मेकअप करणं ही कला आहे. ती अवगत करण्यासाठी तुम्हाला थोडेसे प्रशिक्षण घ्यावे लागते. पण तुम्ही करत असलेला मेकअप तुमच्यासाठी योग्य आहे की नाही याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? जसे कपडे निवडताना त्याची फिटींग, पॅटर्न आणि रंग हा तुम्ही फार निवडून, पारखून घेता. अगदी त्याचप्रमाणे तुम्ही करत असलेला मेकअप लुक तुम्ही जाणून घ्यायला हवा. तुमची त्वचा, तुमचे चेहऱ्यावरील फिचर यांचा विचार करुन तुम्ही तुमच्यासाठी खास मेकअप लुक जाणून घ्यायला हवा. त्यानुसारच तुम्ही मेकअप करायला हवा.
पाठीचा मेकअप करण्यासाठी बेस्ट मेकअप प्रोडक्ट
बघा तुमचे बेस्ट फिचर:
तुमचा चेहरा नीट निरखून पाहा. प्रत्येकाच्या चेहऱ्याचे काही हाय पॉईंट आणि लो पॉईंट असतात. काहींचे डोळे सुंदर असतात तर काहींचा ओठाचा भाग हा अधिक आकर्षक असतो. मेकअप करताना तुम्ही तुमचे हाय पॉईंट हायलाईट करा. त्यामुळे तुमचे लो पॉईंट हे झाकले जातात. आता अशा चेहऱ्यासाठी मेकअप करताना तुम्हाला या गोष्टी हायलाईट करणे गरजेचे असते. जसे की, तुम्ही डोळ्यांचा भाग अधिक हायलाईट करत असाल तर डोळ्यांना आयलायनर, काजळ योग्य पद्धतीने लावून ते हायलाईट करा. जर तुम्हाला तुमच्या चीक बोनला हायलाईट करायचे असेल तर तुम्ही गालाला हायलाईटर किंवा ब्लशर लावा. त्यामुळे तुमचे गाल अधिक चांगले दिसतील.
मास्क लावूनही असा टिकवता येईल मेकअप, मेकअप हॅक्स
त्वचेचा रंग
त्वचेच्या रंगावरही बऱ्याच गोष्टी या अवलंबून असतात. तुमचा त्वचेचा रंग हा तुमची अडचण नाही तर त्यावर शोभून दिसणाऱ्या परफेक्ट मेकअपलुक निवडीची तुम्हाला गरज आहे. जर तुमची त्वचा सावळी असेल तर तुम्ही त्वचेला साजेसा असा मेकअप निवडा. फाऊंडेशन, ब्लशर, लिपस्टिक,हायलायटर या सगळ्याची निवड तुमच्या स्किनटोन नुसार निवडा. उदा. त्वचा सावळी असेल तर मरुन रंगाचे टोन या त्वचेला अधिक चांगले दिसतात. जर तुम्ही खूप जास्त गडद असा मेकअप कराल तर तुम्हाला थोडा वॅम्प असा लुक येईल. स्किनटोन लाईट असलेल्यांनी ही खूप गडद मेकअप केला तरी हा लुक तुम्हाला थोडा बोल्ड आणि गॉडी मेकअप लुक देऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला नेमका कोणता मेकअप लुक हवा आहे त्यानुसार त्याची निवड असायला हवी.
मेकअप करताना
तुमचा अगदी कोणत्याही स्वरुपाचा कार्यक्रम असला तरी देखील काही गोष्टींचे भान हे मेकअर करताना करायलाच हवे. त्यासाठी काही टिप्स
- डोळे हा तुमच्या चेहऱ्याचा आकर्षक भाग असेल तर डोळ्यांना झाकणारा मेकअप करु नका. त्यामुळे तुमचे डोळे किती सुंदर आहेत ते दिसणार नाही.
- डोळ्यांना खूप मेकअप केला तरी देखील चेहरा हा तुलनेने खूप काळा दिसू लागतो. तुम्ही अगदी कोणत्याही कलर आयलायरनचा उपयोग केला तरी देखील तुमचे डोळे झाकू शकता.
- लिपस्टिकचा गडद रंग हा सगळ्यांनाच चांगला दिसत नाही. गुलाबी, लाल रंगाचे शेड वगळता चॉकलेटी रंगाच्या काही शेड्सही लिपस्टिकमध्ये चांगल्या दिसतात.
- हायलायटर ही नेहमीच लावण्याची गरज नसते. जर तुम्हाला चेहऱ्यावर काहीही लावायचे नसेल आणि फक्त चीक बोनला हलकाला ग्लो आणायचा असेल तर तुम्हाला फक्त हायलायटर किंवा ब्लशर लावण्यास काहीच हरकत नाही. त्यामुळेही तुमचा लुक उठून दिसतो.
सध्या सॉफ्ट ग्लॅम मेकअप हा अधिक ट्रेंडमध्ये आहे. त्वचेवर लाईट असा दिसणारा हा मेकअप लुक अधिक खुलून दिसतो.
आता तुम्हाला कोणता मेकअप लुक परफेक्ट दिसेल हे काही टिप्समधून लक्षात घ्या आणि मेकअप करा.
घरच्या घरी करा असा मेकअप जो तुम्हाला देईल प्रोफेशनल लुक (How To Do Makeup At Home In Marathi)
Read More From Make Up Trends and Ideas
चेहऱ्यावर असतील वांग तर असा करा मेकअप | Face Makeup For Freckles In Marathi
Leenal Gawade
मेकअप न आवडणाऱ्या मुलींसाठी सोप्या मेकअप टिप्स (Simple Makeup Tips In Marathi)
Vaidehi Raje
एचडी मेकअप आणि एअरब्रश मेकअपमध्ये काय आहे नेमका फरक
Trupti Paradkar