Love

सुखी वैवाहिक जीवन हवं असेल तर फॉलो करा या सोप्या टिप्स (Tips For Happy Married Life)

Trupti Paradkar  |  Apr 14, 2020
सुखी वैवाहिक जीवन हवं असेल तर फॉलो करा या सोप्या टिप्स (Tips For Happy Married Life)

वैवाहिक जीवन सुखाचं आणि समाधानाचं असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. मात्र लग्नानंतर प्रत्येकाकडे जीवन सुखी आणि आनंदी करणारं ‘सिक्रेट’ असेलच असं नाही. अनेकांच्या आयुष्यात लग्नाआधी आणि नवीन लग्न झाल्यावर भरभरून वाहणारं प्रेम काळाच्या नकळत ओघात कधी कमी होत जातं हे कळत सुद्धा नाही. त्यांना याची जाणीव होते तेव्हा मात्र फार उशीर झालेला असतो. यासाठीच आयुष्यभर संसार सुखाचा (Happy married life in marathi) कसा करायचा हे प्रत्येकाला माहीत असायलाच हवं. दैनंदिन जीवनात अगदी काही सोप्या आणि छोट्या छोट्या गोष्टी करून तुम्ही तुमचं वैवाहिक जीवन आनंदी करू शकता. यासाठी सुखी वैवाहिक जीवनाचं हे गुपित जरूर जाणून घ्या.

जोडीदाराचे मनापासून कौतुक करा (Appreciate Your Partner)

कौतुक ऐकायला कोणाला नाही आवडत ? घरातल्या अगदी लहान बाळापासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच आपलं कौतुक व्हावं असं वाटत असतं. जोडीदार अथवा पार्टनर तुमच्या तर तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाची व्यक्ती आहे. जोडीदाराचे वेळोवेळी कौतुक केल्यामुळे एकमेकांमधील प्रेम अधिक दृढ होत जातं. बाहेर परिस्थिती कशीही असली तरी घरातून आणि विशेषतः लाईफ पार्टनरकडून मिळणारी कौतुकाची थाप काम अधिक चांगलं करण्याची ऊर्मी मनात निर्माण करते. मग ते तुमचा आवडता पदार्थ तयार करणं असू दे किंवा ऑफिसमध्ये मिळालेलं एखादं छोटं यश. तुमच्या जोडीदाराच्या यशाचं मनापासून कौतुक करायला मिळूच विसरू नका. मात्र लक्षात ठेवा कौतुक मनापासून करा वरवर केलेलं कौतुक समोरच्या व्यक्तीच्या मनापर्यंत जाऊन कधीच भिडत नाही. यासाठी त्या कौतुकामध्ये तुमच्या मनातील प्रेम आणि जोडीदाराबद्दल वाटणारा आदर त्यात जोडलेला असायला हवा. 

जोडीदारासोबत नातं मजबूत असल्याचे संकेत (Sign Of A Healthy Relationship)

Shutterstock

लाईफ पार्टनरचे चांगले श्रोते व्हा (Be a Good Listener)

जेव्हा जेव्हा तुमच्या दोघांमध्ये एकाला व्यक्त होण्याची गरज असेल तेव्हा दुसऱ्याने त्याच्यासाठी चांगला श्रोता होणं गरजेचं आहे. या एकाच गोष्टींवर आज अनेक कुटुंब सुखाने संसार करत आहेत. सुखी वैवाहिक जीवनाचं हे एक गुपितच आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीचं म्हणणं कान देऊन ऐकता तेव्हा त्या व्यक्तीला सर्वात आधी मनातून खूप बरं आणि हलकं वाटतं. शिवाय यामुळे अनेक समस्या सहज सोडवता येऊ शकतात. जेव्हा तुम्ही एखाद्याला थोडासा वेळ देता तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातील मौल्यवान क्षण आणि तुमचं आयुष्यच त्या व्यक्तीला देत असता. एखाद्या महागड्या भेटवस्तूपेक्षा हे गिफ्ट जोडीदारासाठी नेहमीच गरजेचं असतं.

छोट्याशा गोष्टींसाठीदेखील थॅंक्स म्हणायला विसरू नका (Say Thank You For The Little Things)

संसार अथवा वैवाहिक जीवन सुरू झाल्यावर तुम्ही फक्त एकट्याचा विचार करूच शकत नाही. कारण संसार हा दोघांचा असतो त्यामुळे एकमेकांसाठी अनेक गोष्टी करणं हे ओघाने आलंच. मात्र जर या छोट्या छोट्या गोष्टींसाठी जर एकमेकांचे आभार मानले आणि कृतज्ञता व्यक्त केली तर समोरच्या व्यक्तीला ती गोष्ट तुमच्यासाठी आयुष्यभर करत राहावी असं वाटत राहतं. स्वयंपाक करणं, बाजारातून सामान घेऊन येणं, ऑफिसच्या ताणापासून दूर ठेवणारा एखादा सल्ला देणं, मुलांची काळजी घेणं अशा अनेक गोष्टी तुम्ही एकमेकांसाठी करू शकता. मात्र कामात तुमच्या लाईफ पार्टनरची मदत मिळाल्यावर त्याला लगेच ‘थॅंक्स’ म्हणा कारण याचा चांगला परिणाम तुम्हाला तुमच्या आयुष्यात दूरपर्यंत मिळत राहील. 

Shutterstock

मनमोकळा आणि सुसंवाद करा (Maintain Strong Communication)

सुसंवाद ही गोष्टच आजकाल हरवत चालली आहे असं वाटत आहे. कारण करिअर आणि वैयक्तिक आनंदाच्या प्रयत्नात माणूस त्याच्या घरातल्या लोकांपासून फार दूर चालला आहे. याचं प्रमुख कारण पूर्वीप्रमाणे आजकाल कुटुंबामध्ये संवाद होत नाहीत. जोडीदारासोबत तर दररोज सुसंवाद होणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळी तुमचा संवाद चांगलाच होईल आणि कोणतेही मतभेद होणार नाहीत असं नाही. मात्र यामुळे कोणताही वाद जास्त काळ न टिकवता पुन्हा तुमची मनं एक होतील याची काळजी घेता येऊ शकते. त्यामुळे बोला… भरपूर बोला…. एकमेकांशी दररोज थोडावेळ काढून बोलणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवा. शिवाय मनातील वाईट गोष्टींचा निचरा झाल्याशिवाय नवीन चांगल्या गोष्टी मनात शिरत नाहीत. म्हणून एकमेकांबद्दल वाटणाऱ्या भावना आणि मतभेद अशा संवादातून सोडवा. 

शारीरिक जवळीक आणि उत्साह कायम राखा (Maintain Intimacy and Passion)

सुखी वैवाहिक जीवन मराठी हे एक आणखी एक रहस्य आहे. लग्नाला कितीही वर्ष होऊ द्या अथवा तुमचं वय कितीही असू द्या. जोडीदारासोबत शारीरिक जवळीक आणि प्रेमातील उत्साह कायम ठेवा. कारण सेक्समुळे आयुष्यातील इतर गोष्टींमधून मिळणारा मानसिक ताणतणाव कमी होतो. यासाठी तुमच्या लाईफ पार्टनरच्या गरजा योग्य वेळी ओळखा आणि एकमेकांना सुखी आणि आनंदी ठेवा. 

Shutterstock

जोडीदाराच्या फॅंटसी पूर्ण करा (Fulfill Your Partners Fantasy)

रोमॅंटिक आयुष्याबद्दल प्रत्येकाच्या मनात काही ना काहीतरी ‘फॅंटसी’ या असतातच. सुखी वैवाहिक जीवन जगण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या लाईफ पार्टनरच्या या ‘फॅंटसी’ माहीत असायलाच हव्या. पार्टनरला सुखी ठेवण्यासाठी या ‘फॅंटसी’ पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. या फॅंटसीबाबत सतत तुमच्या पार्टनरसोबत चर्चा करा. ज्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनातील चार्म टिकून राहील. वय कितीही झालं तरी एकमेकांबद्दलची ओढ कायम ठेवण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. सुखी वैवाहिक जीवन जगण्याचा हा आणखी एर बेस्ट उपाय आहे.  

जबाबदारी स्वीकारा (Take Responsibility)

जोडीदाराची जबाबदारी स्वीकारा. वैवाहिक आयुष्य हे तुमच्या दोघांचं आहे. त्यामुळे दोघांनी एकमेकांची जबाबदारी स्वतःहून स्वीकारायला हवी. यासाठी तुमच्या लाईफ पार्टनरची सर्व बाबतीत जबाबदारी स्वीकारण्यास काहीच हरकत नाही. लाईफ पार्टनरच्या आयुष्यातील इतर जबाबदाऱ्या जसं की, आईवडिलांची काळजी, कुटुंबातील व्यक्तींचे आजारपण, आर्थिक मदत, भावंडाचे करिअर अथवा लग्न अशा अनेक गोष्टीत सहकार्य करून तुम्ही या जबाबदारी स्वीकारू शकता.

Shutterstock

एकमेकांना गृहित धरू नका (Don’t Take Each Other For Granted)

वैवाहिक जीवनात बऱ्याचदा अनेकांना जोडीदाराला गृहित धरण्याची सवय असते. कधीकधी तर लग्नानंतर काही वर्षांनी जोडीदार एकमेकांना आपोआप गृहित धरू लागतात. मात्र हे फार चुकीचे आहे. कारण लाईफ पार्टनर असला तरी प्रत्येक व्यक्तीला त्याचं वैयक्तिक मत असू शकतं. त्यामुळे एखादी जबाबदारी, काम अथवा वैयक्तिक सल्ला देताना आधी समोरच्या व्यक्तीचं म्हणणं नीट ऐकून घ्या. जोडीदाराच्या वैयक्तिक मत आणि कामांना आधी प्राधान्य द्या. 

भावनांचा आदर राखा (Respect Each Others Emotions)

प्रत्येक व्यक्तीच्या मनातील भावना निरनिराळ्या असतात. कोणी फारच भावनिक असेल तर कोणी फारच मजबूत मन असलेलं. यासाठी तुमच्या जोडीदाराच्या मनातील भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. शिवाय समोरच्या व्यक्तीच्या भावना आणि तुमचे विचार एकसमान असतीलच असं नाही. मात्र ‘व्यक्ती तितक्या वल्ली’ या म्हणीनुसार तुमच्या जोडीदाराच्या भावना तुम्हाला पटल्या नाहीत तरी कमीत कमी त्यांचा आदर नक्कीच राखा. 

लाईफ पार्टनरला प्रथम प्राधान्य द्या (Give Priority To Your Spouse)

आयुष्यात बॅलंस राखायचा असेल तर कोणत्या गोष्टीला किती प्राधान्य द्यायचं हे माहीत असायला हवं. म्हणूनच तुमच्या वैयक्तिक आयुष्यात प्रथम प्राधान्य नेहमी जोडीदारालाच द्या. कारण आयुष्यभर तुम्हाला साथ देणारी आणि तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्तीच तुमच्यासाठी सर्वस्व असू शकते. वैवाहिक जीवनात सुखी (Happy married life in marathi) राहण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. करिअर, पैसे, इतर नाती यामध्ये सर्वात आधी जोडीदाराला प्राधान्य दिल्यामुळे तुमचाच संसार नेहमीच सुखाचा होईल हे लक्षात ठेवा. 

दररोज ‘आय लव्ह यु’ म्हणायला विसरू नका (Don’t Forget To Say “I Love You” Every Day)

प्रेम व्यक्त करण्याचा हा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. दररोज तुमच्या जोडीदाराला फक्त ‘आय लव्ह यु’ असं म्हणून तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त करू शकता. दिसायाला कितीही पोरखेळ वाटत असला तरी यामुळे तुमचं नातं वर्षांनूवर्ष टिकून राहील. एकमेकांचं बॉंडिंग आणखी दृढ करण्याचा एक चांगला पर्याय आहे. तेव्हा दररोज तुमच्या लाईफ पार्टनरला ‘आय लव्ह यु’ म्हणायला विसरू नका.

दिवसाची सुरूवात किस आणि मिठीने करा (Start Your Day With A Warm Kiss Or Hug)

खरंतर नातं टिकवण्यासाठी आणि वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी फार मेहनत घेण्याची मुळीच गरज नाही. यासाठी दररोज सकाळी उठल्यावर फक्त तुमच्या जोडीदाराला प्रेमाने जवळ घेऊन एक किस करा. सकाळी नित्यनेमाने ही एक छोटीशी गोष्ट करून तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त करू शकता. अनेकांच्या सुखी वैवाहिक जीवनात दडलेलं हे एक छोटसं रहस्य आहे.

आम्ही दिलेल्या या सोप्या टिप्स फॉलो करा आणि तुमचं वैवाहिक जीवन सुखाचं, समाधानाचं आणि आनंदाचं करा. तुमचं हे गोड नातं वर्षांनूवर्ष टिकावं आणि दिवसेंदिवस तुमच्या नात्यातील गोडवा आणि प्रेम अधिकाधिक दृढ व्हावं हिच ईच्छा.

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

अधिक वाचा –

जोडीदारासोबत भांडण्यापेक्षा एकमेकांना समजून हे दिवस घालवा

राजा-राणीच्या संसाराची गोष्ट येईल सत्यात तुम्हीही करून पाहा या गोष्टी

किस घेताय ना…किस घेण्यालाही असतात अर्थ (Types Of Kisses In Marathi)

Read More From Love