DIY सौंदर्य

असतील ओपन पोर्स तर वापरा सोप्या मेकअप टिप्स

Dipali Naphade  |  Nov 24, 2021
open pores

ओपन पोर्सची समस्या अनेक महिलांना असते. विशेषतः तेलकट त्वचा असणाऱ्या महिलांना ओपन पोर्सच्या (Open Pores) समस्येला अधिक सामोरे जावे लागते. जेव्हा महिला त्वचेवर मेकअप लावतात तेव्हा त्वचेवरील अर्थात चेहऱ्यावरील पोर्स गायब होत नाहीत. वास्तविक मेकअप लावल्यानंतर पोर्सचा आकार नक्कीच कमी होतो. पण तरीही अजिबात दिसायचे बंद होत नाहीत. अशा गोष्टींमुळे चेहऱ्यांची सुंदरता कमी होते आणि चेहऱ्याला कितीही मेकअप असला तरीही चेहरा खराब दिसतो. पण तुम्ही ओपन पोर्स काही मर्यादेपर्यंत लपवू शकता. पण तुम्ही मेकअप करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे. खरं तर तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, ओपन पोर्सची समस्या कधीच संपत नाही. पण काही घरगुती उपायांनी ही समस्या कमी करता येऊ शकते. विशेषतः मेकअप करण्यापूर्वी तुम्ही काही घरगुती उपाय केले तर ही तुम्हाला ओपन पोर्स असल्यास, या टिप्स नक्कीच कामी येतील. 

फेशियल आईसिंग (Facial Icing)

चेहऱ्यावर मेकअप लावण्यापूर्वी तुम्ही चेहऱ्याला फेशियल आईसिंग करायला हवे. यामुळे त्वचेवरील पोर्सचा आकार नैसर्गिकरित्या कमी होतो. फेशियल आईसिंग करण्याची पद्धतही सोपी आहे. 

या गोष्टीची काळजी घ्या की तुम्ही 5 मिनिट्सपेक्षा अधिक चेहऱ्याला आईसिंग करू नये. चेहऱ्याची त्वचा ही अधिक संवेदनशील असेल तर तुम्ही फेशियल आईसिंग करू नका. यामुळे तुम्हाला चेहऱ्यावर रॅशेस येऊ शकतात. इतकंच नाही तर फेशियल आईसिंग केल्यास, स्वच्छ कपडे आणि स्वच्छ पाण्याच्या बर्फाचाच वापर करा. 

फेसपॅक (Facepack)

फेशियल आईसिंगनंतर तुम्ही चेहऱ्याला फेसमास्क लावणे गरजेचे आहे. तुम्ही घरीच ओपन पोर्सची समस्या काही मर्यादेपर्यंत कमी करू शकता. हा फेसपॅक कसा बनवायचा हेदेखील आम्ही तुम्हाला सांगत आहोत. 

साहित्य 

बनविण्याची पद्धत 

फेशियल मसाज (Facial Massage)

फेसपॅकचा वापर केल्यानंतर बेबी ऑईलचे (Baby Oil) 2 थेंब हातावर घ्या आणि चेहऱ्याला मसाज करा. महत्त्वाचे म्हणजे ओपन पोर्सवाल्या त्वचेवर अत्यंत हळूहळू मसाज करावा. यामुळे पोर्सचा आकार लहान दिसतो.  

विशेष सूचना – कोणतेही उत्पादन त्वचेवर लावण्यापूर्वी तुम्ही चेहऱ्यासाठी आपला कोणता स्किन टाईप आणि टोन आहे यानुसार प्राईमर लावा. हे त्वचेवर सुरक्षा कवचाप्रमाणे काम करते आणि मेकअप अधिक आकर्षक बनवते. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य