DIY लाईफ हॅक्स

दिवसभराचे नियोजन आखताय… स्वतःसाठी वेळ काढायला विसरु नका!

Dipali Naphade  |  Jan 15, 2021
दिवसभराचे नियोजन आखताय... स्वतःसाठी वेळ काढायला विसरु नका!

मागच्या वर्षातील अनेक आव्हान, महामारी, आर्थिक मंदीने ग्रासलेल्या एका दुःखद वर्षानंतर अनेकांना नैराश्याचा सामना करावा लागत आहे. या 10 महिन्यांच्या कालावधीचे काहींनी अचूक नियोजन केले तर काहींना अजूनही या परिस्थितीशी जुळवून घेता आलेले नाही. आपल्याकडे असलेली सर्वात मौल्यवान संपत्ती म्हणजे वेळ. आपल्या प्रियजनांबरोबर वेळ घालवण्यासाठी सर्वांनाच आवडेल परंतु आजच्या हा व्यस्त जीवनशैलीमुळे हे अशक्य झाले आहे. प्रत्येकाने वेळेचे महत्त्व जाणून वेळेचे भान पाळलेच पाहिजे. स्वत:साठी पुरेसा वेळ देणे ही देखील काळाची गरज ठरली आहे. नेहमीच घड्याळ्याच्या काट्यांबरोबर धावताना कधीतरी थांबून आपण स्वतःसाठी पुरेसा वेळ देत आहोत का हे नक्की विचारा, आपण आहोत म्हणून हे जग आहे याचा विसर पडू देऊ नका. खरं तर आपण आपल्यासाठी वेळ काढतच नाही. विशेषतः महिला. यासाठीच आंतरराष्ट्रीय स्तरावर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सुजाता साळवी यांनी काही महत्त्वाच्या बाबी आमच्यासह शेअर केल्या आहेत. त्या खास तुमच्यासाठी. हे वाचल्यावर नक्की याचा विचार करा.

बेकिंग सोड्याचा उपयोग करा सफाईसाठी, महागड्या उत्पादनांपेक्षा उत्तम सफाई

स्वतःसाठी वेळ काढल्याचा फायदा

Shutterstock

दिवसातून किमान एक तास जरी तुम्ही स्वतःसाठी काढू शकत असाल तर त्याचा फायदा नक्कीच तुम्हालाच होणार आहे. वयाच्या २० वर्षापासून मी दिवसातील किमान एक तास स्वतःसाठी राखून ठेवायला हवा. हा संपूर्ण वेळ फक्त स्वतःसाठी असल्याने त्यातून मिळणारा आनंद स्वतःला उपभोगता येतो. सुरुवातीला महाविद्यालयीन शैक्षणिक, करिअरकडे फोकस करणे अशा कारणांमुळे स्वतःसाठी वेळ काढणे कठीण होते पण त्यानंतर मात्र स्वतःला पुरेसा वेळ देण्याचा संकल्पच करायला हवा. संसारातील ही आव्हानं पेलताना अनेकदा स्वतःसाठी वेळ देणे शक्यच होत नाही. काहींना स्वतःसाठी वेळ देणे हे स्वार्थी किंवा मूर्ख कृत्य वाटू शकते परंतु ज्यांनी वेळेचे अचूक नियोजन आखले आहे त्यांना मात्र याचे महत्त्व नक्कीच कळू शकते.

स्वयंपाकघरातील चिकट टाईल्स चमकविण्यासाठी सोप्या टिप्स

काही सोप्या टिप्स

स्वतःसाठी थोडा वेळ राखून ठेवावा यासाठी काही सोप्या टिप्स सुजाता साळवी यांनी सांगितल्या आहेत. तुम्हीही तुमच्या दिवसाचं नियोजन आखताना या टिप्सचा वापर करून घेऊ शकता. 

आपण या नवीन वर्षात या पर्यायाचा नक्की वापर कराल अशी आम्हालाही  आशा आहे. या मी टाईममध्ये स्वतःचं परीक्षण करा, आपण कुठं कमी पडतोय का, आपण काय चांगलं करतोय आणि आणखी काय चांगलं करू शकतोय याची जाणीव आपल्याला या वेळी नक्कीच होईल.पण स्वतःसाठी रोज वेळ काढायला विसरू नका. कारण त्यामुळेच तुम्ही स्वतःचीही प्रगती करू शकता. 

नैसर्गिक पद्धतीने घर निर्जंतूक करण्याच्या सोप्या टिप्स

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY लाईफ हॅक्स