त्यांनी या विषयात स्पेशलायझेशन केलेले आहे

मित्रमैत्रिणींसाठी खास मराठी टोमणे | Marathi Tomane For Friends

Marathi Tomane For Friends

तुमच्या मित्र-मैत्रिणी असतातच खास त्यामुळे त्यांनी काही चुकीचे केले की त्यांना बोलायलाच हवे. पण चांगल्या शब्दात त्यांना उत्तर द्यायचे असेल तर पाठवा मित्रमैत्रिणींसाठी खास मराठी टोमणे (Marathi Tomane For Friends)

  1.  पोरंग बाहेरगावी राहतंय,
    मग काय मजाच असणार असे म्हणणाऱ्यांना
    एक महिना मेसचं सक्तीचं जेवण द्या,
    मग कळेल 10 रुपयांचा वडापाव एवढा फेमस का आहे
  2.  Girlfriend पेक्षा एक मैत्रीण बरी,
    जी  स्वत: फोन करुन आपली चौकशी तरी मनापासून करते
  3.  पापाचा घडा भरला की,
    तो घडा बाजूला काढा आणि ड्रम लावा,
    कारण तुम्ही काहीही सुधारण्यामधले नाही
  4.  साल्या तू माझा मित्र नसतास ना
    तर तुला इतका फुकट जगू दिले नसते मी
  5.  काही माणसं लाखात एक असतात,
    आणि काहींकडे लाख असले तरी
    माणसात नसतात
  6.  मुलींमध्ये काहीही नसले तरी
    Attitude हा कुट्टून कुट्टून भरलेला असतो.
     
  7.   स्वत:ची गर्लफ्रेंड नाही, पण दुसऱ्यांना गर्लफ्रेंड पटवण्याचे
    सल्ले देणाऱ्या त्या हलकट मित्रानेच तुमचे आयुष्य खराब केले आहे विसरु नका
  8.  एक विनंती आहे..
    दूरच जायचे असेल तर
    जवळच येऊ नका,
    Busy सांगून टाळायचं असेल
    तर वेळच देऊ नका
  9.  काही गोष्टी वेगळ्या सिद्ध करायला लागत नाहीत,
    उदा. स्वत:चा ‘मूर्खपणा’
  10.  काही माणसं कामाला ठेवली आहेत
    पाठीमागे बोलण्यासाठी
    पगार शून्य आहे पण काम,
    इमानदारीने करतात

बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडसाठी मराठी टोमणे | Marathi Tomane For Girlfriend

Marathi Tomane For Girlfriend

बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडचं नातं एकदम खट्टा-मीठा असते. त्यांच्या नात्यातील गोडवा टिकून राहण्यासाठी. बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडसाठी मराठी टोमणे (Marathi Tomane For Girlfriend) पाठवा.

  1.  लग्न म्हणजे
    जादूचा प्रयोग,
    त्यात प्रेयसीची बायको होते,
    आणि प्रियकराचा नवरा
  2.  सुंदर मुलीच्या प्रेमात  पडणारे सगळेच संसारात यशस्वी
    होतात असे नाही, पण जीवन सुंदर बनवणाऱ्या मुलीच्या प्रेमात
    पडणारे 100 % यशस्वी होतात
  3.  माझ्याकडे आहे मस्तानी,
    बाकीच्या मुलींनी जा आपल्या रस्त्यांनी
  4.  ब्लाॅक केल्याने नाती काही संपत नाहीत,
    पण DP तेवढा दिसत नाही
  5.  जर लग्नानंतर भांडीच घासायची आहेत,
    तर लग्न करायचं कशाला, आई पण घरी भांडी
    घासायलाच लागते
  6.  सिंगल राहणं हे कारल्यासारखं कडू असतं,
    पण ते आरोग्यासाठी चांगलं असतं
  7. फसवून प्रेम कर,
    पण प्रेम करुन फसवू नकोस
  8.  आता फुलंच गुलाबाचं आवडलं असेल,
    तर काटे तर लागणारचं ना
  9.   झुकतो नात्यांसाठी,
    नाहीतर चुकीचा कालही नव्हतो आणि आजही नाही
  10.  प्रेम तर दोघांचही आहे एकमेकांवर,
    पण फरक एवढाच आहे की, माझं जरा जपून आणि तुझं लपून आहे

आता तुमच्या आवडीच्या व्यक्तिला प्रेमाचा अलगद टोमणा देण्यासाठी पाठवा असे मस्त मराठी टोमणे Taunting Quotes On Relationships In Marathi

Read More From xSEO