कोरोना व्हायरसमधून पूर्ण बरं झाल्यावरही अनेकांना काही आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. काहींना कोरोना रिकव्हरीनंतर फंगल इनफेक्शन, लाल डाग, अंगावर चट्टे येणं अशा समस्या जाणवत आहेत. तर काहींची नखं ठिसूळ होऊन तुटत आहेतत. जर तुम्ही कोरोनामधून बरे होत असाल तर तुम्हाला तुमच्या नखांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कोरोनामुळे शरीर डिहायड्रेट होते आणि या समस्या निर्माण होतात. अशा काळात तुमची नखं पांढरी पडणं अखवा ठिसूळ होऊन तुटू लागणं या समस्या जाणवू शकतात. यासाठीच कोरोनाच्या काळात आणि कोरोनातून बरं होताना तुम्ही नखांची विशेष स्वच्छता आणि काळजी घ्यायला हवी. जाणून घ्या या काळात कशी घ्यावी नखांची काळजी
कोरोनातून बरं होताना अशी घ्या नखांची काळजी
कोरोनाच्या काळात इनफेक्शनचा परिणाम तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयवावर होत असतो. यासाठी या काळात इतर अवयवांप्रमाणे नखांची काळजी घेणंही तितकंच गरेजंच आहे.
नखांवर सौम्य साबण लावा –
कोरोनानंतर जर तुमची नखं कमजोर झाल्याने तुटत असतील तर तुम्ही नखांसाठी सौम्य साबण अथवा शॅम्पूचा वापर करायला हवा. एवढंच नाही तर हात स्वच्छ धुतल्यावर हात आणि नखांना चांगले मॉइस्चराईझर देखील लावायला हवे.
नखांना स्क्रब करा –
कोरोना व्हायरस तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयवावर प्रभाव पाडत असतो. जर तुम्ही कोरोनातून बरं होताना हात नियमित स्क्रब केले तर इनफेक्शन नष्ट होण्यास मदत होईल. शिवाय यामुळे तुमच्या हातावरील डेड स्किन आणि नखांचे तुटलेले क्युटिकल्स निघून जातील.
सकाळी आणि संध्याकाळी हॅंड क्रिम लावण्यास विसरू नका –
हात आणि नखांची काळजी घेण्याचा सोपा उपाय म्हणजे दररोज रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर हाताला हॅंड क्रिमने मसाज करणे. आधीच सांगितल्याप्रमाणे कोरोनामुळे तुमचे शरीर डिहायड्रेट होत असते. या काळात जर तुम्ही हाताची अशी काळजी घेतली तर हाता आणि नखे कोरडे होणार नाहीत.
तेलाने करा मसाज
जर तुमच्याकडे चांगले मॉईस्चराईझर अथवा हॅंड क्रिम नसेल तर तुम्ही साध्या तेलानेही तुमच्या हाताची आणि नखाची काळजी घेऊ शकता. यासाठी दररोज रात्री झोपताना हात आणि नखांना नारळाचे तेल, बदामाचे तेल अथवा कोणतेही बॉडी ऑईल लावा. नखांची नियमित निगा राखली तर कोणत्याही आजारपणात तुमची नखे कधीच खराब होणार नाहीत. नखांचा ठिसूळपणा म्हणजे तुमच्या आरोग्यामध्ये झालेला बिघाड आहे हे वेळीच ओळखा.
कोरोना झाल्यावर अथवा कोरोनामधून बरं होताना तुम्ही जर नखांची अशी काळजी घेतली तर तुमच्या नखांचे सौंदर्य कधीच कमी होणार नाही. शिवाय नखं ठिसून असणं हे तुमचे आरोग्य बिघडल्याचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. तेव्हा नखांच्या ठिसूळ होण्यामधून तुमच्या आरोग्याची स्थिती ओळखा आणि वेळीच काळजी घेऊन आरोग्य सुधारा. यासोबतच तुम्हाला आम्ही शेअर केलेल्या या टिप्स कशा वाटल्या तेही कंमेट बॉक्समध्ये कळवा. तुम्हाला कोरोनामधून बरं होताना काय काय समस्या जाणवत आहेत आणि कोणत्या गोष्टींसाठी तज्ञ्जांचा सल्ला हवा हेही कळवा. ज्यामुळे योग्य मार्गदर्शनाने तुम्ही लवकर बरे व्हाल आणि निरोगी राहाल.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
केस आणि नखं मजबूत करण्यासाठी तुमच्या आहारात करा असे बदल
नखं कापताना कधीच करू नका या चुका
पावसाळ्यात मधुमेहींनी अशी घ्यावी पायाची काळजी