Family Trips

पंचतारांकित हॉटेलमध्ये स्टेकेशनवर असताना ‘या’ गोष्टी करायलाच हव्या

Trupti Paradkar  |  Sep 21, 2021
things you must do at a five star hotel

कोविडमुळे गेली दोन वर्ष वेकेशनवर जाण्याचं प्रमाण खूपच कमी झालं आहे. आता अनलॉक नंतर पुन्हा लोकांनी फिरावं पूर्वीसारखा आनंद घ्यावा यासाठी मोठ मोठ्या ट्रॅव्हल डेस्टिनेशन, हॉटेल, रिसॉर्टमध्ये डिसकाउंट मिळत आहे. भारताबाहेर अथवा शहराबाहेर जायचं नसेल तर या गोष्टीचा फायदा घेत आता तुम्ही चक्क फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये स्टेकेशन करू शकता. लॉकडाऊनंतर स्टेकेशनचे प्रमाण खूप वाढलं आहे. #staycation स्टेकेशन म्हणजे आपल्या प्रियजनांसोबत अथवा मित्रमंडळींसोबत एक ते दोन दिवस एकत्र राहणे. स्टे म्हणजे राहणे आणि वेकेशन म्हणजे सुट्टी घालवणे या दोन गोष्टी एकत्र करणे म्हणजे स्टेकेशन… मात्र यासाठी तुम्हीदेखील एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये स्टेकेशनचा विचार करत असाल तर तिथे गेल्यावर या गोष्टी कराच… नाहीतर तुमचे पैसे वाया जातील.

बेस्ट व्ह्यू रूम बूक करा  

things you must do at a five star hotel

पंचतारांकित हॉटेलमध्ये स्टे करताना नेहमी सर्वात बेस्ट रूम बूक करा. पंचतारांकित हॉटेलमध्ये जाण्याचा मूळ उद्देश  असतो तिथल्या रॉयल आणि आरामदायक सेवेचा आनंद घेणं. त्यामुळे जर अशा मोठ्या हॉटेलमध्ये राहणार असाल तर साधी रूम मुळीच बूक करू नका. चांगला नजारा असणारी जसं की सी व्ह्यू, हिल व्ह्यू, लेक व्ह्यू अशी रॉयल रूम बूक करा. ज्यामुळे तुम्हाला तिथे राहण्याचा खरा आनंद घेता येईल.

वेळ पाळा 

वेळ पाळण्यात जर तुम्ही आळशी असाल तर सावध राहा. कारण फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये चेक इन आणि चेक आऊट अगदी वेळेत केलं जातं. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी उशीरा गेला तर तुमचे पैसे वायाच जातील. त्यामुळे चेक इन करण्याआधीच हॉटेलवर पोहचा आणि तिथल्या वातावरणाचा मनसोक्त आनंद घ्या. शिवाय वेळेत गेल्यामुळे  तुम्ही तिथलं स्पा, स्विमिंगपूल अशा अनेक सेवांचा पूरेपूर आनंद घेऊ शकता. 

खाण्यासाठी जन्म आपुला…

things you must do at a five star hotel

पंचतारांकित हॉटेलमध्ये तुम्ही एखादं पॅकेज बूक केलं तर बऱ्याचदा त्यामध्ये तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी बूफे ऑफर केला जातो. जर असं असेल तर तुम्ही तिथे जाण्याआधी एक दिवस उपवासच करायला हवा. कारण अशा हॉटेलमध्ये जाऊन तिथले निरनिराळे पदार्थ नाही खाल्ले तर काय मजा… म्हणूनच व्यवस्थित प्लॅन करून जेवणाचा आनंद घ्या आणि निरनिराळ्या पदार्थांची चव ट्राय करा. पोटभर जेवण्यापेक्षा निरनिराळे स्टार्टर्स, डेझर्ट्सची चव चाखा. अशा वेळी तुमच्यासोबत खवय्या फ्रेंडचा ग्रूप असेल तर तुमचे सगळे पैसे नक्कीच वसूल होतील.

वेकेशनवर असताना ‘या’ टिप्स फॉलो करून राहा फिट

फोटोसेशन तर करायलाच हवं

पंचतारांकित हॉटेलमधील लॉबी, रिसेप्शन, गार्डन, स्विमिंगपूल, रेस्टॉरंट्स खूपच सुंदर आणि आकर्षक असतात. तिथला तो राजेशाही थाट आपण दररोज अनुभवत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी  गेल्यावर भरपूर फोटोसेशन करा. तिथलं इंटेरिअर बाहेरून पाहता येत नाही त्यामुळे तिथे गेल्यावर हॉटेलमधील प्रत्येक ठिकाणी जा, तिथे छान फोटो काढा. ज्यामुळे आयुष्यभर हा क्षण तुमच्याजवळ कायम राहिल. 

ट्रॅव्हल करताना दिसायचं आहे स्टायलिश तर असे कॅरी करा कपडे

प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्या 

फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पूरवण्यात येणारी प्रत्येक सेवा ही नंबर वनची असते. मग ती जेवण असो, स्पा असो वा रूममध्ये पुरवण्यात येणाऱ्या गोष्टी… त्यामुळे कोणतीही गोष्ट वापरणं टाळू नका. कारण तुम्हाला देण्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही पैसे मोजले आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टी वापरणं हा तुमचा हक्क आहे. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गेल्यावर स्पाला जा, स्विमिंग पूल वापरा. अगदी रूममधले बेस्ट क्वॉलिटी सोप, शॅम्पू, कंडिशनर, टूथपेस्ट, पिण्याचे पाणी, चहा अथवा कॉफी या सर्व गोष्टी व्यवस्थित वापरा. 

तुमचा प्रवास झक्कास करतील हे खास कोट्स (Best Trekking Quotes In Marathi)

नियम पाळा 

things you must do at a five star hotel

पंचतारांकित हॉटेलमध्ये काही गोष्टींचा शिष्टाचार पाळावाच लागतो. कारण अशा हॉटेलमध्ये देश विदेशातील अनेक गेस्ट येत असतात. त्यामुळे सर्वांना साजेसे असे काही नियम हॉटेलमध्ये पाळावे लागतात. आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. तिथे गेल्यावर आपण त्यांचे पाहुणे असल्यामुळे तिथे जसा पेहराव आणि आचरण असायला हवे ते अवश्य पाळा.

सोशल मीडियावर स्टेटस अपडेट करायला विसरू नका 

सध्याचा जमाना हा सोशल मीडियाचा आहे. त्यामुळे पंचतारांकित हॉटेलमध्ये गेल्यावर लगेच तुमचे सोशल मीडिया सेटिंग अपडेट करा. अरे… तुम्ही एवढ्या रॉयल ठिकाणी आहात ही गोष्ट तुमच्या चाहत्यांना, प्रियजनांना कळायलाच हवी. नाहीतर एवढे पैसे खर्च करण्याला काय अर्थ नाही का? तेव्हा लगेच तुमचे स्टेट्स अपडेट करा आणि पैसा वसूल स्टेकेशनचा आनंद घ्या.

ऋतू कोणताही असो ‘या’ गोष्टी तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हव्या

Read More From Family Trips