Combination Skin

तुमच्या या सवयी बिघडवतील तुमचे सौंदर्य, वेळीच व्हा सावध

Dipali Naphade  |  Apr 30, 2020
तुमच्या या सवयी बिघडवतील तुमचे सौंदर्य, वेळीच व्हा सावध

तुमच्या काही सवयी तुमच्या चेहऱ्याचं सौंदर्य बिघडवू शकतात असं जर तुम्हाला कोणी म्हटलं तर खरं वाटेल का? पण हे खरं आहे. तुम्हालाही जर वाईट सवयी असतील तर त्या लवकर बदला. नाहीतर तुमच्या या सवयी तुमच्या सौंदर्यासाठी घातक ठरू शकतात. पण नक्की अशा या कोणत्या सवयी आहेत हेदेखील आता तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना? तर त्या आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या सवयी जाणून  घ्या आणि त्या वेळच्या वेळी बदलण्याचा प्रयत्न करा. 

सतत चेहऱ्याला हात लावणे

बऱ्याचदा आपल्याच चेहऱ्याला सतत हात लावण्याची काही महिलांना सवय असते. पण या सवयीमुळे आपल्या हाताला लागलेली धूळ, माती, बॅक्टेरिया, तेल आणि घाम या सगळ्याने त्वचासंंबंधित समस्या सुरू होतात. आपल्या कळत नकळत आपणच आपल्या चेहऱ्याची काळजी घेणं विसरून जातो. ही सवय सुधारून तुम्ही तुमच्या त्वचेच्या समस्या स्वतःच कमी करून शकता. तुमचं सौंदर्य या कारणाने जास्त बिघडतं. त्यामुळे सतत चेहऱ्यावर हात लावण्याची सवय तुम्ही सोडून द्या. 

मुरूमं फोडणे

Shutterstock

बऱ्याचदा चेहऱ्यावर आलेले मुरूम आपल्याला नकोसे वाटत असतात. पण त्याचा अर्थ ते फोडायला हवेत असा नाही. तुम्हाला जर चेहऱ्यावर आलेले मुरूम फोडायची सवय  असेल तर त्यामध्ये असणारे बॅक्टेरिया हे त्वचेच्या आत जातात आणि चेहऱ्यावर अधिक काळे डाग पडतात. तुम्हाला जर तुमचा चेहरा डागविरहित हवा असेल तर तुम्ही प्युरिफाईंग फेस मास्क लावा. तसेच रात्री झोपण्यापूर्वी मुरूमांना टूथपेस्ट लावा. त्यामुळे मुरूमं निघून जातील आणि तुम्हाला ते फोडण्याची सवयही राहणार नाही. 

चेहऱ्यांवरील मुरुमांपासून कशी होणार सुटका – घरगुती उपाय, आहार आणि बरंच काही

सतत साबणाने चेहरा धुणे

Shutterstock

मुलायम आणि सुंदर त्वचा हवी म्हणून काही महिला सतत आपला चेहरा साबणाने धुतात. पण ही सवय चांगली नाही. सतत  साबणाने चेहरा धुतल्याने नैसर्गिक स्वरूपात चेहऱ्याला सुरक्षा देणारे तत्व हे निघून जातात. ज्यामुळे तुम्हाला सरबर्न, कोरडी त्वचा आणि अकाळी सुरकुत्या येणे यासारख्या समस्या उद्भवतात. आपल्या त्वचेनुसार क्लिन्झरचा वापर करा आणि दिवसातून दोन ते तीन वेळाच चेहरा स्वच्छ धुवा. 

 

जुना मेकअप ब्रशचा वापर

Shutterstock

बऱ्याचदा काही मुली या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत की, त्यांचा मेकअप ब्रश हा जुना झाला असून त्याचाच वापर केला जात आहे. हा ब्रश ना कधी स्वच्छ केलेला असतो ना बदललेला असतो. त्यामुळे त्याचा वाईट परिणाम त्वचेवर होतो. ब्रश सतत वापरल्याने त्यावर उत्पादनाचा एक थर जमा होत असतो. त्यामुळे बॅक्टेरिया आणि फंगस निर्माण होते. यामुळे चेहऱ्यावर इन्फेक्शन होण्याची भीतीही असते. याशिवाय अशा घाणेरड्या ब्रशने मेकअप केल्यामुळे तुमच्या चेहऱ्याला हवे तसे फिनिशिंगदेखील मिळत नाही. त्यामुळे आपला ब्रश आठवड्यातून एकदा तरी स्वच्छ करण्याची सवय तुम्हाला असायला हवी. 

महागड्या मेकअप ब्रशऐवजी वापरा या गोष्टी

सनस्क्रिन लोशन न लावणे

बऱ्याच महिला घराबाहेर जाताना सनस्क्रिन लोशन लाऊन जात नाहीत. असं करणं ही वाईट सवय आहे. तुम्ही लोशन न लावल्याने तुम्ही स्वतःच्या स्वतःच्या त्वचेकडे दुर्लक्ष करत आहात हे लक्षात घ्या. रोज घरून निघण्यापूर्वी तुम्ही चांगल्या एसपीएफयुक्त सनस्क्रिन लोशनचा वापर करायला हवा. तसंच तुम्ही मॉईस्चराईजरदेखील लावायला हवे. अन्यथा तुमचे नैसर्गिक सौंदर्य बिघडायला वेळ लागणार नाही. 

कोरड्या त्वचेला म्हणा Bye… करा असे 6 घरगुती उपाय

मेकअप रिमूव्ह न करणे

Shutterstock

मेकअप न काढता अर्थात रिमूव्ह न करता तसेच राहणे ही चांगली सवय नाही. कारण जर त्वचेवरून मेकअप काढला नाही तर तुमची त्वचा नीट श्वास घेऊ शकत नाही. मेकअप त्वचेच्या अगदी कणांत रूतून राहतो आणि त्यामुळे त्वचेवर काळे डाग पडणे यासारख्या समस्या निर्माण होतात.  त्यामुळे तुम्ही झोपण्यापूर्वी मेकअप रिमूव्ह करायलाच हवा. तुम्ही ही सवय लाऊन घेणे अत्यंत आवश्यक आहे. 

मेकअप साफ करण्यासाठी परफेक्ट रिमूव्हर्स, तेदेखील तुमच्या बजेटमध्ये

जास्त एक्सफोलिएट करणे

तुम्हाला जर तुमची त्वचा सतत एक्सफोलिट करण्याची सवय असेल तर हे तुमच्या सौंदर्यासाठी घातक आहे. एक्सफोलिएट करण्याने डेड सेल्स निघून त्वचा चांगली होते हे खरं असले तरीही सतत केल्याने तुमची त्वचा खरखरीत होऊन तुम्हाला रेडिश त्वचेची समस्या निर्माण होऊ शकते. निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी केवळ 1-2 वेळा एक्सफोलिएट करणंच योग्य आहे. 

Read More From Combination Skin