Care

तुमचेही केस कोरडे आहेत का? मग हे शॅम्पू तुमच्यासाठी आहेत बेस्ट

Leenal Gawade  |  Jul 5, 2019
तुमचेही केस कोरडे आहेत का? मग हे शॅम्पू तुमच्यासाठी आहेत बेस्ट

लांब, मुलायम, मजबूत, काळेभोर केस कोणाला आवडत नाही. असे केस मिळवण्यासाठी आपण केसांवर कितीतरी प्रयोग करतो. वेगवेगळी तेल, शॅम्पू, हेअर मास्क असे सगळे काही केसांवर लावून पाहिले जाते. पण ते करुनही जर तुमचे केस चांगले होत नसतील तर तुम्ही नक्कीच काहीतरी चुकीचे प्रयोग केसावर करत आहात. जर तुमचे केस कोरडे असतील आणि तुम्हाला तुमच्या केसांसाठी योग्य शॅम्पू निवडण्यास अडचणी येत असतील तर आज आम्ही तुम्हाला कोरड्या केसांसाठी चांगला शॅम्पू निवडण्यास मदत करणार आहोत.

तुमचेही केस गळतायत? केसगळती टाळण्यासाठी तुमच्या आहारात करा या गोष्टींचा समावेश

तुमचे केस कोरडे आहेत ते कसे ओळखावे?(Symptoms of dry hair)

shutterstock

केसांवर कोणताही प्रयोग करण्याआधी तुम्हाला तुमच्या केसांचा प्रकार कोणता आहे हे माहीत असणे गरजेचे आहे. आज आपण कोरड्या केसांसंदर्भात अधिक माहिती घेत आहोत. त्यामुळे तुमचे केस कोरडे आहेत की नाही हे कसे ओळखावे यासाठीच कोरड्या केसांची काही लक्षणे आहेत.ती आधी पाहुयात

डोक्यातील कोंडा कसे नियंत्रित करावे ते देखील वाचा

केसांची मजबूती (Flexibility)

जर तुमचे केस कोरडे असतील तर त्यामधील इलास्टिसिटी ही फार कमी झालेली असते. त्यामुळे असे केस पटकन तुटतात.इतर केसांच्या तुलनेत या केसांमधील ओलावा नाहीसा झालेला असतो. त्यामुळेच केसांची मजबूती दिवसेंदिवस कमी होऊ लागते. जर तुमचे केसही पटकन तुटत असतील तर केसांमधील आवश्यक द्रव्य कमी झालेले आहे असे समजावे

Also Read About उवा आणि nits लावतात कसे

केसांचा पोत (Texture)

कोरड्या केसांचा पोत हाताला रुक्ष आणि रखरखीत लागतो. या केसांना हात लावल्यानंतर ते केस असल्यासारखे वाटत नाही. तर हे केस इतके रुक्ष लागतात की, अशा केसांचा स्पर्श अगदी नकोसा होतो.त्यामुळे तुमचे केस जर तुम्हाला अधिक रुक्ष लागत असतील तर तुमचे केस हे कोरड्या केसांच्या प्रकारातील आहे.

केस दुभंगणे (Spilitends)

केस कोरडे असतील तर दुभंगण्याची शक्यता अधिक असते. काहींना कायमच स्प्लिट एडंसचा त्रास होत असतो. हा त्रास कोरड्या केसांना अधिक होतो. असे केस ज्या केसांना त्यांच्या मुळापर्यंत पोषण मिळत नाही. त्यामुळे केसांच्या वाढीच्या शेवटी ते दुभंगू लागतात.

केसांची चमक (Dullness)

कोरडे केस शुष्क असल्यामुळे असे केस चमकदार असण्याचा प्रश्नच येत नाही. कोरडे केस कधीच चमकताना दिसणार नाही. उलट ते अधिक शुष्क, कोरडे आणि अस्तव्यस्थ वाटतात.

केस तुटणे (Breakage)

केसांमध्ये कोणतेच पोषणतत्व नसल्यामुळे असे केस तुटण्याची शक्यता ही अधिक असते.हे त्यामुळे असे केस वारंवार तुटत राहतात.जर तुम्हाला केस तुटण्याचा किंवा त्याचा गुंता होण्याचा त्रास असेल तर तुमचे केस शुष्क प्रकारातील आहेत असे समजावे.

प्रवासादरम्यान तुमचेही केस होतात खराब, मग तुम्ही अशी घ्यायला हवी केसांची काळजी

कोरडे केस आणि डॅमेज्य केस यामध्ये काय फरक आहे. (What is the difference between dry hair and damaged hair )

shutterstock

कोरडे केस आणि डॅमेज्ड केस या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे तुम्ही लक्षात घ्यायला हवे याचे कारण असे की, केसांचे डॅमेज्ड होणे आपल्या हातात असते. केसांवर उष्णतेचा अती प्रयोग झाल्यानंतरत तुमचे केस डॅमेज्ड होतात. तर त्वचेच्या प्रकाराप्रमाणे काहींचे केस हे कोरड्या केसांमध्ये मोडतात. या दोन्ही प्रकारातील केसांमध्ये साधारण सारखेपणा इतकाच की, यामध्ये केसांना फाटे फुटणे, केस शुष्क वाटणे अशी लक्षण दिसून येतात. पण जर तुम्ही तुमच्या हेल्दी केसांवर जास्त प्रयोग केलेत तर तुमचे केस डॅमेज्ड व्हायला वेळ लागत नाही.

केस न वाढण्यामागची कारणे तुम्हाला माहीत हवी

हे आहेत कोरड्या केसांसाठीचे बेस्ट शॅम्पू (Best shampoo for dry hair)

कोरड्या केसांसाठी नेमका कोणता शॅम्पू वापरायचा या विचारात जर तुम्ही असाल तर आम्ही तुमच्यासाठी 15 बेस्ट शॅम्पू काढले आहेत. यापैकी तुम्ही तुमच्या बजेटमध्ये बसणारा शॅम्पू निवडू शकता आणि तुमचे केस मऊ, मुलायम आणि चमकदार बनवू शकता.

1.WOW Skin Science Moroccan Argan Oil Shampoo

सगळ्या सोशल मीडियावर या एका शॅम्पूची खूपच चर्चा आहे. या शॅम्पूचे रिह्व्यूही अनेकांनी चांगले दिले आहे. या शॅम्पूमध्ये अरगन ऑईल असून या शॅम्पूचा वापर केल्यामुळे तुमच्या केसांचा कोरडेपणा कमी होतो. तुमची केसगळती थांबवून तुमच्या केसाला चमकदार बनवण्याचे काम हा शॅम्पू करत असल्याचा दावा या कंपनीकडून करण्यात आला आहे.

फायदे (pros) : केसांना चमकदार बनवते. केसात गुंता होऊ देत नाही.

तोटे (cons): शॅम्पूच्या अति वापरामुळे केस अधिक कोरडे होऊ शकतात. त्यामुळे आठवड्यातून दोनदा वापर करावा.

2. TRESemme Botanique Shampoo

हिंदुस्तान युनिलिव्हरचे हे प्रोडक्ट अनेक ठिकाणी वापरले जाते. स्वस्त आणि मस्त असे हे प्रोडक्ट असून अनेक पार्लरमध्ये हा शॅम्पू वापरला जातो. या शॅम्पूच्या वापरामुळे केस मऊ मुलायम होतात. पण शॅम्पूचा अति वापर केसगळती करतो अशी तक्रारदेखील अनेकांनी केली आहे. त्यामुळे हा शॅम्पू वापरताना जरा जपून

फायदे (pros) : केस मुलायम करते. 

तोटे (cons): अतिवापरामुळे कोंडा होण्याची शक्यता जास्त शिवाय केसगळतीची शक्यता

3.OGX Moroccan Argan Oil Shampoo

OGX या ब्रँडचा हा शॅम्पू किंमतीने जास्त असला तरी या शॅम्पूची जमेची बाजू म्हणजे हा शॅम्पू सल्फेट फ्री आहे.यामध्ये असलेले moroccan argan oil तुमच्या केसांना आवश्यक असलेली पोषकतत्वे पुरवते. या शॅम्पूचे विशेष पाहता त्याचा वापर करण्यास काहीच हरकत नाही.

फायदे (pros) :  केमिकल फ्री असल्यामुळे केसांना नुकसान नाही

तोटे (cons):  किंमत जास्त

4. Kesh Kanti Reetha Shampoo

आर्युवैदीक घटक असलेला पतंजलिचा हा शॅम्पू स्वस्त आणि मस्त आहेत. यातील रिठामुळे तुमचे केस स्वच्छ होतात. शिवाय तुमच्या केसांना आवश्यक चमक मिळते.

फायदे (pros) : अगदी वाजवी दरात हा शॅम्पू आहे. या शॅम्पूच्या वापरामुळे केसांना नक्कीच फायदा होतो.

तोटे (cons):  अति वापर केल्यास केस कोरडे होण्याची भीती

5.WELLA Professional elements (Renewing) shampoo

महागड्या शॅम्पूमध्ये wella च्या या शॅम्पूचा समावेश होतो.पण अत्यंत कमी केमिकल्सचा वापर यामध्ये केलेला असतो. त्यामुळे या शॅम्पूचे रिव्ह्यूसु्द्धा चांगले आहेत. त्यामुळे हा शॅम्पू तुम्ही तुमच्या कोरड्या केसांसाठी वापरु शकता

फायदे (pros) : केमिकल फ्री शॅम्पू असल्यामुळे केसांना इजा पोहोचवत नाही

तोटे (cons):  किंमत तुलनेने जास्त

6. Licorice hair repair shampoo

तुमच्या कोरड्या स्काल्पसोबत तुमच्या केसांना स्वच्छ मुलायम आणि कोमल बनवण्याचा दावा या शॅम्पूकडून करण्यात आला आहे. या शॅम्पूचा रिव्ह्यूदेखील चांगला आहे. केसांसाठी आवश्यक असलेले भृंगराज यामध्ये असल्यामुळे तुमच्या केसांना बळकटी आणण्याचे काम या शॅम्पूतून केले जाते.

फायदे (pros) : केसांसोबत स्काल्पची घेते काळजी. कोरडे केस करते मुलायम

तोटे (cons):  भृंगराज केसासाठी चांगले तितकेच अति वापरामुळे केस कोरडे होण्याची भीती

7. Forest essential Hair Cleanser Amla, Honey & Mulethi shampoo

आवळा आणि मध केसांच्या वाढीसाठी आणि केसांचा पोत सुधारण्यासाठी अत्यंत चांगले असते. त्यामुळे तुम्ही हा शॅम्पू निवडायला काहीच हरकत नाही. या शॅम्पूची किंमत तुलनेने जास्त आहे.

फायदे (pros) : नैसर्गिक गोष्टींचा वापर केल्यामुळे याचा केसांना फायदाच होतो. अगदी कमीत कमी शॅम्पूसुद्धा तुमच्या केसांचा पोत सुधारण्यास मदत करतो

तोटे (cons):  या शॅम्पूची किंमत तुलनेने अधिक आहे.

8.Herbal Essences White Strawberry & Sweet Mint Shampoo

उत्तम सुंगध असलेला हा शॅम्पू कोरड्या केसांसाठी उत्तम आहे. केस मजबूत करण्यासोबत तुमच्या केसांना शाईन आणण्याचे काम हे शॅम्पू करते. अनेकांनी हा शॅम्पू वापरण्याचा वापरुन पाहण्याचा सल्ला दिला आहे.

फायदे (pros) :उत्तम सुगंध, कोरड्या केसांसाठी चांगला

तोटे (cons):  अति वापर टाळा

9.The Body Shop Rainforest Moisture Shampoo for Dry Hair

तुमच्यासाठी केमिकल फ्रीचा आणखी एक पर्याय म्हणजे The body shop चा हा शॅम्पू.  पण हा शॅम्पू थोडा चिकट असल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. त्यामुळे कसे धुताना काहींना हा शॅम्पू त्रासदायक वाटतो. केसांनी चमक देताना केसगळतीचे प्रमाण यामुळे कमी होते.

फायदे (pros): कोरड्या केसांना मॉयश्चरदेण्याचे काम हा शॅम्पू करते

तोटे (cons):  तुलनेने किंमत अधिक आह

10. Khadi Mauri Herbal Coconut Shampoo

हर्बल प्रोडक्टसाठी खादीचे नाव आवर्जून घेतले जाते.खादीचे अनेक शॅम्पू आहेत. पण जर तुमचे केस कोरडे असतील तर तुम्ही कोकोनट शॅम्पू वापरु शकता. वाजवी दरात मिळणाऱ्या या शॅम्पूमध्ये कोणतेही केमिकल नाही. त्यामुळे अनेकांनी या शॅम्पूला पसंती दिली आहे.

फायदे (pros) : नारळाच्या चवीचा फायदा तुमच्या केसांना होऊ शकतो.

तोटे (cons):  अति वापरामुळे केस तेलकट किंवा कोरडे होण्याची भीती

11.Sunsilk Nourishing Soft & Smooth Shampoo

नॅचरल ऑईल असलेल्या या शॅम्पूमुळे केस मऊ मुलायम होतात. हा शॅम्पू बऱ्यापैकी जुना आहे पण अनेकांना आजही हा शॅम्पू आवडतो. जर तुम्हाला काहीतरी स्वस्त आणि चांगलं हवं असेल तर हा शॅम्पू नक्की वापरुन पाहा

फायदे (pros) : केसांचा पोत सुधारतो. केस मुलायम होतात.

तोटे (cons): अति वापरामुळे केसगळतीची शक्यता

12. Nyle Damage Repair Shampoo

जास्वंद, पपई, आवळा याचे गुणधर्म या शॅम्पूमध्ये आहे. जास्वंदीच्या फुलाचे फायदे अनेक होतात. Nyleने आता त्यांच्या शॅम्पूमध्ये अनेक बदल केले असून शहरांपासून दूर असलेल्या भागातदेखील असे शॅम्पू वापरले जातात. खिशाला परवडणारा असा हा शॅम्पू आहे. पण या शॅम्पूचा अती वापर केल्यामुळेही केस ड्राय होऊ शकतात.

फायदे (pros) : कोणत्याही पाण्यात या शॅम्पूचा वापर तुम्ही करु शकता

तोटे (cons):  काही जणांना या शॅम्पूमुळे केस ड्राय झाल्याचा अनुभव आला आहे.

13.Matrix Biolage Repairinside Shampoo

Matrix च्या उत्तम शॅम्पू रेंजपैकी हा एक उत्तम शॅम्पू असून तुमच्या कोरड्या केसांना मऊसूत करण्याचे काम करतो. याची किंमत ही अगदी कमी आहे. अगदी कमी शॅम्पूमध्ये तुमचे केस स्वच्छ होऊ शकतात.

फायदे (pros) : अगदी कमीत कमी शॅम्पूचा उपयोग केस धुण्यासाठी होतो. केस चांगले होतात. केसगळती कमी होते. 

तोटे (cons):  किंमत तुलनेने जास्त

14.Greenberry Organics Daily Mild Shampoo

कोरड्या केसांची काळजी घेण्यासाठी माईल्ड शॅम्पूची गरज असते. greenberry चा हा शॅम्पू माईल्ड प्रकारातील असून तुमचा कोंडा, तेलकटपणा दूर करुन केसांना आवश्यक चमक देण्याचे काम करतो. अनेकांनी या प्रोडक्टला पसंती दिली आहे.

फायदे (pros) :  कोंडा, तेलकटपण कमी करुन केसांना आवश्यक चमक देते.

तोटे (cons):  माईल्ड शॅम्पू असल्यामुळे अति कोरड्या केसांना याचा फायदा होईल की नाही हे सांगता येत नाही.

15.Matrix Biolage Deep Smoothening Shampoo

Matrixचा हा शॅम्पू देखील फारच छान आहे. तुम्ही या शॅम्पूचा पर्यायदेखील निवडू शकता. या शॅम्पूमुळे तुमचे केस मऊ मुलायम होतील. शिवाय केसांसदर्भातील तुमच्या अन्य तक्रारीदेखील आपोआप कमी होतील. या शॅम्पूबाबत सांगायचे तर तुम्ही फार कमी शॅम्पू वापरणे अपेक्षित असते.

फायदे (pros) :   कोरड्या केसांसाठी अत्यंत चांगला शॅम्पू, केसांच्या इतर तक्रारी दूर करते

तोटे (cons):  किंमत जास्त, अतिवापरामुळे होऊ शकतो त्रास

कोरड्या केसांसाठी चांगले कंडिशनर (Best conditioner for dry hair)

कोरड्या केसांसाठी शॅम्पू जितका महत्वाचा आहे तितकेच कंडिशनर ही महत्वाचे आहे. केस धुतल्यानंतप कोरड्या केसांवर कंडीशनर लावायलाच हवे तरच केस अधिक काळासाठी मुलायम राहतात. आता कोरड्या केसांसाठी 5 उत्तम कंडिशनर कोणती ते पाहुयात

1. WOW Skin Science Coconut Milk Conditioner

Wow शॅम्पूसोबत तुम्हाला कंडीशनरचा पर्यायही या ब्रँडने उपलब्ध करुन दिला आहे. नारळाचा वापर करुन तुमच्या केसांना नॅचरल कंडिशनिंग करण्याचा दावा हा शॅम्पू करते

फायदे (pros) :   कोरड्या केसांचा गुंता अगदी सहज सोडवते. केस सुंदर, मोकळे आणि चमकदार बनवते

तोटे (cons):  जर तुम्हाला खोबऱ्याचा किंवा खोबरेल तेलाचा वास आवडत नसेल तर त्याला थोडा त्याचा सुगंध आहे.

2. Kesh Kanti Damage Control Hair Conditioner

पतंजलिचे कंडिशनरदेखील तुम्ही तुमच्या कोरड्या केसांसाठी वापरु शकता. पतंजलि शॅम्पूसोबत तुम्ही वापरल्यास फारच उत्तम

फायदे (pros) :  याचा मंद सुगंध चांगला आहे. केसांचा गुंता पटकन सोडवतो. किंमत वाजवी आहे

तोटे (cons):   सतत वापरामुळे केस कोरडे होण्याची भीती

3. Matrix Ultra Hydra Source Hydrating Conditioner,

तुमच्या केसांना स्मुथ आणि सिल्की  बनवण्याचा दावा हे कंडिशनर करते. यामध्ये केमिकलचे प्रमाण कमी असल्यामुळे तुमच्या केसांना इजा पोहोचत नाही.

फायदे (pros) :   केस मुलायम करते. केसांना आवश्यक असलेली चकाकी येते

तोटे (cons): जास्त लावल्यास कंडिशनर काढण्यासाठी खूप पाणी लागते

BBLUNT Perfect Balance Conditioner

प्रोफेशनल सलोनमध्ये याचा अधिक वापर केला जातो. हे कोरड्या केसांसाठी उत्तम मानले जाते.

फायदे (pros) :   केस मुलायम होतात. अधिक काळालसाठी हा बदल दिसतो.

तोटे (cons):  किंमत तुलनेने जास्त

5.The Body Shop Rainforest Moisture Conditioner

The body shop च्या रेनफॉरेस्ट कलेक्शनमधील हे प्रोडक्ट असून याचा रिव्हयू फारच चांगला आहे. कोरड्या केसांना सिल्की स्मुथ बनवण्याचा दावा या कंपनीकडून केला जातो

फायदे (pros) : कंडिशनरचे टेक्शचर हाताला छान, मंद सुंगंध छान

तोटे (cons):  किंमत तुलनेने अधिक

केसांबाबात हे अजिबात करु नका (avoid this if you have dry hair)

केसांच्या बाबतीत काही गोष्टी या सर्वसाधारणपणे सगळ्यांनीच पाळायल्या हव्यात. या गोष्टी कोणत्या ते देखील जाणून घेऊया

सूर्यकिरणांपासून राहा दूर (Avoid sun exposure)

केसांचा पोत आणखी बिघडवण्यास कारणीभूत असतात तीव्र सूर्यकिरण. या तीव्र सूर्यकिरणांचा त्रास तुम्हाला अधिक होऊ शकतो. सूर्यकिरणांचा त्रास होऊ नये म्हणून घरातून बाहेर पडताना तुम्ही तुमच्या केसाला स्कार्फ बांधून बाहेर पडा म्हणजे तुमच्या केसांना थेट सूर्यकिरणांचा त्रास होणार नाही.

केमिकलयुक्त शॅम्पू(Harsh shampoo)

तुमचे केस कोरडे असल्यामुळे तुम्ही कोणताही केमिकलयुक्त शॅम्पू वापरणे चांगले नाही. आता तुम्ही म्हणाल की केमिकलशिवाय हल्ली कोणते शॅम्पू मिळतच नाही. पण असेही काही शॅम्पू असतात. ज्यामध्ये केमिकलचे प्रमाण फारच कमी असते. अशा शॅम्पूची निवड करण्याचा आम्ही तुम्हाला सल्ला देऊ

shutterstock

गरम पाण्याची आंघोळ (Hot water bath)

काही जणांना केसांवरुन कडकडीत पाण्याने आंघोळ करायची सवय असते. पण ही सवय तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. सतत गरम पाण्याने केस धुतल्यामुळे केसांची चमक निघून जाते. त्यामुळे किमान केसांवरुन आंघोळ करताना थंड पाण्याची केल्यास उत्तम

हेअर स्टाईलिंग टुल्स (Styling product)

हेअर स्टाईल करणे सगळयाच महिलांना आवडते. पण काही हेअर स्टाईल करताना जर तुम्ही सतत हेअर स्टाईलिंग टुल वापरत असाल तर त्याचा आताच वापर करणे कमी करा. हेअर स्ट्रेटनर, हेअर कर्लर किंवा हेअर ड्रायर तुम्ही वापरत असाल तर याचा नित्य वापर तुमचे केस अधिक कोरडे करु शकतो. त्यामुळे ज्यावेळी तुम्हाला स्टाईलिंगची फारच गरज असेल अशावेळी तुम्ही तुमच्या केसांना सिरम लावून मगच मशीनचा वापर केसांवर करा.

केस सतत धुणे (Excessive hair wash)

सतत केस धुण्याची काहींना सवय असते. जरी तुमचे केस कोरड्या प्रकारातील नसतील पण जर तुम्ही सतत केस धुवत असाल तरी ही सवय तुम्हाला महाग पडू शकते. सततच्या केस धुण्यामुळे तुमचे तेस कोरडे पडू शकतात. त्यामुळे केस सतत धुवू नका.

FAQ

shutterstock

कोरड्या केसांसाठी नेहमीचा शॅम्पू वापरला तर चालेल का? (Regular shampoo is good for dry hair)

तुम्ही कोणत्या प्रकारचा शॅम्पू वापरता त्यावर हे अवलंबून आहे. कोरड्या केसांसाठी नरिशमेंट ऑईल असलेल्या शॅम्पूची आवश्यकता असते. जर तुम्ही ऑईलबेस आणि नरिशमेंट शॅम्पू वापरत असाल तर तुम्हाला तसे शॅम्पू वापरण्याची कागीच गरज नाही.पण जर तुमचा शॅम्पू हार्श असेल तर तुम्ही तो शॅम्पू बदलून तुम्हाला माईल्ट आणि केस शुष्क न करणारा शॅम्पू वापरणे गरजेचे आहे.

गरम तेलाने मसाज केल्यामुळे केस चांगले होतील का?)Hot massage oil can help to get hair moist )

केसांची मालिश ही तुमच्या नसा रिलॅक्स करण्यासाठी नेहमीच चांगली असते. पण तुम्ही कोणते तेल वापरता हे देखील महत्वाचे आहे. बाजारात वेगवेगळ्या प्रकारची तेल मिळतात. पण तुम्हाला तुमच्या केसांसाठी योग्य तेल कोणते हे माहीत नसेल तर तुम्ही खोबरेल तेलाचा वापर करु शकता. तेल कोमट करुन तुम्हाला त्या तेलाने मालिश करायची आहे. आठवड्यातून एकदा तरी असे करुन पाहा.

कोरड्या केसांसाठी काही घरगुती उपाय आहेत का? (Is there is any home remedy for dry hair )

कोरड्या केसाला मऊ, मुलायम आणि चमकदार बनवण्यासाठी अनेक घरगुती उपाय आहेत.याचा अवलंब तुम्ही करु शकता. केळ्याचा मास्क, कढीपत्ता मास्क असे पर्याय आहेत. या शिवाय अंड्याचा वापर तुम्ही तुमच्या केसांसाठी करु शकता.

आठवड्यातून कितीवेळा केस धुणे अपेक्षित असते (How many days of week dry hair need to wash)

जर तुमचे केस खूपच कोरडे असतील तर तुम्ही तुमचे केस आठवड्यातून केवळ दोनदाच धुणे अपेक्षित आहे. जर तुम्ही तुमचे केस जास्तवेळा धुतले तर ते कोरडे होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे जर तुम्ही चांगला शॅम्पू वापरत असाल तर तुम्ही तुमचे केस आठवड्यातून दोन वेळा धुण्यास हरकत नाही.

कोरड्या केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर कोणते? (best natural hair conditioner for dry hair)

बाजारात अनेक कंडिशनर मिळतात. पण तुम्हाला हे कंडीशनर वापरण्याची भीती वाटत असेल तर तुम्ही वाटीभर पाण्यात अर्धा लिंबू पिळून ते पाणी तुम्हाला तुमच्या केसांना कंडीशनर म्हणून वापरता येईल.या शिवाय तुम्ही अंड, केळी, अवॅकाडो याचा हेअर कंडीशनर म्हणून वापरु शकता.

Read More From Care