प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकाचे महत्त्वाचे स्थान असते. आपल्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचे काम नेहमीच शिक्षक करत असतात. आपल्या भविष्याला आकार देण्याचेही काम शिक्षक करतात. आपल्या आयुष्यात असे काही शिक्षक असतात ज्यांचा आपल्यावर खूपच जास्त प्रभाव असतो. हेच नाते आपल्या बॉलीवूडमधील काही चित्रपटांमधूनही दर्शविण्यात आले आहे. अनेक चित्रपटांनी आपल्याला शाळा आणि कॉलेजची आठवण करून दिली आहे. चित्रपटांमधून आपल्याला कडक शिस्तीचे शिक्षकही दिसले तर काही ठिकाणी असेही शिक्षक दिसले ज्यांना पाहून आपल्याही आयुष्यात असे शिक्षक असायला हवेत असं वाटलं. 5 सप्टेंबर (5 September) हा शिक्षक दिन (Teachers Day) म्हणून साजरा केला जातो. आपणही नेहमीच या दिवशी आपल्या शिक्षकांना शुभेच्छा देत असतो. तर यावेळी आपण बॉलीवूडमधील काही खास चित्रपटांबद्दल जाणून घेऊया.
अधिक वाचा – एकता कपूरची मराठमोळी ‘कुसुम’ शिवानी बावकर
परिचय, 1972
परिचय (Parichay) हा एक असा चित्रपट आहे, जो विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील नाते अत्यंत संवेदनशील पद्धतीने दर्शवितो. यामध्ये रवी अर्थात जितेंद्र (Jeetendra) हा हिरो असून पाच मुलांना शिकविण्याची जबाबदारी घेतो. पाच मुलांमध्ये सर्वात मोठी रमा अर्थात जया बच्चन (Jaya Bachchan) आपल्या भावा-बहिणींसह खूपच मस्ती करताना यामध्ये दाखविण्यात आले आहे. रवी या पाचही मुलांना शिकवतोही आणि त्यांच्यातील नात्यांचा उलगडाही सुंदररित्या करतो. तुम्ही जर हा चित्रपट पाहिला नसेल तर तुम्ही नक्कीच या टिचर्स डे ला हा चित्रपट पाहायला हवा.
इकबाल, 2005
इकबाल (Iqbal) एका अशा मुलाची कथा आहे ज्याला क्रिकेटर व्हायचे आहे आणि आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी हट्टाने शिक्षकाकडून शिकून घेतो. श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि नसिरुद्दीन शाह (Nasiruddin Shah) यांनी साकारलेल्या या भूमिका प्रेक्षकांच्या कायमस्वरूपी लक्षात राहण्यासारख्या आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यामधील नाते नक्की कसे असावे, विश्वास कसा असावा आणि शिक्षक जे सांगत आहे ते आपल्या चांगल्यासाठीच आहे हा सार्थ विश्वास यातून दिसून येतो. लहान गावातील एका मुक्या मुलाच्या संघर्षाबद्दल ही कथा आहे. शिक्षक आणि विद्यार्थी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकत्रितपणे प्रत्येक अडचणीला सामोरे जातात आणि परिस्थिती कितीही कठीण का असेना पण त्याला तोंड देता आलंच पाहिजे ही शिकवण या चित्रपटाने खूपच चांगली दिली आहे.
अधिक वाचा – मुलगी झाली हो’… अभिनेत्री स्मिता तांबे झाली आई
ब्लॅक, 2005
हेलन केलर आणि तिच्या शिक्षकावर आधारित चित्रपट ब्लॅक (Black) ही केवळ कथाच नाही तर राणी मुखर्जी (Rani Mukerjee) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या अभिनयाने हा परिपूर्ण चित्रपट आहे. संजय लीला भन्सालीच्या कलाकृतींपैकी अप्रतिम असणारा हा चित्रपट नक्कीच पाहायला हवा. जेव्हा विद्यार्थाच्या विकासाची गोष्ट असते तेव्हा शिक्षकाची जबाबदारी ही केवळ चार भिंतींमध्येच नाही तर प्रत्येक सीमा ओलांडून न्याय देण्यासाठी कोणत्याही थराला जाऊन विद्यार्थ्याला साथ द्यावी लागते. अत्यंत भावूक आणि संवेदनशील असे हे विद्यार्थी शिक्षकाचे नाते या चित्रपटातून दर्शविण्यात आले आहे.
तारे जमीन पर, 2007
ही एका अशा मुलाची कथा आहे ज्याला डिस्लेक्सिया आहे. आई वडील या स्पर्धेच्या जगात मुलांवर त्यांना समजून घेण्याऐवजी दबाव टाकतात आणि त्यामुळे मुलांवर त्याचा काय परिणाम होतो हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. मुलाला हॉस्टेलमध्ये टाकल्यानंतर तिथे आलेला शिक्षक रामशंकर निकुंभ अर्थात आमिर खान (Amir Khan) त्याला कशा प्रकारे समजून घेतो आणि ईशानला यातून बाहेर काढण्यासाठी कसा प्रयत्न करतो हे पाहण्यासारखे आहे. मुलांवर दबाव न टाकता कोणत्या मुलांमध्ये कोणते गुण लपले आहेत हे शोधण्याची जबाबदारी शिक्षकाची असते आणि तेच या चित्रपटातून दाखविण्यात आले आहे. शिक्षकाने समजून घेतल्यानंतर ईशानमध्ये होत जाणारे बदल हे नक्कीच वाखाखण्याजोगे असतात.
अधिक वाचा – शनाया कपूरला पाहून म्हणाले ही तर दुसरी अनन्या पांडे
हिचकी, 2018
अनेक चित्रपटांमधून विद्यार्थ्यांचे संघर्ष दाखविण्यात आले आहेत. पण ही कथा अशा शिक्षिकेची आहे जिला आपल्या शिक्षिका या पेशासह न्याय करण्यासाठी स्वतःमधील दोष दूर करायचे आहे. राणी मुखर्जीने या चित्रपटात अप्रतिम काम करून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. नैना माथुर ही व्यक्तिरेखा राणी अक्षरशः जगली आहे. शिक्षिका होण्याचे स्वप्न असूनही टॉरेट सिंड्रोम या विकारामुळे तिला सतत उचक्या लागत असतात. त्यामुळे शाळेतील मुलं तिची टर उडवतात. तर तिला अशाच मुलांना शिकविण्याचे काम देण्यात येते जी अतिशय मस्तीखोर आहेत. पण नैना त्या मुलांची मदत करते आणि त्यांना शिकवून आदर्श शिक्षिका बनते आणि आपले लक्ष्य मिळवते. त्यामुळे या चित्रपटाच्या कथानकासाठी आणि अभिनयासाठी नक्कीच या टिचर्स डे ला तुम्ही हा चित्रपट पाहावा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade