लाईफस्टाईल

होळीच्या दिवशी धमाल करण्यासाठी बॉलीवूडची टॉप 16 होळीची गाणी (Bollywood Holi Songs)

Dipali Naphade  |  Mar 13, 2019
होळीच्या दिवशी धमाल करण्यासाठी बॉलीवूडची टॉप 16 होळीची गाणी (Bollywood Holi Songs)

होळी म्हटलं की रंगांचा सण. हा सण सर्वांचाच आवडता सण आहे. केवळ रंगांनी रंगून न जाता यावेळी अनेक गाण्याच्या तालावरही लोक नाचतात. होळी हा आपल्या बॉलीवूड चित्रपटांचादेखील आवडता सण आहे. अनेक होळीची गाणी अगदी पूर्वीपासून चित्रीत करण्यात आली आहेत. ही होळीची गाणी तुम्हा आम्हा सर्वांनाच अत्यंत प्रिय आहेत. प्रत्येक होळीला या गाण्यांच्या तालावर नाचत आपल्या प्रियजनांबरोबर होळी खेळण्यात मजा येते. कोणती आहेत ही बॉलीवूडची लोकप्रिय गाणी याची एक आठवण आम्ही तुम्हाला करून देत आहोत. तुम्हीदेखील यावर्षी तुमच्या मित्र – मैत्रीणी आणि कुटुंबाबरोबर या गाण्यांच्या तालावर नाचून तुमची यावर्षीची होळी अधिक मजेदार बनवू शकता.

बॉलीवूडमध्ये होळीला विशेष महत्त्व

बॉलीवूडमध्ये नेहमीच होळी सण आणि होळीच्या शुभेच्छा यांना विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. बऱ्याच चित्रपटांमध्ये तर खास होळीसाठी गाणंही तयार करण्यात आलं आहे. हिरो आणि हिरॉईनची केमिस्ट्री दाखवण्यासाठी बऱ्याचदा होळी या सणाचा आधार घेऊन बॉलीवूडमध्ये गाणी तयार करण्यात आली आहेत. प्रेक्षकांनाही ही गाणी खास ठेका धरायला लावतात. अर्थात होळी हा आनंदाचा सण असल्यामुळे आणि मस्तीचा सण असल्यामुळे होळीची सगळीच गाणी ही ठेका धरायला लावणारी असतात. अगदी जुन्या चित्रपटांपासून ते नव्या चित्रपटांपर्यंत प्रत्येक गाणं हे प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून बसलं आहे. शिवाय प्रेक्षक या गाण्यांशी यामुळे जोडले जातात कारण होळी खेळत नाही अशी माणसं विरळाच असतात. बऱ्याच लोकांना हा सण रंगाची उधळण असल्यामुळे आणि या सणाच्या दिवशी अधिक आपलेपणा असल्यामुळे साजरा करायला आवडतो. त्यामुळे बॉलीवूडमधील होळींच्या गाण्यांशीही प्रेक्षक लगेच समरस होतो असं म्हणावं लागेल. शिवाय या गाण्यांवर आपोआपच ठेका धरला जातो असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. या सणामुळे अनेकांची मनं जोडली गेली असल्याचीही उदाहरणं आहेत हे नक्की. 

वाचा – होळी-रंगपंचमी सणाला आणतील बहार ही मराठमोळी गाणी

1. बलम पिचकारी जो तूने मुझे मारी (ये जवानी है दीवानी)

2. गोरी तू लठ मार (टॉयलेट एक प्रेम कथा)

Also Read Marathi Wedding Songs In Marathi

3. बद्री की दुल्हनिया (बद्री की दुल्हनिया)

4. होली खेले रघुबीरा अवध में, होली खेले रघुबीरा (बागबान)

5. रंग बरसे, भीगे चुनर वाली रंग बरसे (सिलसिला)

6. डू मी ए फेवर, लेट्स प्ले होली (वक्त – द रेस अगेंस्ट टाइम)

7. नजरों के कट्टे से मारे तू गोली रे (जॉली एलएलबी -2)

8. सोनी…सोनी..आजा माही वे (मोहब्बतें)

9. अंग से अंग लगाना, सनम हमें ऐसे रंग लगाना (डर)

वाचा – श्रावणात घन निळा (Lata Mangeshkar Marathi Songs)

10. होली आई रे (मशाल)

11. होली के दिन दिल खिल जाते हैं (शोले)

https://youtube.com/watch?v=-GPAzK1hMfg

 

12. ओ मेरी पहले से तंग थी चोली (सौतन)

13. आई है आज तो, होली खेलेंगे हम (इलाका)

https://youtube.com/watch?v=exqqZdQCP_g

वाचा – रंगपंचमीसाठी खास कोट्स

14. जोगीजी, हां जोगीजी (नदिया के पार)

15. आज न छोड़ेंगे बस हमजोली, खेलेंगे हम होली (कटी पतंग)

https://youtube.com/watch?v=7z_33lMboxk

16. होली में हौले- हौले दिल डोले (इंसान)

https://youtube.com/watch?v=boolqL_PX5Y

Video Courtsey – Youtube 

हेदेखील वाचा – 

होळीसाठी खास गोडधोड पदार्थांच्या मेजवानीसाठी रेसिपी

Happy Holi Quotes in Hindi

रंगपंचमीची संपूर्ण माहिती 

Read More From लाईफस्टाईल