तुम्हालाही लांब केसांचा किंवा सध्याच्या लुकचा कंटाळा आला आहे का? तुमची केस शॉर्ट करायची इच्छा आहे का मग वाचा #POPxoMarathi च्या या टिप्स. आपल्या देशात लांबसडक, दाट आणि रेशमी केस हा स्त्रियांचा दागिना समजला जातो. पण हळूहळू ही विचारधारणा बदलत आहे. जर महिलांनी त्यांच्या केसांबाबत प्रयोग करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळेच लहान आणि स्टाईलिश हेअरकट्सना मागणी आहे. पण तरीही लग्नानंतर शॉर्ट केसांची हेअरस्टाईल असणाऱ्या महिलांकडे आश्चर्याने पाहिलं जातं. तरीही खाजगी आणि कौटुंबिक आयुष्यात जबाबदाऱ्या वाढलेली नोकरदार स्त्री बिनधास्तपणे शॉर्ट हेअरस्टाईलला पसंती देत आहे.
कोणता हेअरकट आहे योग्य?
जर तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुम्ही निसंकोच तुमचे केस छोटे करू शकता. इतर हेअरस्टाईल्सप्रमाणे शॉर्ट हेअरकट्स उदा. बॉब कट, पिक्सी कट आणि रेजर कट हे ओव्हल म्हणजेच अंडाकृती चेहऱ्यावर खूप छान दिसतात. जर तुमचा चेहरा अंडाकृती नसेल तर तुम्ही या कट्समध्ये थोडे बदल करून हे हेअरकट ट्राय करू शकता. ज्यांचं वय 20 च्या जवळपास आहे त्यांनी शॉर्ट हेअरकटमध्ये कलर्ड मोहोक, पंक लुक करून पाहा.
लक्षात घ्या – जेव्हा आपण लांब केसांचा मोह टाळून शॉर्ट हेअरकट करतात तेव्हा त्याची सवय होण्यास थोडा वेळ लागतो पण तरीही संकोच करू नका आणि स्वतःवर विश्वास ठेवा.
विगचा पर्याय
जर तुम्हाला आधी शॉर्ट हेअरकट कसा दिसेल हे पाहायचं असल्यास तुम्ही विगचा पर्याय ट्राय करू शकता. पण विग लावण्याआधी तुमचे केस हेअरनेट आणि हेअरपिनने बांधून घ्या. म्हणजे ते विगच्या बाहेर येणार नाहीत. हा पर्याय तुम्हाला केसांना कात्री लावायची नसल्यासही चांगला आहे.
केसांची काळजी आहे आवश्यक
केस शॉर्ट केले म्हणजे त्यांची काळजी घ्यावी लागत नाही, असं अजिबात नाही. शॉर्ट हेअरकट व्यवस्थित मेंटेन केल्यास तो कॅरी करणं सोपं होतं. त्यामुळे छोटे केस मेंटेन करण्यासाठी ठराविक आठवड्यांनी पार्लरमध्ये जाऊन ट्रिमींग नक्की करा.
या अभिनेत्रींनी बिनधास्त लावली केसांना कात्री
मराठीतील अभिनेत्री मृण्मयी देशपांडेनेही काही दिवसांपूर्वी आपल्या एका चित्रपटासाठी केसांना कात्री लावली होती. हा शॉर्ट हेअरकट मृण्मयीने खूप चांगला कॅरी केला होता.
तुम्ही शॉर्ट हेअरकटसाठी मंदिरा बेदी, लिझा रे या सेलेब्सकडून प्रेरणा घेऊ शकता. या सेलेब्स सुंदर दिसतातही आणि आपल्या शॉर्ट हेअरस्टाईल्सही मस्त कॅरी करतात. मंदिरा बेदीने खूप वर्ष आधी शॉर्ट हेअरस्टाईल केली होती आणि ती आजही व्यवस्थित कॅरी केली आहे. एवढंच नाहीतर तिने स्ट्रॅपी ब्लाऊज आणि साडीमध्येही ती शॉर्ट हेअरकटमध्ये सुंदर कॅरी केला होता. तिचा हा हेअरकट प्रसिद्ध हेअरस्टाईलिस्ट सपना भवनानी केला होता.
मग तुम्हीही बिनधास्त केसांना कात्री लावा आणि नवा लुक नक्की ट्राय करा. तुमचा हा अनुभव तुम्ही #POPxoMarathi सोबत शेअर करायला विसरू नका. लक्षात ठेवा बदल हा आवश्यक आहे, त्यामुळे त्याला घाबरू नका.
हेही वाचा –
पावसाळ्यात केसांच्या करा या झटपट हेअरस्टाईल आणि दिसा trendy
घरीच पार्लरप्रमाणे केस सेट करण्यासाठी फॉलो करा ‘या’ हेअर केअर टीप्स