Fitness

घोरण्याच्या आवाजाने असाल त्रस्त, तर वापरा या ट्रिक्स

Dipali Naphade  |  Dec 23, 2019
घोरण्याच्या आवाजाने असाल त्रस्त, तर वापरा या ट्रिक्स

बऱ्याचदा जोडप्यांमध्ये घोरण्यामुळे त्रस्त असल्याच्या तक्रारी ऐकू येत असतात.  काही वेळा तर एखाद्याचा घटस्फोट केवळ घोरण्याच्या त्रासाने झाल्याच्या बातम्याही वाचायला मिळतात. तुम्हाला जर असं वाटत असेल की, घोरत असणाऱ्या व्यक्तींना चांगली झोप लागते,  तर असं काहीही नाही. ज्या व्यक्ती घोरतात त्यांची झोप खरं तर खराब असते आणि ही समस्या सतत राहिली तर स्लीप अॅपनिया नावाचा आजार होण्याची शक्यता बळावते. स्लीप अॅपनिया हा तणाव आणि चिडचिडेपणाचं मुख्य कारण ठरतो. तुमची घोरण्याची समस्या जास्त झाली तर यामुळे तुमचा श्वास अडकण्याचीही शक्यता असते. झोपताना घोरण्याचं मुख्य कारण म्हणजे नशा, कोलेस्ट्रॉलची वाढ, तणाव अथवा हार्मोनलमध्ये होणारे बदल हे असतं. तसंच तुम्हाला काही शारीरिक आजार अर्थात सायनस, सर्दी – खोकला असे काही आजार असतील तर घोरण्याची समस्या असते. पण तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या अथवा अन्य कोणत्याही व्यक्तीच्या घोरण्याने त्रस्त असाल तर तुम्ही काही टिप्स फॉलो करू शकता ज्यामुळे तुम्हाला शांत झोप लागू शकेल. आम्ही तुम्हाला इथे काही महत्त्वाच्या टिप्स देणार आहोत त्या जाणून घ्या आणि घोरण्याच्या आवजातून सुटका मिळवा. 

घोरण्याच्या आवाजातून मिळवायची असेल तर सुटका तर वापरा या ट्रिक्स

प्रत्येक घरात कोणी ना कोणतरी अशी व्यक्ती असतेच ज्यांना घोरण्याची सवय असते. पण ती सवय मुद्दाम लावून घेतलेली नसते. पण त्यामुळे तुमच्या आजूबाजूंची झोप खराब होत असते. मग अशावेळी नक्की काय ट्रिक्स वापरायच्या ते पाहूया – 

1. पुदीन्याच्या तेलाचा करा प्रयोग

Shutterstock

तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी जर 4-5 थेंब एक ग्लास कोमट पाण्यात पुदीन्याच्या तेलाचे घातले आणि त्याने गुळण्या केल्या तर तुम्हाला यातून लवकरच सुटका मिळू शकते. हा अतिशय सोपा आणि सहजपणाने करता येणारा उपचार आहे. तुम्ही आठवडाभर हा उपाय नक्की करून पाहा.  

2. मिठाच्या पाण्याच्या करा गुळण्या

Shutterstock

गळा आणि नाकाच्या नळीला क्लिअर करण्यासाठी आणि त्यातील सूज काढून टाकण्यासाठी तुम्ही मीठ मिसळलेल्या कोमट पाण्याने गुळण्या करा. घोरण्याचा त्रास गळ्यातील आणि नाकातील नळी चोकअप असल्यामुळेही होतो. त्यावरील हा उत्तम उपाय आहे. घोरण्याचा आवाजाने तुम्ही त्रस्त झाला असाल तर तुमच्या जोडीदाराला या सोप्या आणि अप्रतिम उपायाबद्दल सांगा आणि त्यांच्याकडून हा उपाय करून घ्या.  

3. मधाचं सेवन करा

Shutterstock

तुम्हाला स्वतःला अथवा तुमच्या जोडीदाराला घोरण्याचा त्रास असेल तर झोपण्यापूर्वी एक चमचा मध रोज तुम्ही खा. यामुळे तुमच्या गळ्याला आराम मिळेल आणि घोरण्याचा त्रास निघून जाईल. मधामुळे घशातील खवखवदेखील बंद होते. ज्याचा परिणाम  शांत झोप लागण्यावर होतो. 

तुम्हाला झोपायला आवडतं?, मग जाणून घ्या झोपण्याची योग्य पद्धत

4. आल्याचं पाणी प्या

Shutterstock

एक कप पाण्यामध्ये आलं किसून घाला आणि हे पाणी उकळवून घ्या.  आता हे गॅसवरून उतरवल्यानंतर त्यामध्ये तुम्ही एक चमचा मध मिसळा. हे मिश्रण तुमच्या घशासाठी उत्तम उपाय ठरतं. त्यामुळे घसा साफ राहून तुम्हाला रात्री झोपल्यानंतर घोरण्याचा त्रास होत नाही. तुम्ही हे पाणी रोज प्यायला हवं. त्यामुळे तुम्हाला घोरण्याचा त्रास होणार नाही. 

5. ऑलिव्ह ऑईलचा करा वापर

Shutterstock

रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही रोज एक चमचा ऑलिव्ह ऑईल कोमट पाण्यात मिसळा आणि हे कोमट पाणी प्या. हा उपाय तुमचा घोरण्याचा त्रास कमी करण्यासाठी उपायकारक आहे. यामुळे तुमच्या घशाला आराम मिळतो आणि रात्री झोपही चांगली लागते. 

दिवसभर झोप येत असेल तर नक्की ट्राय करा ‘या’ टिप्स

6. वाफ घेणं करा सुरू

Shutterstock

घोरण्याचा त्रास हा घशातील त्रासामुळे खरं तर होत असतो.  त्यावरील उत्तम उपाय म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही गरम पाण्याची वाफ रोज घेणं सुरू करा. यामुळे नाक आणि घशातील कफ साफ होऊन तुमचा श्वास व्यवस्थित काम करेल आणि सायनसच्या रूग्णांसाठी हा उपाय उत्तम आहे. त्यामुळे तुम्हाला रात्री झोपेत घोरण्याचा त्रास होणार नाही.  

7. लसूणच्या तेलाची करा मालिश

Shutterstock

रोज झोपण्यापूर्वी तुम्ही 2-4 लसणीच्या पाकळ्या मोहरीच्या तेलामध्ये शिजवून घ्या आणि मग हे कोमट तेल तुम्ही छाती आणि गळ्यावर लावून मालिश करा. तुमच्या घशातील आलेली सूज अथवा श्वास घेण्यासाठी त्रास होत असेल तर त्यातील सूज कमी करण्यास याचा फायदा मिळतो. त्यामुळे घोरण्याचा त्रासही कमी होतो. 

झोपेत घोरण्याचा त्रास होत असेल, तर करा हे घरगुती उपाय

8. एका बाजूला झोपण्याची सवय लावा

Shutterstock

ज्या लोकांना सायनसचा त्रास आहे अथवा घोरण्याचा त्रास आहे त्यांनी एका बाजूला अर्थात कुशीवर झोपण्याची सवय लावून घ्या. अशा लोकांना पोटावर न झोपता पाठीवर झोपण्याची सवय लावून घेतलेली चांगली. त्यामुळे व्यवस्थित श्वास घेता येऊन घोरण्याचा त्रास होत नाही.  

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

Read More From Fitness