Eye Make Up

लहान डोळे मोठे आणि आकर्षक दिसण्यासाठी मेकअप टिप्स

Trupti Paradkar  |  Feb 1, 2021
लहान डोळे मोठे आणि आकर्षक दिसण्यासाठी मेकअप टिप्स

काहींना त्यांच्या शारीरिक अवयवांबाबत खूपच न्यूनगंड असतो. नाक, कान, डोळे, ओठ हे प्रत्येकाचे निरनिराळ्या आकाराचे असू शकतात. तुमचे डोळे लहान असो वा मोठे काहीच फरक पडत नाही. कारण तुम्ही मेकअपच्या मदतीने ते मोठे आणि आकर्षक करू शकता. काही लुकमध्ये मोठे डोळे अधिक आकर्षक वाटतात. मात्र जर तुमचे डोळे तसे मोठे नसतील तर तुम्ही ते या मेकअप टिप्सने मोठे करू शकता. आय मेकअप करताना या टिप्स फॉलो करा आणि दिसा सुंदर.

पापण्या कर्ल करायला विसरू नका

डोळे मोठे दिसण्यासाठी तुम्ही तुमच्या पापण्यांना कर्ल करायला हवं. कारण यामुळे तुमच्या लुकमध्ये खूप बदल जाणवेल. पापण्या कर्ल केल्यामुळे डोळ्यांना एक आकार मिळतो ज्यामुळे ते मोठे आणि आकर्षक दिससू शकतात. यासाठी आयलॅश कर्लरने पापण्या कर्ल केल्यावर त्यावर लावायला मात्र विसरू नका. पापण्यांवर मस्काराचे दोन ते तीन कोट लावा शिवाय खालच्या पापण्यांवरही मस्कारा अवश्य लावा. त्यानंतर काजळ लावल्यावर तुमचे डोळे नेहमीपेक्षा वेगळे जाणवू लागतील. 

कन्सिलरचा वापर करा

डोळ्यांखालचा भाग सुंदर दिसण्यासाठी तुम्हाला आय मेकअप करताना कन्सिलर लावणं गरजेचं आहे. ज्यामुळे तुमच्या डोळ्यांखाली आलेले डार्क सर्कल्स कमी होतील आणि डोळे खोलगट न वाटता आकर्षक दिसू लागतील. कन्सिलर लावल्यावर त्यावर सेटिंग पावडर लावा ज्यामुळे कन्सिलर सेट होईल आणि चेहऱ्यावर इतर भागावर पसरणार नाही. 

shutterstock

फार जाड आय लायनर लावू नका

जर तुमचे डोळे बारीक असतील तर तुम्हाला आय मेकअप करताना ही गोष्ट लक्षात ठेवायलाच हवी. कारण लहान डोळ्यांवर जाड आय लायरन चांगले दिसत नाही. जाड आय लायनरमुळे तुमचे डोळे अधिक लहान दिसू लागतील. यासाठीच पातळ आयलायनर लावा. शिवाय आयलायनरचा स्ट्रोक टोकापर्यंत द्यायला विसरू नका. डोळ्यांच्या आतील कोपऱ्यावर तुम्ही पांढऱ्या रंगाचं आयलायनर लावा. डोळे मोठे दिसण्यासाठी योग्य रंगाचं आयलायनर लावा. 

योग्य आयशॅडो निवडा

जर तुमचे डोळे मोठे दिसावे असं तुम्हाला वाटत असेल तर आयमेकसाठी आयशॅडो निवडताना काळजी घ्या. यासाठी लाईट अथवा एखादी न्यूड शेड नक्कीच फायदेशीर ठरेल. कारण डार्क रंगामुळे तुमचे डोळे अधिकच बारीक आणि खोल वाटतील. पापण्या आणि ब्रो लाईन हायलाईट करण्यासाठी पेस्टल रंगाच्या आयशॅडोचा वापर करा. डोळे मोठे दिसण्यासाठी खालच्या भागावरही आयशॅडो लावा.

खालच्या पापणीवर आयलायनर लावा

डोळे अधिक मोठे आणि आकर्षक करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. यासाठी खालच्या पापणीवर बाहेरच्या दिशेने आय लायनर लावा. स्मजर ब्रशच्या मदतीने ते थोडं स्मज करा. कारण खालच्या पापणीवर अशा प्रकारे  काजळ अथवा आय लायनर लावण्या मुळे तुमचे  डोळे मोठे दिसतील. 

shutterstock

सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला परमेश्वराने जे सौंदर्य दिलं आहे ते अप्रतिम आहे त्यामुळे त्याचा आदर राखा. डोळे ही एक अनमोल देणगीच परमेश्वराने दिलेली आहे. त्यामुळे ते लहान, मोठे अथवा कोणत्याही आकाराचे असू दे. मेकअप करणं ही एक कला आहे. त्यामुळे त्या कलेने तुम्ही निरनिराळे लुक करून फक्त तुमच्या सौंदर्यामध्ये अधिक भर घालणार आहात. मुळातच जर तुमचं मन आनंदी आणि समाधानी असेल तर ते तुमच्या चेहऱ्यावर दिसतंच. तेव्हा या काही मेकअप टिप्स फॉलो करा आणि अधिक आकर्षक दिसा. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

डार्क सर्कल्स नको असतील तर आय मेकअप करताना घ्या ही काळजी

या पद्धतीने लावा लिपस्टिक ग्लासवर नाही लागणार डाग

डोळ्यांच्या रंगानुसार का निवडायला हवा आयलायनरचा रंग

Read More From Eye Make Up