आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार हे नक्कीच असतात. कोणाचंच आयुष्य अगदी आनंदी असं नसतं. बऱ्याचदा काही कारणांमुळे आपल्या आयुष्यात इतकं नैराश्य येतं की, अजिबातच जगावंसं वाटत नाही. हा क्षण नक्कीच प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो. पण म्हणून आयुष्य थांबत नाही. अशावेळी नक्की आपण काय पाऊल उचलायचं आणि काय विचार करायचा हे आपल्याच हातात असतं. तुम्ही अशावेळी काय गोष्टी करायला हव्यात हे आम्ही तुम्हाला सांगतो. आयुष्य खूप सुंदर आहे फक्त विचार चांगले असायला हवेत. नैराश्यातून तुम्हाला जर बाहेर यायचं असेल तर तुम्ही आम्ही सांगितलेल्या या गोष्टी हमखास करून पाहा. तुम्हाला नक्कीच आनंद मिळेल आणि तुमची नैराश्यातून सुटकादेखील होईल. तसंच तुम्हाला असं जास्त प्रमाणात जाणवू लागलं तर वेळीच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. कारण यामध्ये वाईट असं काहीच नाही. तुम्ही चुकीच्या मार्गाला लागण्यापेक्षा वेळीच योग्य मार्ग अवलंबा आणि आनंदी होण्याच्या दिशेला वाटचाल चालू करा. जाणून घेऊया नक्की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी उपयुक्त ठरतील.
गाणं ही गोष्ट आहे जी तुमचा मूड क्षणात बदलू शकते. पण त्यातही तुम्ही उदासवाणी गाणी न ऐकता थोडी पेप्पी आणि आनंददायी गाणी ऐकलीत तर तुमचा मूड लगेच बदलू शकतो. गाण्याचे शब्द आणि संगीत मनाला खूपच आनंद देतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही निराश असाल तुम्ही नक्कीच गाण्याची साथ घ्या. संगीताने तुमच्या मनातील नकारात्मक विचार दूर सरून एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे तुमचा मूड फ्रेश होतो. नकळत एखादं माहीत नसलेलं गाणं ऐकलंत तर तुमचा मूड अधिक चांगला होतो कारण तुम्हाला त्याचं संगीत आणि शब्दही माहीत नसतात अशावेळी मनाला अशी गाणी भावतात आणि तुम्ही सकारात्मक विचार करायला लागता.
2. कॉमेडी चित्रपट अथवा शो पाहा
हसणं हा कोणत्याही नैराश्यावरील रामबाण उपाय आहे. तुम्हाला कदाचित काही सुचत नसेल किंवा तुमचे विचार थांबतच नसतील अशावेळी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे मनातून वाईट आणि नकारात्मक विचार काढून टाकणं. त्यामुळे अशावेळी तुम्ही कॉमेडी चित्रपटा अथवा शो चा नक्कीच आधार घेऊ शकता. आजकाल सोशल मीडिया इतकं जास्त प्रमाणात वाढलं आहे की, तुम्हाला अनेक व्हिडिओज, शो अथवा चित्रपट ऑनलाईन पाहायला मिळतात. त्यामुळे तुमचं लक्ष वळवण्यासाठी तुम्ही नक्कीच ही गोष्ट अंमलात आणा. याचा परिणाम लगेच तुमच्या मनावर दिसून येतो. तुम्हाला स्वतःलाच थोडं हलकं वाटायला लागतं. किमान त्या वेळेपुरतं तरी तुमच्या मनातील दुःख दूर होतं.
वाईट मूड चांगला करण्यासाठी तुम्हाला आनंदी ठेवतील हे आनंदी कोट्स
3. दीर्घ श्वासोच्छवास घ्या
नकारात्मक विचार आपल्या जीवनात कधी ना कधी येतातच. अशावेळी दीर्घ श्वासोच्छवास घेण्याची स्वतःला सवय लावून घ्या. हा मेडिटेशनचा भाग आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या मनात निर्माण होणाऱ्या वाईट विचारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. जेव्हा तुम्हाला काही वाईट वाटत असेल तेव्हा विचार थांबवण्यासाठी तुम्हाला या क्रियेची मदत होते. तुम्ही दीर्घ श्वासोच्छवास घेता तेव्हा तुमचं सर्व लक्ष हे श्वासावर केंद्रीत होतं आणि मग त्यामुळे तुमच्या मनातील विचार दूर सारायला मदत मिळते.
4. दुसऱ्यांना मदत करा
दुसऱ्यांना मदत करण्यासारखं दुसरं सुख नाही. जेव्हा तुमच्या मनात नकारात्मक विचार येत असतात अशावेळी गरज असणाऱ्या लोकांना मदत करा. त्यांचं दुःख पाहून तुम्हाला तुमचं दुःख काहीच नसल्याची अधिक जाणीव होते. त्यामुळे अशा गरजू लोकांना मदत करा. त्यामुळे तुमचा मूड अधिक चांगला होण्यास मदत मिळते. तसंच नैराश्य निघून जाऊन सकारात्मक विचारसरणीला एक प्रकारे वाट मिळते.
जगण्याला बळ देतात प्रेरणादायी विचार
5. चिडचिड करणं टाळा
नैराश्याची सुरूवातच होते ती चिडचिडेपणाने. एखादी गोष्ट मनासारखी होत नसेल तर आपला चिडचिडेपणा वाढतो आणि त्यातूनच नैराश्य निर्माण होतं. तुमचा चिडचिडेपणा कमी करण्यासाठी तुम्ही इतरांवर ओरडता किंवा राग काढता अशाने गोष्टी अधिक बिघडतात. त्यामुळे सहसा चिडचिडेपणा करणं टाळा. चिडचिडेपणात अधिक प्रमाणात नकारात्मक विचार मनात जागृत होतात. त्यामुळे सकारात्मक विचार करायचे असतील तर चिडचिड करणं टाळण्याची जास्त गरज आहे.
6. आवडते पदार्थ खा
जेव्हा तुमचा मूड खराब असतो तुम्ही अतिप्रमाणात खातादेखील. पण तुम्ही त्याचा आनंद घेत नाही. पण असं करू नका. तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींसह आवडते पदार्थ खायला जा. तुमच्या आवडत्या पदार्थांच्या स्वादामुळे तुमचं मन अधिक प्रसन्न होतं. केवळ पोटच नाही तर तुमचं मनही तुमच्या आवडत्या पदार्थांमुळे भरतं आणि प्रसन्न होतं. त्यामुळे सहसा जेव्हा तुम्हाला नैराश्य आल्यासारखं वाटेल तेव्हा तुम्ही तुमचे आवडते पदार्थ खाण्यासाठी जा.
यशस्वी जीवनासाठी प्रयत्नपूर्वक करा सकारात्मक विचार
7. आवडत्या ठिकाणी शॉपिंग करा
शॉपिंगसारखा तर दुसरा कोणताच पर्याय नाही. जेव्हा आपली मनस्थिती खराब असते तेव्हा अगदी एकटेसुद्धा तुम्ही विंडो शॉपिंगसाठी निघालात तरी चालेल. अशावेळी तुम्हाला दुकानातील विविध वस्तू आणि कपडे अधिक आनंद देतात. तुम्ही काही खरेदी करा अथवा करू नका पण आजूबाजूचं वातावरण तुमच्या मनाला अधिक समाधान देतं आणि मनातील नकारात्मक विचार कमी करण्यासाठी मदत करतं.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.
मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.