DIY फॅशन

चिकनकारी साडी धुताना करू नका या चुका, रंग जाणार नाही

Dipali Naphade  |  Jul 4, 2022
tips-to-avoid-chikankari-saree-washing-mistakes-in-marathi

आजकाल चिकनकारीचे कपडे महिलांना अधिक आवडू लागले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात तर हे वापरायला चांगले असतातच. पण चिकनकारी सिल्क पावसाळ्यातही उत्तम ठरते. विशेषतः चिकनकारी साड्यांची फॅशन सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहे. पार्टी असो अथवा घरातील कोणतेही फंक्शन असो, कोणत्याही कार्यक्रमाला तुम्हाला चिकनकारी साडी (Chikankari Saree) नेसता येते. पण ही साडी धुण्यासाठी मात्र अनेकांना त्रास होतो. घरी धुता येत नसल्यामुळे बरेचदा साडी ड्राय क्लिंनिंगला द्यावी लागते. मात्र तुम्हाला चिकनकारी साडी घरी धुवायची असेल तर काही टिप्स (Chikankari Saree Washing Tips) आम्ही तुम्हाला देत आहोत. कारण ही साडी धुताना काही चुका झाल्यास, तुमची साडी खराब होऊ शकते. तुमची साडी वर्षानुवर्षे चांगली राहावी असं वाटत असेल तर तुम्ही चिकनकारी साडी धुताना ही काळजी नक्की घ्या. साडीची काळजी घेण्यासाठी करू नका या गोष्टी – 

फॅब्रिक डिटर्जंट न वापरण्याची चूक करू नका

Chikankari Saree – Instagram

तुम्हाला साडी धुताना नेहमी फॅब्रिक सॉफ्टनरचा वापर करायला हवा. कारण याचा नियमित वापर केल्यास, तुमच्या साडीचा रंगच टिकतो असं नाही तर साडी स्वच्छही राहाते. मात्र तुम्ही जर नॉर्मल पावडरचा उपयोग केला तर मात्र साडी खराब होऊ शकते. तुमच्या चिकनकारी साडीची स्वच्छता राखण्यासाठी तुम्ही फॅब्रिक सॉफ्टनरचा वापर न चुकता करावा. यामुळे साडीचे धागेही निघत नाहीत. 

मशीनमध्ये धुण्याची चूक करू नका 

तुम्ही चिकनकारी साडी नवीच्या नवी ठेऊ इच्छित असाल, तर कधीही ही साडी तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये धुऊ नका. जर तुमची साडी जड अथवा नवी असेल तर मशीनमध्ये टाकल्यावर ही साडी फाटण्याची शक्यता असते. कारण चिकनकारीचा कपडा थोडा वेगळा असतो. जितका जड तितकाच तो नाजूक असतो. तसंच चिकनकारीमध्ये अनेक लहान लहान भोकंदेखील असतात अथवा कटिंग वर्क असते. मशीनमध्ये धुतल्यावर साडीचे डिझाईन खराब होण्याचा धोकाही असतो. त्यामुळे तुम्ही चिकनकारी साडी हाताने आणि अगदी हलक्या हाताने धुऊन मग सुकवा. 

ब्रशचा वापर करू नका 

Chikankari Saree Washing Tips – Instagram

तुमची साडी जर जड असेल तर तुम्ही साडीला ब्रश लावल्यास तुमची साडी खराब होऊ शकते. ब्रश लावल्यास, साडीची एम्ब्रॉयडरी पूर्णतः खराब होते आणि तुम्ही चिकनकारी साडी पुन्हा नेसू शकत नाही. त्यामुळे तुम्ही साडी हातानेच धुणे उत्तम. वास्तविक तुम्ही यासाठी जर अगदी ब्रशचा वापर करू इच्छित असाल तर तुम्ही असा ब्रश निवडा ज्या ब्रशचे दात अजिबातच कडक नसतील, सॉफ्ट असतील आणि त्यामुळे धागे निघण्याची शक्यताही नसेल.  

गरम पाण्याचा वापर करू नका 

अनेकदा साडीवर डाग पडतो आणि मग अनेक जणी बादलीमध्ये गरम पाणी करून त्यात डिटर्जंट घालून साडी भिजवून ठेवतात. कारण महिलांना असे वाटते की, गरम पाण्यात असे डागाचे कपडे भिजवून ठेवले तर डाग लवकर निघून जातात. पण असं अजिबात नाही. डाग घालविण्यासाठी उपाय करताना तुम्ही चिकनकारी साडीबाबत अशी पद्धत वापरल्यास, तुमची साडी फाटेल हे लक्षात घ्या. त्यामुळे गरम पाण्याचा अजिबातच वापर करू नका. डाग घालविण्याचे घरगुती उपाय आहेत, त्यांचा उपयोग करा. 

चिकनकारी साडी धुताना तुम्ही या गोष्टींची विशेष काळजी घेतली, तर तुमच्या चिकनकारी कॉटन साडी अथवा चिकनकारी सिल्क साडीची चमक नेहमी तशीच राहील आणि रंगही जाणार नाही हे लक्षात घ्या.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY फॅशन