एखादे नाते नवीन असते तेव्हा त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची ओढ असते. नवीन प्रेमात पडल्यानंतर जोडीदाराला सतत भेटावेसे वाटते. त्याच्यासोबत राहावेसे वाटते. पण जसजसे नाते जुने आणि विश्वासाचे बनते तसे आपण एकमेकांना कमी वेळ देऊ लागतो. एकमेकांना थोडासा वेळ हा नात्यात देणे गरजेचेच असते त्यामुळेच एकमेकांची किंमतही राहते. पण असे करताना कधीकधी अनाहूतपणे आपण जोडीदाराचे मन दुखावतो याची आपल्याला जाण राहात नाही. एखादे नाते म्हटले की, काही गरजा या आल्याच पण नेमकं अंतर देताना या गरजांचाही खूप वेळा आपल्याला विसर पडतो. आता या गरजा म्हणजे केवळ पैशांनी खरेदी केलेली सुख नाहीत. तर प्रत्येक मानवाच्या असलेल्या काही भावनिक गरजा जोडीदाराकडून पूर्ण होणे गरजेचे असते. जाणून घेऊया नात्यात असताना कोणत्या गरजांची असते जोडीदाराला अपेक्षा
रिलेशनशीपमध्ये गैरसमज होतायत? मग या गोष्टी तुम्हाला माहीत हव्या
अपुऱ्या वेळेमुळे तक्रारी
नात्यातील पहिली गरज असते तो म्हणजे जोडीदाला वेळ देणं. याच गोष्टीचा खरा विसर पडल्यामुळे सगळ्या समस्या निर्माण होतात. आधी सतत सोबत असणारा जोडीदार अचानक येणं कमी झालं किंवा बंद झालं की मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे रोज नाही पण जोडीदाराला शक्य असेल तेवढा वेळ देण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराच्या मनात काय सुरु आहे याची जाणीव तुम्हाला हवी तरच तो तुम्हाला योग्य समजता येईल. कधीकधी जोडीदाराचा मूड फिस्कटला की, ती तुम्हाला चिडचिड वाटू लागते. पण ती चिडचिड नाही तर तुमच्या कमीपणाची जाणीव त्याला होऊ लागल्यामुळे त्यांना हा त्रास होतो याचा आपल्याला विसर पडतो. ही गरज प्रत्येकाची असते. जसे तुम्हाला जोडीदाराला भेटायची इच्छा असते तसेच त्यालाही आहे. कधीतरी त्याच्या म्हणण्यानुसारही काही गोष्टी होऊ द्या.
भांडण आणि गैरसमज
खूप वेळा आपण जोडीदार केवळ भांडखोर आहे असे म्हणून काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. पण तो पर्यंत भांडणं आणि गैरसमजांचे ढग अधिक जमा झालेले असतात. जर तुम्ही पहिल्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले तर त्याचे रुपांतर भांडणात होऊ लागते. ही भांडणं कधी रुद्र रुप घेतील सांगता येत नाही. त्यामुळे जर जोडीदार तुम्हाला वेळ देण्यावरुन सतत बोलत असेल तर तुम्ही त्याची गरज ओळखा आणि त्याच्यासाठी वेळ काढा
ब्रेकअपमधून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला आहे या गोष्टींंची गरज (How To Deal With Breakup)
हातात हात घेऊन फिरणं
नात्यामध्ये थोडे प्रेम असावे असे प्रत्येकाला वाटते. आपला जोडीदार काही कारणास्तवर इतरासंमोर दाखवता येत नसेल. पण ज्यावेळी नाते अधिकृत होते. त्यावेळी तरी जोडीदाराने नाते सगळ्या जगासमोर आणावे असे वाटते. अशावेळी साधी अपेक्षा असते ती म्हणजे चार चौघात हात पकडून आपल्या जोडीदारासोबत चालता यावे. पण जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केले तरी जोडीदाराची चिडचिड होऊ लागते. नात्यामध्ये विश्वास निर्माण होण्यासाठी या काही गोष्टी कारणीभूत असतात ज्या तुम्ही कराव्यात अशी अपेक्षा असते.
सेक्सकडे करु नका दुर्लक्ष
नात्यामध्ये सेक्स आलेच. लग्न झाले नसेल तर ही गोष्ट इतकी महत्वाची नाही. पण नाते ज्यावेळी लग्नबंधनात बांधले जाते. त्यावेळी शारीरिक गरजा देखील आल्या. प्रत्येकाच्या काही शारीरिक गरजा असतात . त्या पूर्ण करणे गरजेचे असते. जर त्या गरजा पूर्ण होत नसतील तरी देखील अशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नात्यात सेक्सच्या गरजा पूर्ण होत नसेल तर तुम्ही या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या कारण त्यामुळे नात्यात नाहक तणाव येऊ शकतो.
नात्यातील या गरजांकडे मिळूच दुर्लक्ष करु नका.
१० गोष्टींतून मुली व्यक्त करतात प्रेम, जाणून घ्या या गोष्टी (Signs That She Loves You In Marathi)