DIY फॅशन

कोणत्या कपड्यांसह वापरावी कोणती पँटी, जाणून घेणे आहे आवश्यक

Dipali Naphade  |  Apr 7, 2022
tips-to-wearing-these-panties-under-different-outfits-in-marathi

महिलांच्या फॅशन आऊटफिट्समध्ये पँटी (Panty) हा एक अनिवार्य भाग आहे. प्रत्येक महिलेला पँटी ही घालावीच लागते. पण याबाबत अगदी खुलेपणाने बोलायला आजही महिला कचरतात. ब्रा आणि पँटी या अगदी वैयक्तिक बाबी आहेत. पण अनेकदा कोणत्या कपड्यांसाठी कोणती पँटी घालावी हे अनेक महिलांना कळत नाही आणि त्यामुळे बरेचदा चुकीची पँटी घातल्याने कपड्यांमधून त्याचा आकार दिसतो आणि मग अनेक महिलांना लाज वाटते. त्यामुळे कोणत्या कपड्यांमध्ये कोणती पँटी घालायला हवी हे प्रत्येक मुलीला – महिलेला माहीत असायला हवे. यामध्ये लाज बाळगण्यासारखे काहीच नाही. तुम्हाला याची महत्त्वाची माहिती आम्ही देत आहोत. तुम्हीही या टिप्सचा वापर करून तुमच्या वॉर्डरोबमध्ये योग्य पँटीचा समावेश करून घ्या. कारण पँटी ही तुम्हाला आराम देण्यासह तुमचा लुक सुधारण्यासाठीही मदत करते. त्यामुळे तुमच्या आऊटफिट्सप्रमाणे तुम्हाला पँटीची निवड करायला हवी. वास्तविक वेगवेगळ्या ट्रेंडसह पँटी घालणे आणि त्याची निवड करणे थोडेसे कठीण होते. तुम्हालाही निवड करणे कठीण जात असेल तर तुम्ही हा लेख नक्की वाचा. 

बॉयशॉर्ट्स पँटी (Boyshorts Panty)

बॉयशॉर्ट्स ही अशी पँटी आहे जी नॉर्मल पँटीपेक्षा लांबीला थोडी मोठी असते. बॉयशॉर्ट्स पँटी अत्यंत आरामदायी असल्यामुळे अनेक महिलांना ही पँटी घाणे अधिक सोयीस्कर वाटते. पण ही पँटी तुम्ही प्रत्येक ड्रेसमध्ये घालू शकत नाही. कारण ही लांब असते आणि ती तुमच्या पायात अडकू शकते. ही पँटी त्या महिलांसाठी उत्तम आहे ज्या नेहमी शॉर्ट स्कर्ट अथवा शॉर्ट ड्रेस, वनपिस घालतात. कारण बॉयशॉर्ट्स पँटी या टाईट ड्रेसच्या खाली घातल्यास, तुमच्या शरीराला बारीक दर्शविण्याचे अर्थात स्लीम लुक देण्याचे काम करतात. 

बिकिनी पँटी (Bikini Panty)

बॉयशॉर्ट्सशिवाय बाजारामध्ये बिकिनी पँटी मिळते, जी अधिक आरामदायी मानली जाते. ही पँटी तुम्हाला अनेक फॅब्रिकमध्ये मिळते. तुम्ही तुमच्या आवडी आणि आरामानुसार याची खरेदी करू शकता. पण अनेक महिला ही पँटी फिटिंग कपडे अथवा जीन्ससह घालतात. कारण ही पँटी घातल्यानंतर जीन्स अथवा कपड्यांमधून तुमच्या पँटीचा आकार बाहेरून दिसत नाही. पण यामध्ये तुम्ही पातळ कॉटन असणारी बिकिनी पँटी वापरा, जेणेकरून तुम्हाला अधिक वेंटिलेशन मिळेल आणि आरामही मिळेल. त्याशिवाय योनीजवळ कोणताही त्रास होणार नाही आणि रॅश येणार नाहीत. 

थाँग्स पँटी (Thongs Panty)

बिकिनी पँटीशिवाय तुम्हाला थाँग्ज नावाचे अंडरगारमेंट्स (Undergarments) बाजारामध्ये दिसून येतात. महिलांची सर्वात जास्त आवडती अंडरवेअर असून महिलांना या पँटीमध्ये अधिक आरामदायी वाटते. कोणत्याही आऊटफिट्समध्ये वापरता येईल अशी ही पँटी आहे. थाँग्ज घातल्यानंतर महिलांना केवळ आरामच मिळतो असं नाही तर ही पँटी नेटची आणि पातळ असते त्यामुळे त्वचेला घासत नाही. ही कोणत्याही कपड्यांसह घालू शकता. पण तुम्ही फिटिंगचे कपडे घालत असाल तर ही अप्रतिम आहे. विशेषतः छोटे कपडे घालायचे असतील तर याचा वापर करा. 

हिपस्टर्स पँटी (Hipsters Panty)

ही पँटी तुम्ही नियमित अगदी रेग्युलर वापरासाठी घेऊ शकता. कारण हे केवळ आरामदायीच नाही तर कोणत्याही ड्रेससह घालू शकता. वास्तविक महिलांना मासिक पाळीच्या दिवसात अशा पँटी घालणं सोयीस्कर ठरते. तुम्हाला अनेक तऱ्हेच्या हिपस्टर्स मिळतील पण तुम्ही अशा पँटी फ्रॉक, गाऊन अथवा कोणत्याही वेस्टर्न ड्रेससह घातल्यात तर अधिक चांगले ठरेल. ही पँटी चांगली असून याचे चांगले कव्हरेज मिळते. जीन्स, लेगिंग्ज याखाली तुम्ही ही घालू शकता. 

फ्रेंच कट पँटी (French Cut Panty)

या अंडरवेअरशिवाय फ्रेंच कट पँटीदेखील असते, ज्याचा आकार फ्रेंच कटप्रमाणे असतो. ही पँटी आरामदायी असून उन्हाळ्याच्या दिवसात वापरणे अधिक सोयीस्कर ठरते. या पँटीला हायकट पँटी असंही म्हटलं जातं. वास्तविक 80 व्या दशकापासून ही प्रसिद्ध पँटी आहे. विविध आऊटफिट्सह ही पँटी वापरता येते. तुम्हाला या पँटीचा वापर करायचा असेल तर हायवेस्ट जीन्स अथवा हायवेस्ट फ्लेअर्ड पँट्सह तुम्ही घालू शकता. 

याशिवाय वेगवेगळ्या पँटी बाजारामध्ये मिळतात. पण आपल्या आऊटफिट्सप्रमाणे याची योग्य निवड तुम्ही करावी. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY फॅशन