एकाच वेळी लाखो लोकांशी आपल्या बोबड्या भाषेत संवाद साधणारा आणि तमाम लोकांना आपल्या “गोलीगत” आणि “बुक्कीत टेंगुळ” या प्रसिद्ध डायलॉगने आनंद देणारा टिकटॉक फेम सूरज चव्हाण (Suraj Chavan) आता सह्याद्री फिल्म प्रॉडक्शनच्या प्रशांत शिंगटे निर्मित “का रं देवा” या आगामी मराठी चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. बारामती तालुक्यातील मोडवे गावचा रहिवासी असलेल्या सूरज चव्हाण याचे आयुष्य खूपच खडतर आहे. आई-वडिलांचे छत्र हरपलेला हा मुलगा अवघ्या महाराष्ट्राला आपले आई-वडील मानतो. लहानपणापासूनच तो बोबडा बोलतो. बोबडे बोलणे हे त्याचे शारीरिक व्यंग, मात्र त्याचे व्यंगच त्याचे बलस्थान ठरले आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने लोकांना आपलेसे केले.
अधिक वाचा – इंद्रा आणि दिपूच्या नात्यात ट्विस्ट, सानूसोबत लागणार इंद्राचं लग्न
सूरजला मिळाली संधी
नवोदित कलाकारांच्या पाठीशी उभे राहणारे या चित्रपटाचे निर्माते प्रशांत शिंगटे यांची भेटही सुरज सोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली आणि त्यांनी सुरजला आपल्या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. टिकटॉकने मला रातोरात मोठे केले आणि मी जगभरात पोहचलो. प्रशांतजी मला स्वतः भेटायला माझ्या घरी आले आणि त्यांनी मला ही ऑफर दिली तेव्हा मला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. लिहिता वाचता न येणाऱ्या माझ्यासारख्या मुलाला एक निर्माता शोधत घरापर्यंत पोहचतो ही कल्पनाच मी करू शकत नव्हतो. माझ्या शैलीला साजेशी अशी कॉलेजमधल्या मुलाची भूमिका मी साकारली असून प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी मला आशा आहे. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन रंजीत दशरथ जाधव यांचं आहे. अभिनेत्री मोनालिसा बागल, मयूर लाड, अभिनेते जयवंत वाडकर, अरुण नलावडे आणि नागेश भोसले यांच्या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या फेब्रुवारी महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
अधिक वाचा – मौनी रॉयचे लग्न, गोव्यामध्ये रंगणार लग्नसोहळा
सोशल मीडियावर धुमाकूळ
सूरजच्या रिल्स आणि टिकटॉकचा सोशल मीडियावर धुमाकूळ आहे. सूरजचे असंख्या फॉलोअर्स सोशल मीडियावर आहेत. त्यामुळे आता सूरज पहिल्यांदाच चित्रपटात कशाप्रकारे काम करणार आणि त्याची नक्की काय भूमिका असणार याबाबत सर्वच आता उत्सुक आहेत. एखाद्याचे व्यंग कुरवाळून न बसता, आपल्या टॅलेंटमुळे सूरजला ही भूमिका मिळाली आहे. व्यंग आहे म्हणून रडत न बसता सूरज अत्यंत खडतर प्रवास करून पुढे आला आहे. त्यामुळे आता सूरजला चित्रपटातून नक्की कशा प्रकारे ब्रेक मिळणार हेच पाहावे लागणार आहे. आई-वडिलांविना वाढलेल्या सूरजने आयुष्यात खूपच कष्ट केले आहेत आणि खूपच त्रास काढला आहे. त्यामुळे आता चित्रपटातून काम करून सूरजचे आयुष्य अधिक चांगले होईल असे त्याच्या चाहत्यांना वाटत आहे. इतकंच नाही तर नवोदितांना संधी दिल्यामुळे आणि एका वेगळ्या अशा व्यक्तीला संधी दिल्यामुळे दिग्दर्शक आणि निर्मात्यांचेही आता विविध स्तरावर कौतुक होत आहे. सूरज नक्की कसा अभिनय करणार हे पाहण्यासाठी त्याचे चाहते आता नक्कीच उत्सुक असतील यामध्ये काहीच शंका नाही.
अधिक वाचा – दिग्दर्शक विजू माने यांची सोनालीबद्दल केलेली ती पोस्ट चर्चेत
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade