Care

केसांना कलर करण्याआधी जाणून घ्या या महत्वाच्या गोष्टी

Leenal Gawade  |  Jan 5, 2020
केसांना कलर करण्याआधी जाणून घ्या या महत्वाच्या गोष्टी

ग्लोबल कलर, हेअर हायलाईट्स पाहिल्यानंतर आपल्यालाही हेअर कलर करण्याची इच्छा होते. जर तुम्हालाही केसांना रंग करण्याची किंवा केसांवर असा रंगप्रयोग करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला काही गोष्टी माहीत करुन घेण्याची गरज आहे. कारण इतर कोणाचेही केस पाहून तुम्ही जर हेअर कलर करणार असाल तर तुम्हाला मी माझा अनुभवसुद्धा सांगणार आहे. केसांना रंग केल्यानंतर नेमकं काय होतं? तुम्हाला काळजी कशी घ्यावी लागते  हे सगळं सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही हेअर कलर करण्याआधी हे वाचा आणि मगच हेअर कलर करण्याचा निर्णय घ्या.

तुमच्या केसांसाठी हा हेअर स्पा ठरु शकतो वरदान

तुम्ही हेअर कलर का करत आहात?

shutterstock

एक काळ होता. ज्यावेळी केस पांढरे झाल्यानंतरच केसांना रंग केला जात होता. पण आता अगदी कॉलेजमधील मुलीसुद्धा केसांना कलर करतात. आता तो ट्रेंडच झाला आहे असे असले तरी तुम्ही कशासाठी केसांना कलर करणार आहात हे  आधी तुम्हालाच माहीत हवे. उदा. तुम्हाला तुमच्या लुकमध्ये बदल करण्यासाठी कलर करायचा असेल तर तुम्ही अगदी दोन ते तीन स्ट्रिप हायलाईट करु शकता. कारण त्यामुळे तुम्हाला अपेक्षित असलेला बदल मिळेल. तुम्हाला तुमचे पांढरे केस लपवायचे असतील किंवा तुमची पूर्णच पर्सनॅलिटी बदलायची असेल तर तुम्ही तुमचे संपूर्ण केस ग्लोबल करु शकता. जर तुमचे लग्न असेल अशावेळी हेअरस्टाईल उठून दिसण्यासाठी तुम्ही तुमच्या केसांना हायलाईट करु शकता. 

केसांची अशी घ्यावी लागते काळजी

shutterstock

केसांना एकदा रंग केल्यानंतर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे हे अगदी ठरलेले असते. तुम्ही कोणत्याही चांगल्या कंपनीचा रंग वापरला असेल तरीसुद्धा तुम्हाला केसांची काळजी घ्यावी लागते. केसांना रंग केल्यानंतर तुम्हाला खास शॅम्पू आणि कंडिशनर दिला जातो. त्यामुळे तुमच्या केसांना आवश्यक असलेले पोषक घटक मिळतात. तर कंडिशनरमुळे तुमचे केस चांगले राहतात. त्यामुळे तुम्हाला शॅम्पू आणि कंडिशनर लावणे फारच गरजेचे असते. 

कलर हेअरची स्टाईल टिकवण्यासाठी वापरा ‘हे’ 15 बेस्ट शॅम्पू

केसांच्या या समस्या असतात ठरलेल्या

shutterstock

 आता तुम्ही केसांवर प्रयोग करणार आहात म्हटल्यावर तुम्हाला केसांसंदर्भात तक्रारी तर होणारच. केसांना रंग लावल्यानंतर तुमचे केस कोरडे होतात. केसांना फाटे फुटतात. तुमच्या केसांची योग्य काळजी घेतली नाही तर तुमचे केस तुटण्याची शक्यता जरा जास्त असते. जर तुम्ही तुम्हाला सांगितलेला शॅम्पू किंवा कंडिशनर वापरला नाही तर तुमचे केस तुम्हाला रुक्ष वाटू लागतात. ट्रिटमेंट केलेल्या केसांना योग्यवेळी स्पा करणेही गरजेचे असते. त्यामुळे तुमच्या केसांमध्ये मॉश्चर टिकून राहतं. त्यामुळे या समस्या लक्षात घेत तुम्हाला केसांची काळजी घ्यावी लागते. 

रंगाची निवड महत्वाची

shutterstock

तुम्ही हेअर कलर करण्याचे फायदे, तोटे आणि काळजी कशी घ्यावी हे वाचल्यानंतर जर तुम्हाला केसांना हायलाईट किंवा ग्लोबल करायचे असेल तर तुमच्यासाठी रंग निवड ही देखील महत्वाची आहे. तुमच्या पर्सनॅलिटीला शोभणारा रंग तुम्ही निवडायला हवा. तुमच्या कामाचे स्वरुपही तुम्ही लक्षात घ्यायला हवे. अनेकदा ब्लाँड हा रंग केसांना केला जातो. पण हा रंग सगळ्यांनाच चांगला दिसत नाही. शिवाय त्याची काळजी घेणे फारच गरजेचे असते. आता तुम्हाला रंग निवडायचा म्हणजे नेमकं काय करायचं असा प्रश्न पडला असेल तर एक्सपर्टची मदत घ्या. साधारण ब्राऊन, डार्क ब्लाँड, बर्गंडी, मरुन असे काही रंग चांगले दिसतात. हे रंग फार लाऊड दिसत नाहीत तर ते तुमच्या पर्सनॅलिटीला शोभून दिसतात. पण तुम्हाला कोणता रंग चांगला दिसेल ते तुम्ही एक्सपर्टला विचारा.

 

माझा अनुभव

मला ग्लोबलपेक्षाही हेअर हायलाईट करण्याची इच्छा होती. मी साधारण वर्षभरापूर्वी अचानक हायलाईट्स केले. माझ्या स्किनटोनसाठी त्यांनी मला ब्लाँड स्ट्रिप्स करायला सांगितले. ब्लाँड हा रंग येण्यासाठी त्याने माझ्या केसांवर तो रंग थोडा जास्त वेळ ठेवला. त्यामुळे माझे केस ब्लाँड न होता माझी मागची एक बट पांढरीच झाली. आता ते केस मागे असल्यामुळे मला ते फार दिसलं नाही.  काही काळासाठी केस चांगले दिसत होते. पण नंतर नंतर माझे केस कोरडे पडू लागले. त्या ठराविक केसांच्या बटांचा गुंता होऊ लागला. हा गुंता इतका असह्य होता की माझे केस तुटू लागले. तो रंग मला इतका आवडेनासा झाला की, मला ग्लोबल करावे लागले. पण त्यानंतर झालेले कोरडे केस निस्तरण्यासाठी मला प्रत्येक शॅम्पू नंतर कंडिशनर लावणे फारच गरजेचे असते. केसांच्या साधारण कानापासून खाली मी कंडिशनरचा उपयोग करायला सुरुवात केली आणि त्यानंतर माझे केस थोडे मुलायम आणि ग्लॉसी दिसू लागले. पण मला प्रत्येकवेळी केस धुताना कंडिशनर हे वापरावेच लागते.

आता रंग करण्याचा तुमचा विचार पक्का झाला असेल तर मग चांगल्या सलोनमध्ये जा. पण या सगळ्या गोष्टींचा विचार नक्की करा. 

Split Ends ची समस्या करायची असेल दूर तर वापरा मेयोनीज

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा https://www.popxo.com/shop/zodiac-collection/

Read More From Care