फॅशन

पारंपरिक बांगड्यांच्या एव्हरग्रीन डिझाईन्स

Leenal Gawade  |  Sep 23, 2021
पारंपरिक बांगड्याच्या डिझाईन्स

लग्नसोहळे आले की,मुलीकडच्यांची चांगलीच लगबग सुरु होते. कारण बरेच जण सोन्याचे दागिने आधीच घडवून ठेवत नाही. मुलीला आवडतील असे दागिने करुन देण्यासाठी बरेच जण थांबतात. आता मुलीला दागिने करायचे म्हणजे साधारणपणे हार, बांगड्या, मंगळसूत्र, बाजूबंद, नथ असे काही प्रकार अगदी आवर्जून आले. पण दागिन्यांचे सगळेच प्रकार रोज घालता येत नाहीत. त्यातल्या त्यात बांगड्या हा असा प्रकार आहे जो अगदी रोज घातला किंवा एखाद्या कार्यक्रमात घातला तरी पुरेसा असतो. हल्ली बरेच जण पारंपरिक दागिन्यांना अधिक पसंती देतात. बांगड्यामध्ये असे प्रकार आहेत जे एव्हरग्रीन आहेत असे डिझाईन्स तुम्ही सोन्यात घडवल्यानंतर ते तुम्हाला एव्हरग्रीनच दिसणार 

पिछोडी

Instagram

सगळ्यात शेवटी घातली जाणारी बांगडी म्हणून ज्याची ओळख आहे त्याला पिछोडी असे म्हणतात. ही बांगडी  क्राऊनसारखी दिसते. म्हणजे याच्या मागच्या भागात  वेगवेगळ्या पद्धतीच्या कात्र्या असतात. त्यामुळे ही बांगडी दिसायला खूपच सुंदर दिसते. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स मिळतात.  तुमचा हात गोलाकार आहे की बारीक यानुसार तुम्ही तुमच्या बांगड्याचा आकार निवडायला हवा. म्हणजे त्या बारीक हव्या की जाड हे तुम्हाला माहीत असायला हवे. सोनार तुम्हाला याच्या उत्तम डिझाईन्स दाखवू शकतील आणि तुम्ही त्या निवडू शकाल.

शिंदेशाही तोडे

Instagram

तोडे हा प्रकार ही खूप भरीव आणि भरगच्च असा दिसतो. शिंदेशाही तोडे हे तुम्ही अगदी आरामात ऐकले असेल. तोडे हे तुम्हला हव्या त्या वजनात बनवून मिळू शकतात. शिंदेशाही तोडे हा त्यातल्या एक प्रकार आहे. पण याला तोडे असे म्हटले जाते. तोडे हे थोडे जाड असतात. त्यामुळे जर तुम्ही हिरव्या बांगड्या घालणार असाल तर त्यामध्ये शिंदेशाही तोडे हे फारच सुंदर आणि आकर्षक दिसतात. त्यामुळे तुम्ही असे तोडे निवडा. तोड्यामध्ये तुम्हाला पानं,फुलं अशी डिझाईन्स असते.जी दिसायला फारच सुंदर दिसते.

मराठमोळ्या पारंपरिक दागिन्यांनी खुलू शकतो नववधूचा शृगांर

पाटल्या

Instagram

 पाटल्या या तुम्हाला आई आणि आजीच्या दागिन्यांची आठवण करुन देईल. पण पाटल्या या एव्हरग्रीन अशा डिझाईन्स आहेत. पाटल्या या कोणत्याही बांगड्यांमध्ये फार सुंदर  दिसतात. त्यांचा आकार एकदम चपटा असा असतो. त्यावर वेगवेगळ्या डिझाईन्स असतात. पाटल्यांवर तुम्हाला फुलं, लक्ष्मी किंवा पाना फुलांच्या डिझाईन्स मिळतात. त्यामुळे तुम्ही पाटल्या या अगदी हमखास तुमच्या सोन्याच्या घडवायलाच हव्यात. जर तुम्ही साशंक असाल तर तुम्ही आधी खोट्या बांगड्या घालून बघा आणि मग त्यानंतर सोन्यात घडवा.

आता या पारंपरिक बांगड्याच्या या डिझाईन्स तुम्ही अगदी हमखास बनवा आणि ट्राय करा.

Read More From फॅशन