खाणंपिण आणि नाइटलाईफ

बिस्किटे आणि स्नॅक्स नरम पडू नये यासाठी असे करा स्टोअर

Trupti Paradkar  |  Aug 30, 2021
बिस्किटे आणि स्नॅक्स नरम पडू नये यासाठी असे करा स्टोअर

दोन जेवणाच्या मध्ये मधल्या वेळी खाण्यासाठी अथवा चहा, कॉफीसोबत बिस्किटे, कुकीज, स्नॅक्स खाण्याची पद्धत आहे. यासाठी घरात बऱ्याचदा विविध प्रकारचे स्नॅक्स बनवले जातात अथवा बाजारातून स्नॅक्स विकत आणून ठेवले जातात. चिवडा, चकली, चिप्स, बाकरवडी असे स्नॅक्स आणि बिस्किटे घरात असतील तर आयत्या वेळी आलेल्या पाहुण्यांसमोर पाहुणाचार करतानान फजिती होत नाही. मात्र पावसाळ्यात अशा गोष्टी जास्त प्रमाणात भरून ठेवल्या तर त्या नरम पडण्याची शक्यता असते. वातावरणातील दमटपणामुळे बिस्किटे आणि स्नॅक्स लवकर नरम पडतात. बिस्किटे आणि स्नॅक्स कुरकुरीत असतील तरच छान लागतात. नरम पडल्यास अशा गोष्टी फेकण्याशिवाय पर्याय नसतो. शिवाय ओलाव्यामुळे अशा वस्तूंना बुरशी देखील येते. यासाठी आधीच या गोष्टी साठवून ठेवताना काही टिप्स लक्षात ठेवायला हव्या.

पॅकिंग उघडल्यावर ते तसेच ठेवू नका –

अनेकांना बिस्किट अथवा स्नॅक्सच पाकिट उघडल्यावर ते तसंच गुंडाळून ठेवण्याची सवय असते. एकदा पॅकिंग उघडलं की त्यातील पदार्थांचा हवेशी संबध येतो  आणि त्या गोष्टी खराब होतात. यासाठीच पाकिट उघडल्यावर त्यातील उरलेली बिस्किटे आणि खाऊ एखाद्या हवाबंद डब्यात भरा अथवा पाकिटाला हवाबंद करणारी क्लिप लावा. बाजारात आजकाल अशा प्रकारच्या क्लिप सहज मिळतात.

प्लास्टिकच्या  डब्यात ठेवू नका –

लक्षात ठेवा जर तुम्ही एखाद्या हवाबंद कंटेनरमध्ये बिस्किटे अथवा खाऊ ठेवणार असाल तर तो डबा प्लास्टिकचा नसावा. त्याऐवजी काचेचा हवाबंद डबा वापरा. कारण प्लास्टिकच्या बरणीत बिस्किटे लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामानाने काचेच्या बरणीत खाऊ जास्त काळ टिकतो.

बिस्किटांपासून बनवा मस्त केक, बिस्किट केक रेसिपी (Biscuit Cake Recipes In Marathi)

घरात ओलसर जागी साठवून ठेवू नका –

बिस्किट आणि स्नॅक्स साठवून ठेवण्याची जागा ओलसर अथवा दमट नसावी. जसं की किचनमध्ये सिंकजवळ, जमिनीवर, खिडकीमध्ये अथवा पाण्याजवळ अशा वस्तू ठेवू नयेत. कारण अशा ठिकाणी बिस्किटे लवकर नरम पडतात आणि त्यांना बुरशी लागते. यासाठीच बिस्किटे, स्नॅक्स एखाद्या हवाबंद बरणीत भरा आणि किचनच्या कोरड्या रॅकमध्ये ठेवा. 

आहारात का असावा खपली गहू, जाणून घ्या फायदे

सर्व खाऊ एकत्र ठेवू नका –

काही जणांना खाऊच्या एकाच डब्यात सर्व स्नॅक्स ठेवण्याची सवय  असते. ज्यामुळे पटकन सर्व वस्तू हाताशी येतात. मात्र यामुळे तुमची बिस्किटे आणि इतर खाऊ खराब होऊ शकतो. कारण प्रत्येक पदार्थामधील कोरडेपणा आणि त्यासाठी वापरण्यात आलेले पदार्थ निरनिराळे असतात. यासाठी प्रत्येक पदार्थ छोट्या छोट्या पण वेगवेगळ्या हवाबंद बरणीत ठेवा. 

फ्रेंच फ्राईज कसे झाले तयार, वाचा मजेशीर इतिहास

Read More From खाणंपिण आणि नाइटलाईफ