मनोरंजन

‘या’ बॉलीवूड अभिनेत्री एकेकाळी होत्या ‘बालकलाकार’

Trupti Paradkar  |  Mar 8, 2020
‘या’ बॉलीवूड अभिनेत्री एकेकाळी होत्या ‘बालकलाकार’

बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी बालकलाकार म्हणून चित्रपटात पदार्पण केलं. यामध्ये श्रीदेवी, ऊर्मिला मातोंडकर, आएशा टाकिया या अभिनेत्रींचा समावेश आहे. या अभिनेत्रींनी ज्याप्रमाणे लहाणपणी बालकलाकार म्हणून लोकप्रियता मिळवली त्याचप्रमाणे मोठं झाल्यावरही त्यांना बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली. यासाठी जाणून घ्या कोणत्या बॉलीवूड अभिनेत्रींनी बालकलाकार म्हणून सुरू केली अभिनयाला सुरूवात. 

श्रीदेवी (Shridevi) –

श्रीदेवीने तिच्या करिअरची सुरूवात बालकलाकार म्हणून केली होती. चार वर्षांची असताना तिने एका तामिळ चित्रपटात काम केलं होतं. कंदन करूनाई  (Kandan Karunai) असं या चित्रपटाचं नाव होतं. हिंदी चित्रपटातदेखील श्रीदेवीने लहान असताना काम केलं होतं. रानी मेरा नाम, ज्युली अशा चित्रपटात तिने काम केलं होतं. या चित्रपटातील अभिनयामुळे तिला सतत नवनवीन कामाच्या संधी मिळत गेल्या. मोठेपणी तर तिच्या सौंदर्य आणि अभिनयाचे अनेक चाहते निर्माण झाले. तिच्या अभिनयामुळे अनेक चित्रपट हिट झाले. ज्यामुळे श्रीदेवी बॉलीवूडची सुपरस्टार झाली. 

Instagram

ऊर्मिला मातोंडकर (Urmila matondkar) –

ऊर्मिला मातोंडकर ने तिच्या करियला अगदी लहानपणीच सुरूवात केली होती. हिंदी चित्रपटसृष्टीत ‘कलियुग’ या चित्रपटातून ती लहानपणीच झळकली होती. पुढे ‘मासूम’ या हिंदी चित्रपटातून ऊर्मिलाला खरी ओळख मिळाली. या चित्रपटातील लकडी की काठी, काठी पे घोडा हे गाणं आजही प्रसिद्ध आहे. ऊर्मिलाने आतापर्यंत मराठी, हिंदी, तमिळ, तेलूगु, मल्याळम अशा अनेक चित्रपटातून काम केलं आहे. बॉलीवूडमध्ये आपल्या सौंदर्यांने घायाळ करणारी अभिनेत्री म्हणून तिने नावलौकिक मिळवा. 

Instagram

आलिया भट (Alia bhatt) –

आलिया भटने ‘संघर्ष’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून पदार्पण केलं होतं. या चित्रपटात अक्षय कुमार, प्रिती झिंटा आणि आशुतोष राणा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्यानंतर आलियाने करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ दी इयर’ या चित्रपटातून प्रमुख भूमिका करत अभिनेत्री म्हणून ओळख मिळवली. 

Instagram

सना सईद (Sana saeed) –

सना सईदने ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली. शाहरूख खान, राणी मुखर्जी आणि काजोलची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात तिने शाहरूखच्या मुलीची भूमिका केली होती. या चित्रपटातील अंजली प्रेक्षकांना फार आवडली होती. त्यानंतर तिने बादल, हर दिल जो प्यार करेगा अशा चित्रपटांमधून काम केलं होतं. सनानेही करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ दी इयर’ या चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका साकारली होती. 

Instagram

आएशा टाकिया (Ayesha takia) –

‘टारझन दी वंडर कार’ या चित्रपटातून आएशा टाकिया हे नाव घराघरात पोहचलं. मात्र आएशाने लहानपणीच अभिनय क्षत्रात पदार्पण केलं होतं. आयशाने अनेक जाहिरातींमधून काम केलं आहे. कॉम्पलॅन या हेल्थ ड्रिंकच्या जाहिराती मधून आएशाचा चेहरा परिचयाचा झाला. 

Instagram

हंसिका मोटवानी – (Hansika motwani)

हंसिका मोटवानीने लहानपणी ‘शाका लाका बूम बूम’ या हिंदी मालिकेतून अभिनयाला सुरूवात केली. पुढे ‘क्योंकी सॉंस भी कभी बहू थी, सोन परी, करिश्मा का करिश्मा, हम दो है ना अशा अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. तिने लहानपणी ‘कोई मिल गया’ या चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटात ह्रतिक रोशन आणि प्रिती झिंटा प्रमुख भूमिकेत होते. पुढे मोठी झाल्यावर हंसिकाने आपका सुरूर या चित्रपटात अभिनेत्री म्हणून महत्त्वाची भूमिका साकारली. आतापर्यंत ती विविध हिंदी आणि साऊथ चित्रपटातून झळकली आहे.

Instagram

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

हे ही वाचा –

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

अधिक वाचा –

या बॉलीवूड कलाकारांनी चित्रपटातील भूमिकेसाठी स्वतःच्या वजनात केले असे बदल

Baaghi 3: अॅक्शनचा भडिमार, दिशाहीन दिग्दर्शन…पदरी निराशा

चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी झळकणार वेबसीरिजमध्ये

Read More From मनोरंजन