मनोरंजन

तारक मेहता.. मधील नट्टू काका यांचे निधन

Leenal Gawade  |  Oct 4, 2021
नट्टू काका यांचे निधन

काही मालिका या प्रेक्षकांच्या मनात कायम घर करुन राहतात. अशीच एक मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेले कित्येक वर्ष ही मालिका प्रेक्षकांच्या मनात राज्य करत आहे.  या मालिकेतील अनेक चेहरे प्रेक्षकांच्या मनात बसलेले आहेत. यातील एक चेहरा म्हणजे नट्टू काका. जेठालालच्या दुकानात काम करणारे नट्टू काका… शेठजी शेठजी म्हणत त्याचा सगळा डोलारा सांभाळणारे नट्टू काका म्हणजेच अभिनेते घनश्याम नायक यांचे निधन झाले आहे. ते 76 वर्षांचे होते. कॅन्सरवरील दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले असून मालिकेच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. आता या पुढे  हे पात्र या मालिकेत घनश्याम नायक साकारणार नाहीत. त्यामुळे मालिकाकर्तेही दु:खी झाले आहे.

दयाबेनची रिप्लेसमेंट नाही पण सध्या ही दयाबेन होतेय हिट

कॅन्सरने निधन

Instagram

काहीच महिन्यांपूर्वी घनश्याम नायक यांचे कॅन्सरचे निदान झाले होते. त्यामुळे काही काळासाठी ते मालिकेतून गायबही झाले होते. त्यांच्याशी अनेक मीडिया हाऊसने संपर्क साधल्यानंतर त्यांनी त्यांची तब्येत बरी असल्याचे म्हटले होते. महिन्यातून एकदा त्यांची किमोथेरपी सुरु होती. सुरुवातीला ते मालिकेत नव्हते. पण जून महिन्यात त्यांनी पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली. त्यांनी मालिकेत काम सुरु केले. इलाज सुरु होता. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत होती. रविवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याच्या बातमीने सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला. त्यांच्यासोबत मालिकेत काम कऱणाऱ्या अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या जाण्याने मालिका आणि गढा इलेक्ट्रॉनिक्स अर्धवट आहेत अशीही प्रतिक्रिया दिली आहे. कालपासून घनश्याम यांच्यावर सोशल मीडियावरुन श्रद्धांजली वाहिली जात आहे. त्यांचे अनेक विनोदी व्हिडिओज व्हायरलही होताना दिसत आहे. 

आयुष्यात केला स्ट्रगल

घनश्याम नायक यांनी त्यांच्या आयुष्यात बरेच स्ट्रगल केले आहे. अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम करताना त्यांना प्रसिद्धी मिळाली असली तरी देखील त्यांना पैसा मिळू शकला नाही. घर चालवण्यासाठी लागणारा पैसा मिळवण्याची खूप खटपट त्यांना करावी लागली. त्यांच्या सुरुवातीच्या काळात पैशाअभावी त्यांनी उधारावर पैसे देखील घेतले. पण ज्यावेळी त्यांना तारक मेहता ही मालिका मिळाली. त्यानंतर मात्र त्यांचे दिवस चांगलेच पालटले. त्यांना चांगला पैसा आणि प्रसिद्धी मिळू लागली. त्यांची मिळकत वाढल्यामुळे कुटुंब चालवणे त्यांना सोपे जाऊ लागले. त्यांना पैसे मिळवण्यासाठी जो खटाटोप करावा लागला.त्यानंतर त्यांना आपल्या मुलांनी या क्षेत्रात येऊ नये अभिनय करु नये असे सतत वाटले. वयाच्या 50शी नंतरही त्यांनी बरेच काम केले आहे. त्यांच्यासारखा स्ट्रगल फारच कमी लोकांच्या नशीबी आला असेल 

तारक मेहता का उल्टा चष्माला तेरा वर्षे पूर्ण

तरीही हसरा चेहरा

आयुष्यात सगळं काही आलंबेलं नसतानाही या माणसाचा चेहरा कधीही रडका नव्हता. ही व्यक्ती समोर येऊन आपले दु: ख कोणाकडेही मांडत नव्हती. उलट आयुष्य सकारात्मक कसे जगायचे ते त्यांनी दाखवले. आजारपणातही त्यांनी काम करणे काही सोडले नाही. स्क्रिनवर अगदी थोडाचवेळ ते दिसत होते. त्यामुळे ते आजारी आहेत ते कळत होते. पण तरीदेखील त्यांनी त्यांचे दु:ख कधीही दाखवले नाही. 

आता नटू काकाशिवाय गढा इलेक्ट्रॉनिक्स काहीही नाही. हीच पोचपावती नटू काकांनी त्यांच्या या स्ट्रगल लाईफमधून मिळाल्याचे समाधान त्यांनाही नक्कीच असेल .

बॉलीवूड आणि ड्रग्ज कनेक्शन, आजवर या सेलिब्रेटींची नावे आली आहेत पुढे

Read More From मनोरंजन