Care

कोंडा असण्याची असतील 5 कारणं तर करा ‘हे’ सोपे उपाय

Dipali Naphade  |  May 2, 2019
कोंडा असण्याची असतील 5 कारणं तर करा ‘हे’ सोपे उपाय

तुमचा ड्रेसिंग सेन्स कितीही सुंदर का असेना किंवा तुमचा मेकअप अगदी परफेक्ट असला तरीही या सर्वांवर नेहमी तुमच्या केसातील कोंडा (Dandruff) नेहमीच पाणी फिरवत असतो. काही जणींना कोंड्याचा इतका त्रास असतो की, काहीही आणि कितीही उपाय केले तरीही कोंडा जात नाही. मग अशावेळी तुम्ही नक्की काय करता? पार्लरमध्ये जाऊन खूप पैसे घालवून येता का? असं केल्यानंतरही तुमच्या केसातील कोंडा कमी होत नाही? मग काय करायचं पुढे? असे अनेक प्रश्न उभे राहतात. पण उपाय नक्की काय हे कधीच कळत नाही. पण आता त्याची चिंता करण्याची अजिबातच गरज नाही. कारण आम्ही तुमच्यासाठी काही खास उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कोंड्यापासून सुटका मिळेल. जाणून घेऊया काय आहेत नक्की हे उपाय –

कोरड्या आणि गळत असलेल्या केसांसाठी सोपे उपाय – Dandruff Treatment in Marathi

ड्राय स्कॅल्प (Dry Scalp)

तुमच्या डोक्याची त्वचा जर कोरडी असेल तर त्याचा कोरडेपणा अधिकाधिक वाढत जातो. ही सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळे डोक्यात कोंडा होण्याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे तुमची कोरडी त्वचा. सर्वात आधी तुम्हाला कोंडा का होतो हे जाणून घ्यायला हवं आणि मग त्याचा उपाय करायला हवा.

यावरील उपाय – कोंड्यासाठी तुम्ही नेहमी मॉईस्चराईजिंग शँपूचा वापर करणं आवश्यक आहे. टी ट्री ऑईल आणि मेंथॉलदेखील तुमच्या केसांसाठी चांगलं आहे. केसांमध्ये मुलायमपणा आणण्यासाठी हे जास्त चांगलं आहे. Oraganix Hydrating Tea Tree Mint शँपू यासाठी खूपच उपयुक्त आहे. त्यामुळे या शँपूचा वापर करून पाहा.

रोज रोज शँपू (Over Usage of Shampoo)

तुम्हाला ही गोष्ट अजिबात नाही करायची आहे. कारण यामुळे स्कॅल्पचा कोरडेपणा वाढवू शकतो. पण तुम्ही वेळेवर शँपू न केल्यासदेखील तुमच्या केसातील कोंडा वाढू शकतो.

यावरील उपाय – सात दिवसांपैकी रोज शँपू करता केवळ 3 ते 4 वेळा शँपू करा. कोंड्याच्या उपचारांसाठी सर्वात पहिले हीच गोष्ट करा.

ऑयली ग्लँड्स (Oily Glands)

सकाळी शँपू केला तरीही रात्री केस मात्र तेलकट. कारण तुमच्या केसांमध्ये ओव्हरअॅक्टिव्ह ऑयली ग्लँड्स असतात. त्यामुळे तुम्हाला रोज शँपू लावावा लागतो. रोज शँपू लावला तर कोंडा आणि केसगळती या दोन्ही समस्या.

यावरील उपाय – अँटीडँड्रफ शँपू हा कोंड्यावरील सर्वात चांगला उपाय आहे. त्यासाठी तुम्ही Kerastase Specifique Bain Exfoliant Hydratant शँपूचा वापर करू शकता. तसंच रोज तुमच्या केसांना मसाज आणि रोज तेलकट खाणं हे टाळा.

हे फंगसदेखील असू शकते

आपल्या डोक्याच्या त्वचेमध्ये नैसर्गिक फंगस असतो. जो आपल्या त्वचेच्या स्ट्रक्चरचा एक भाग आहे. कधीकधी या फंगसमुळे अधिक त्वचेचे सेल्स निर्माण होतात. ज्याचं रूपांतर नंतर डेड स्किनमध्ये होतं.

यावरील उपाय – अशा परिस्थितीत कोंड्यावरील उपायासाठी अँटीफंगल डॅमेज कंट्रोल शँपू वापरायला हवा. जिंक प्य्रिथिओन बेस्ड शँपू अधिक चांगले. अधिक अँटी फंगल, अँटी बॅक्टेरियल आणि अँटी डँड्रफ शँपूमध्ये तुम्हाला हेच घटक आढळतील. याशिवाय तुम्हील Head & Shoulders Smooth and Silky Shampoo चा वापर करू खता. याशिवाय अलोविरा बेस्ड शँपू आणि अलोविरा फंगस, बॅक्टेरिया आणि कोंडा दूर करण्याचा अचूक उपाय आहे.

मर्यादा ओळखायला हव्या

स्टायलिश दिसणं आवश्यकच आहे. पण केसांंचं नुकसान होईपर्यंत नाही. त्यामुळे तुमच्या नक्की मर्यादा काय आहेत हे जाणून घ्या. तुम्ही केसांवर केलेले अनेक प्रयोग आणि रसायनयुक्त उत्पादन हे तुमच्या केसांना खूपच नुकसानदायी आहे.

यावरील उपाय – तुम्हाला जितकं शक्य आहे, तितका नैसर्गिक उत्पादनांचाच वापर करा. सल्फेट आणि पैराबॅनसारख्या रसायनयुक्त उत्पादनांचा वापर करणं टाळा. Kama Ayurveda’s Lavender Patchouli Hair Cleanser यासाठी तुम्हाला उपयुक्त ठरू शकतं.

फोटो सौजन्य – Shutterstock

हेदेखील वाचा – 

केस धुताना करू नका या ‘7’ चुका

कोंडा का होतो आणि कशी सुटका मिळवावी

पांढरे केस काळे करण्यासाठी करा हे ‘5’ सोपे आणि नैसर्गिक उपचार

Read More From Care