आरोग्य

कोविड वॅक्सिन घेतल्यावर का येतात हातातून वेदना, जाणून घ्या कारण

Trupti Paradkar  |  Jul 21, 2021
कोविड वॅक्सिन घेतल्यावर का येतात हातातून वेदना, जाणून घ्या कारण

कोरोना व्हायरसला मात देण्याचा सोपा मार्ग म्हणजे लवकर कोविड वॅक्सिनचे डोस घेणं. मात्र कोरोना वॅक्सिन घेतल्यावर एक ते दोन दिवस भयंकर साईड इफेक्ट्स जाणवतात. काही लोकांना तीव्र ताप येतो, अंग दुखतं, थकवा जाणवतो, डोकं दुखू लागतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणज ज्या हातावर लस घेतली आहे त्या हाताला वेदना होतात. काही जणांचा  हात तर अक्षरशः सूजतो आणि प्रचंड दुखतो. मात्र काही लोकांना वरीलपैकी कोणतेच लक्षण दिसून येत नाही मात्र त्यांचाही हात मात्र नक्कीच दुखतो. म्हणजे थोडक्यात वॅक्सिन घेतल्यावर प्रत्येकाचा हात दुखतोच. यासाठीच जाणून घेऊ या कोविड लसीकणानंतर हात दुखण्याची काय आहेत कारणे

कोविड वॅक्सिननंतर हात का दुखतो

कोविडची लस घेतल्यावर हात दुखणे या इनफ्लैमटरी साईड इफेक्टला कोविड आर्म असं म्हणतात. खरंतर वॅक्सिन जस जसे तुमच्या शरीरात उतरत जाते तस तसे तुम्हाला काही साईड इफेक्ट्स जाणवू लागतात. प्रत्येकाला येणारे अनुभव ते त्यांची आरोग्य समस्या, आरोग्य स्थिती, प्रतिकार शक्ती आणि वयोमान यावर अवलंबून आहे. मात्र लस घेतल्यावर प्रत्येकाला हात दुखण्याचा अनुभव हा येतोच. लस घेतल्यावर हातही दुखला नाही असं कोणालाच होत नाही. 

काही जणांचा हातत तर या काळात इतका दुखतो की त्यांना हात हलवणे, वर करणे, कोणतेही काम करणे शक्य होत नाही. लस दिल्यावर काही काळ तुमचा हात ज्या ठिकाणी लस टोचली आहे त्या ठिकाणी बधीर होतो. तज्ञ्जांच्या मते कोविड लसीकरणानंतर हात दुखणे हे एक सामान्य लक्षण असून त्यामुळे तुमच्या आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. मात्र यामुळे एक ते दोन दिवस तुमच्या दिनक्रमात व्यत्यय येण्याची शक्यता नक्कीच आहे. तुमचे शरीर लस कशी स्वीकारते यावर तुमच्या शरीरावर दिसणारे साईड इफेक्ट्स अवलंबून आहेत. 

हात दुखल्यावर असा करा घरगुती उपाय

जेव्हा तुम्ही लस टोचून घेता तेव्हा तुमच्या शरीरावर छोटे छिद्र निर्माण होते. शरीराला हा संदेश पोहचतो आणि जसं शरीराचा एखादा अवयव कापल्यावर अथवा जखम झाल्यावर परिणाम होतो तसा परिणाम दिसू लागतो. शरीर रक्तवाहिन्यांना त्या ठिकाणी प्रतिकार शक्तीच्या रक्तपेशी पोहचवण्याचा संदेश देते. या प्रक्रियेमध्ये तुमच्या इम्युन सेल्स मध्ये दाह निर्माण होतो भविष्यात याचा फायदा तुम्हाला कोविड संक्रमण टाळण्यााठी होणार असतो. लस घेतल्यावर होणाऱ्या या परिणामाला वैद्यकीय भाषेत रिएक्टोजनेसिटी असं म्हणतात. लस लिक्विड स्वरूपात असल्यामुळे शरीरातील मांसपेशींमध्येही काही काळ दाह होतो.. कोविड वॅक्सिन घेतल्यावर हाताला खाज येणे अथवा सूज येणे हे  लक्षणही जाणवू शकते. मात्र ही सर्व लक्षणे फक्त एक ते दोनच दिवस जाणवतात. जर तुम्हाला आठवडाभर असा त्रास जाणवत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला  याबाबत घेणं गरजेचं आहे. लसीकरणानंतर तुमच्या शरीरात अॅंटि बॉडीज तयार होणार आहेत त्यामुळे काही बदल शरीरात जाणवणारच. यासाठीच लस घेतल्यावर एक ते दोन दिवस चांगला आराम करा. हात सूजला असेल तर बर्फाने हात शेकवा. ज्यांनी अजून लस घेतली नाही आहे त्यांनी न घाबरता लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करा. 

 

 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

काय आहे वॅक्सिन पासपोर्ट, कसा करावा उपयोग जाणून घ्या माहिती

कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर होऊ शकतात हे त्रास, काळजी करु नका

तुम्हालाही वाटते का इंजेक्शनची भीती, जाणून घ्या नीडल फोबियाविषयी

Read More From आरोग्य