मनोरंजन

नवरात्रीच्या फोटोशूटच्या फक्त तयारीसाठी तेजस्विनीला लागले 27 तास

Aaditi Datar  |  Oct 7, 2019
नवरात्रीच्या फोटोशूटच्या फक्त तयारीसाठी तेजस्विनीला लागले 27 तास

नवरात्रीतील नऊ दिवस तेजस्विनी पंडितचे देवीच्या लुकमधील फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच गाजतायत. हे फोटो पाहिल्यावर फोटो काढायच्या आधीची प्रचंड मेहनत लक्षात येतेय. नवरात्रीच्या दिवसांमध्ये एक कल्पना घेऊन त्याभोवती नऊ दिवसांचे फोटोशूट करण्याचा एक नवा ट्रेंड अभिनेत्री तेजस्विनी पंडितने सुरू केला. असे फोटोशूट करण्याचं तेजस्विनीचं हे तिसरं वर्ष आहे.

तेजस्विनीचा अनोखा ट्रेंड

तेजस्विनी या फोटोशूटबद्दल सांगताना म्हणाली की, “पहिल्या वर्षी फोटोशूट करताना आपण असा काही ट्रेंड सुरू करावा. असं मनात नव्हतं. त्यावेळी ब-याच कालावधीपासून मनात असलेली खदखद मांडावी, एवढंच डोक्यात होतं. आणि त्यावेळी मनाला भिडलेल्या सामाजिक प्रश्नांवर एक फोटोशूट केलं. दुस-या वर्षी प्रत्येक दिवसाचं वेगवेगळ्या नऊ देवींच महात्म्य फोटोशूटव्दारे मांडलं. तर यंदा तिस-या वर्षी एक नागरिक म्हणून भेडसावणा-या काही सामाजिक मुद्द्यावर आपल्या पध्दतीने भाष्य करावं, असं मला वाटलं.”

कलाकार आणि त्यांची मतं

एका कलाकाराच्या नजरेतून या फोटोशूटबद्दल सांगताना तेजस्विनी म्हणाली की, “बरेचदा कलाकार हा टिकेचा विषय असतो. आम्ही मत नाही मांडलं तरीही टिका होते आणि मत मांडलं तरीही. आम्ही आजकाल बऱ्याचदा ट्रोलही होतो. पण फोटोशूटव्दारे जेव्हा मी काही मुद्दे मांडले तेव्हा माझ्यावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव झाला, याचा मला आनंद आहे.”

नवीन ट्रेंडची सुरूवात

तेजस्विनीने असे फोटोशूट केल्यावर अनेक अभिनेत्रींनी आणि तिच्या चाहत्यांनीही असे फोटोशूट करायला सुरूवात केली. एका अर्थाने तेजस्विनी नवरात्री फोटोशूटमध्ये ट्रेंडसेटरच ठरली. तेजस्विनी या नव्या ट्रेंडबद्दल सांगताना म्हणाली की, “नवरात्री म्हणजे फक्त नऊ रंगाच्या कपड्यांमध्ये फोटो न काढता आता अनेकजणं कल्पकतेने काही नवं करत आहेत, याचा मला आनंद आहे. अनेक लोकं मला सोशल मीडियावर टॅगही करतात. अशावेळी खूप छान वाटतं.”

प्रत्येक लुकमागची मेहनत

तेजस्विनीच्या यंदाच्या फोटोशूटला पाहिल्यावर त्यामागे असलेली प्रचंड मेहनत दिसते. याबद्दल विचारलं असता ती म्हणाली की, “माझ्या संपूर्ण टीमच्या मेहनतीचं आणि कल्पकतेचं हे फलित आहे. प्रत्येक फोटोसाठी मला मेकअप करून तयार व्हायलाच सुमारे तीन तास लागायचे. त्यानंतर फोटो काढून त्यावर व्हीएफक्ससाठी पूढचा अडीच दिवस लागायचा. असे आम्ही नऊ फोटोशूट केले. ही प्रक्रिया खूप रंजक होती.”

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

हेही वाचा –

सणासुदीसाठी आले तेजाज्ञाचे ‘दागिना कलेक्शन’

नवीन रुपात येणार रंगीला

कोरिओग्राफर रेमो डिसूझा अडकला तिसऱ्यांदा विवाहबंधनात

Read More From मनोरंजन