घर आणि बगीचा

बेडशीट्स खरेदी करताना लक्षात ठेवा या गोष्टी

Aaditi Datar  |  Dec 3, 2019
बेडशीट्स खरेदी करताना लक्षात ठेवा या गोष्टी

पूर्ण दिवस ऑफिस आणि घरातलं काम करून दमल्यावर तुम्हाला गरज असते ती शांततापूर्ण आरामाची. जो तुम्हाला मिळतो तुमच्या बेडरूमध्ये. जिथे दिवसभराच्या थकव्यानंतर बेडवर पाठ टेकवल्यावर डोळे मिटून पडलं की, बरं वाटतं. आपल्या बेडरूममधील प्रत्येक वस्तू आपण आपल्या कंफर्टप्रमाणे ठेवत असतो. पण यात व्यत्यय येऊ शकतो जर तुमची बेडशीट योग्य नसेल. त्यामुळे बेडशीटची निवड नेहमी विचारपूर्वक केली पाहिजे. कारण आपण बेडवर दिवसभरातील अनेक तास घालवतो. त्यामुळे बेडशीटही मऊ आणि कंफर्टेबल असणं आवश्यक आहे. म्हणूनच या लेखात आम्ही तुम्हाला देत आहोत बेडशीट खरेदीबाबतच्या काही टिप्स 

चूकून ही तुमच्या बेडजवळ ‘या’ वस्तू ठेऊ नका, होऊ शकतं नुकसान

ऋतू आणि आपल्या आवडीनुसार तुम्ही बेडशीटची निवड करा. कारण जी बेडशीट दुसऱ्यांच्या घरी चांगली दिसते, तिच तुमच्याकडेही सूट होईलच असं नाही. कारण प्रत्येक घराची रचना, रंग आणि लोकांची आवडही वेगळी असते. 

उन्हाळ्याच्या दिवसात कॉटन बेडशीट्सची निवड योग्य आहे तर थंडीच्या दिवसता तुम्ही सिल्क, सॅटीन किंवा लिननसारख्या बेडशीट्सचा वापर करू शकता. 

ज्या बेडशीट्स रोज वापरायच्या असतील त्या रिंकल फ्री असतील याची काळजी घ्या. कारण रोजच्या वापरासाठी रिंकल फ्री बेडशीट घेणं कधीही चांगलं आणि त्या सहज धुताही येतात. 

जेव्हा तुम्ही कॉटन बेडशीट्स खरेदी करता तेव्हा त्याच्या साईजकडेही विशेष लक्ष द्या. कारण कधी कधी धुतल्यानंतर चादरी आटतात. त्यामुळे चादर खोचणंही कठीण होतं. त्यामुळे बेडशीट्स खरेदी करताना माप आणि फॅब्रिकची निवड योग्य करा. जी बेडशीट तुम्हाला नीट खोचता येईल. आजकाल कॉटन बेडशीट्समध्येही खूप व्हरायटी मिळते. जसं प्युअर कॉटन, मिक्स कॉटन, नॉन-रिंकल कॉटन, हँडलूम कॉटन इ. 

बेडरूमला सुंदर बनवण्यासाठी आणि लक्झरी लुक देण्यासाठी रंगसंगतीचं कॉर्डिनेशनही महत्वाचं आहे. खोलीतील स्‍टाईल आणि रंग लक्षात ठेवून बेडशीट्स खरेदी करा. काही जण बेडशीट्स खरेदी करताना रंगसंगतीकडे लक्ष देत नाहीत. हे जर इतकं महत्त्वाचं नसलं तरी बेडशीट आणि कलर कॉर्डिनेशनमुळे तुमच्या बेडरूमच्या लुकमध्ये नक्कीच फरक पडतो.. 

कधी कधी खास समारंभाच्या निमित्ताने तुम्ही वेलवेट किंवा सिल्क बेडशीट्सचाही वापर करू शकता. जसं लग्न, सणवार किंवा पार्टी असल्यास असे पर्याय तुम्ही वापरू शकता. यामुळे तुमच्या बेडरूमला नक्कीच क्लासी लुक मिळेल. 

बेडरूमसाठी फॉलो करा या वास्तू टीप्स

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

हेही वाचा 

टॉप 10 आयडियाजमुळे तुमचं बेडरूम दिसेल अधिक सुंदर!

 

Read More From घर आणि बगीचा