लाईफस्टाईल

इन्स्टाग्रामवर असे वाढवा फोलोअर्स, सोप्या टिप्स

Dipali Naphade  |  Dec 24, 2021
tips-and-tricks-to-gain-instagram-followers-organically

सोशल मीडियाच्या (Social Media) या जगामध्ये आपल्याला किती लाईक्स (Likes) मिळत आहेत आणि किती फॉलोअर्स (Followers) आहेत याचे खूपच महत्त्व आहे. आपल्या सर्वांनाच वाटत असते की, सोशल मीडिया अकाऊंटवर आपले अधिकाधिक फॉलोअर्स असावेत. आपले लाईक्स अधिक वाढावेत. अशावेळी फेक फॉलोअर्स वाढविण्याकडे अधिक कल असतो. पण आता असं काहीही करण्याची अजिबात गरज नाही. आम्ही तुम्हाला अशा टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहोत, ज्या फॉलो करून तुम्ही तुमच्या इन्स्टाग्राम (Instagram) वरील फॉलोअर्स ऑर्गेनिकली (Organically) वाढवू शकता. तर जाणून घ्या कसे वाढवायचे फॉलोअर्स. 

आपले अकाऊंट करा ऑप्टिमाईज (Optimize your instagram account)

तुम्हाला तुमच्या इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्स वाढवायचे असतील तर तुम्ही तुमचे खाते व्यवस्थित वापरायला हवे. ऑप्टिमाईज करणे म्हणजे योग्य स्वरूपात तुम्ही तुमच्या इन्स्टावर बायो (bio), इमेज कॅप्शन, योग्य नाव आणि योग्य प्रोफाईल बनवणे आवश्यक आहे. इन्स्टाग्रामवर बायो आणि तुमची ब्रँड इमेज योग्य असणे गरजेचे आहे. ज्यामुळे फॉलोअर्स तुमच्याकडे अधिक आकर्षित होतात. यामुळे तुम्हाला अधिक फोलोअर्स मिळण्यास मदत होते. 

अधिक वाचा – सिनिअर सिटीझनमध्ये वाढू लागला आहे फोनचा वापर, लक्ष ठेवा

कंटेन्ट कॅलेंडर बनवा (Make Content Calendar)

बऱ्याचदा आपण आपल्या अकाऊंटवर काहीही पोस्ट करत असतो. इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स तुम्हाला वाढायला हवं असेल तर तुम्ही असं अजिबात करू नका. तुम्हाला आपण कोणती पोस्ट शेअर करणार आहोत यासाठी योग्य कंटेन्ट शेड्युल बनवून घ्यायला हवं. तुम्ही एखादा बिझनेस करत असाल अथवा तुमचे खासगी खाते असेल तर दिवसातून तुम्हाला केवळ 1 – 2 पोस्ट करणे अथवा एखादा व्हिडिओ पोस्ट करायला हवा. यापेक्षा जास्त कधीही पोस्ट करू नका. 

अधिक वाचा – जाणून घ्या मोबाईलचे दुष्परिणाम | Mobile Che Dushparinam

इन्स्टाग्राम पोस्ट आधी शेड्युल करा (Schedule the post first)

तुम्ही तुमची इन्स्टाग्राम पोस्ट ही आधीपासूनच शेड्युल करून ठेवा. यामुळे तुमच्या व्ह्यूअर्सची प्रोफाईलवर अधिक एंगेजमेंट (engagement) वाढेल. तुम्ही स्प्राऊट स्पेशलच्या माध्यमातूनही आपली पोस्ट शेड्युल करून घेऊ शकता. असं करणं यासाठी आवश्यक आहे जेणेकरून एखाद्या विशिष्ट वेळीच लोक तुमची पोस्ट पाहणे पसंत करतात. तुम्ही पहिल्यापासूनच कंटेन्ट शेड्युल न केल्यास, तुमचे फॉलोअर्स कमी होऊ लागतात. इन्स्टाग्रामवर पहिल्यापासून पोस्ट शेड्युल करण्याचा फायदा हा आहे की, तुम्ही जर एखाद्या वेळी पोस्ट करायला विसरलात तर तुम्हाला चिंता करण्याची अजिबातच गरज नाही. योग्य त्या वेळात तुमची पोस्ट शेअर होते. 

योग्य हॅशटॅगचा करा वापर (Use perfect Hashtag)

तुम्ही जी पोस्ट शेअर करणार असाल त्यासंदर्भातील हॅशटॅगच तुम्ही वापरायला हवा. तसंच तुम्ही एखादा ट्रेंडिंग हॅशटॅगदेखील अशावेळी वापरा. हॅशटॅग पोस्ट केल्यामुळे तुमची स्टोरी अथवा पोस्ट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचते. तसंच यामुळे फॉलोअर्स वाढण्यास मदत मिळते. उदाहरणार्थ तुम्ही एखादे उत्पादन विकत असाल तर त्या उत्पादनाचे नाव, त्याचे फायदे आणि त्यासंबंधित माहिती तुम्हाला यामध्ये पोस्ट करायला हवी. यामुळेदेखील तुमच्या अकाऊंटवरील ट्रॅफिक (Traffic) वाढण्यास मदत मिळते. तसंच तुमच्या फॉलोअर्ससह कधी ना कधीतरी बोलायला हवं. त्यामुळे त्यांनाही आनंद मिळतो. त्यांच्या कमेंट्सना तुम्ही रिप्लाय दिल्यास, तुमच्यातील त्यांचा इंटरेस्ट अधिक वाढतो. 

अधिक वाचा – तुम्ही तुमचा पासवर्ड बदलता की नाही, पासवर्ड बदलताना

या गोष्टींची घ्या अधिक काळजी 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From लाईफस्टाईल