घर आणि बगीचा

घरात गुडलकसाठी खरेदी करत असाल विंड चाइम तर लक्षात ठेवा या गोष्टी

Trupti Paradkar  |  May 16, 2021
घरात गुडलकसाठी खरेदी करत असाल विंड चाइम तर लक्षात ठेवा या गोष्टी

फेंग शुई वास्तू शास्त्रानुसार घरात विंडचाईम (Wind Chime) लावणं हे गुडलकचं प्रतीक असतं. कारण विंडचाईममधून सतत मंजूळ ध्वनीची निर्मिती सतत होत राहते. ज्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. जर तुम्ही संगीत प्रेमी असाल तर विंड चाईममधून निघणारा मंजूळ ध्वनी तुमच्या मनाला शांत करतो. ताणतणावापासून दूर राहण्यासाठी घरात विंड चाईम लावण्याचा चांगला फायदा होऊ शकतो. सहाजिकच विंडचाईमच्या या अफलातून फायद्यांमुळे बाजारात विविध प्रकारच्या विंडचाईम विकत मिळतात. मात्र या निरनिराळ्या आकर्षक विंडचाईममधून घरासाठी योग्य विंडचाईम खरेदी करणं कधी कधी फारच कठीण वाटू शकतं. यासाठीच काही गोष्टी तुम्हाला विंडचाईम खरेदी करण्यापूर्वी माहीत असायला हव्या. 

विंडचाईम खरेदी करताना

विंडचाईम खरेदी करताच वास्तूनुसार होणारे फायदे आणि तोटे तुम्हाला मिळण्यास सुरुवात होते. यासाठीच विंडचाईम खरेदी करताना सावध राहा. कारण बाजारात जरी विविध स्टाईलच्या विंडचाईम विकत मिळत असल्या तरी गुडलकसाठी नेहमी 6, 7, 8 अथवा 9 पाईप असलेल्या विंडचाईम खरेदी करणं शुभ मानलं जातं. यानुसार 5 पाईप असलेली विंडचाईम खरेदी करणं अशुभ मानन्यात येतं. याशिवाय विंडचाईमचे पाईप पोकळ असावे कारण जर ते भरीव असतील तर त्यातून योग्य ध्वनी निर्माण होत नाही. यासोबतच एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा फार लहान अथवा फार मोठी विंड चाईम खरेदी करू नका. चांगल्या परिणामासाठी मध्यम आकाराची विंडचाईम विकत घेणे फायदेशीर ठरेल.

विंड चाईमची दिशा

घरात सुखसमृद्धी कायम असावी असं वाटत असेल तर विंड चाईम लावताना दिशा योग्य असेल याची काळजी घ्या. वास्तविक प्रत्येक दिशेला स्वतंत्र महत्त्व असतं, त्यामुळे विंड चाईम योग्य दिशेलाच लावायला हवी. जर तुम्ही लाकडाची विंड चाईम लावणार असाल तर ती पूर्वेकडे  लावा. दक्षिण -पश्चिमेला विंड चाईम लावायची असेल तर ती मातीची असावी, उत्तर अथवा उत्तर-पश्चिमेला विंड चाईम लावताना ती धातूपासून तयार केलेली असेल असं पाहा.

तुटलेली विंड चाईम का लावू नये

विंड चाईममुळे घरात गुलडक यावं असं वाटत असेल तर चुकूनही घरात तुटलेली विंड चाईम ठेवू नका. ज्याप्रमाणे आपण घरात भंगलेली मुर्ती ठेवत नाही अगदी तसंच घरात तुटलेली विंडचाईम ठेवणं मुळीच शुभ नसतं. यासाठी विंडचाईम खरेदी करताना ती व्यवस्थित चेक करून मगच विकत घ्या. ज्यामुळे तुमच्या घरातील विंडचाईम जास्त काळ टिकेल. शिवाय जर काही कारणांमुळे ती तुटली तर लगेच ती बदलण्यास विसरू नका.

शेजाऱ्यांचा करा विचार

जर तुम्हाला तुमच्या घरात विंडचाईम लावायची असेल तर इतर अनेक गोष्टींचा विचार करायला हवा. जसं की विंडचाईमच्या आवाजामुळे तुमच्या शेजाऱ्यांची झोपमोड होणे. कारण  असं झालं तर तुमच्या घरात सुख समृद्धी येईल मात्र दररोज शेजाऱ्यांची वाद घालावा लागेल. यासाठी इतरांना त्रास होणार नाही अशा प्रकारे विंडचाईम घरात लावा. 

आम्ही शेअर केलेल्या या वास्तूटिप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला जरूर कळवा. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

मनाला शांत ठेवण्यासाठी फॉलो करा या वास्तू टिप्स

घरावर लक्ष्मीकृपा व्हावी म्हणून फॉलो करा या वास्तू टीप्स – Vastu Tips for Wealth in Marathi

घरातील बाथरूमच्या रचनेबाबत काय सांगतं वास्तूशास्त्र

Read More From घर आणि बगीचा