DIY फॅशन

#wfh साठी निवडा ट्रेंडी नाईटवेअर

Leenal Gawade  |  May 20, 2021
#wfh साठी निवडा ट्रेंडी नाईटवेअर

कोरोना काळामुळे वर्क फ्रॉम होमची आपल्या सगळ्यांनाच सवय लागली आहे. पण या दिवसात एक वाईट सवय लागली आहे तो म्हणजे आळशीपणा… सगळेच आळशी झाले आहेत. एका जागीच बसून काम करायचं असतं म्हणून खूप जणं घरातलेच कपडे घालून काम करायला बसतात. आता घरात आणि ऑफिसमध्ये वावरताना कपड्यांमधील हा फरक काम करणाऱ्यासाठी जरी सुखावणारा असला तरी ऑनलाईन मिटिंगसाठी असे कपडे मुळीच चांगले वाटत नाही. अशावेळी कपाटात जाऊन कपडे शोधण्यापेक्षा तुम्ही असेच नाईटवेअर निवडा जे तुम्हाला आरामदायी असतील आणि झूम मिटिंगमध्येही चालू शकतील. गेल्या कित्येक वर्षांमध्ये नाईट सूटमध्ये इतकी क्रांती झाली नसेल पण आता मात्र यामध्ये इतके वेगळे आणि ट्रेंडी प्रकार आले आहेत की प्रत्येक महिलेने हा प्रकार नक्कीच ट्राय करायला हवा असा आहे.

उन्हाळ्यात आरामदायी ठरतील ‘ब्रा’चे हे प्रकार

कॉटन शॉर्ट कुडती आणि पँट सेट

Instagram

नाईटवेअर मधील हा प्रकार सध्या खूपच जास्त ट्रेंडमध्ये आहे. कॉटन असल्यामुळे असे नाईटवेअर फारच मुलायम वाटतात. या खाली असलेली पायजमा पँटसुद्धा तितकीच चांगली दिसते. आपण इतरवेळी जे कॉटन कुडते घालतो तसेच पण थोडे रिलॅक्स असे हे कुडते असतात. साधारण यामध्ये तुम्हाला जयपूर प्रिंटस पाहायला मिळते. या प्रिंटस अधिकच सुंदर दिसतात. जर तुम्हाला अचानक एखाद्या मीटिंगला बसायचे असेल तरी देखील हा प्रकार खूपच चांगला दिसतो. त्यामुळे तुम्ही अगदी टिपटॉप दिसता. त्यामुळे असा हा कॉटन नाईटवेअर घालायला काहीच हरत नाही. हल्ली खूप ठिकाणी याच्या वेगवेगळ्या व्हरायटी मिळतात. तुम्ही ऑनलाईनपद्धतीनेही हे असे ड्रेस नक्कीच मागवू शकता. जे खूपच सुंदर दिसतात.

प्लेन साडीवर शिवा हेवी ब्लाऊज, अशी करा निवड

शर्ट ड्रेस नाईट वेअर

Instagram

जर तुम्हाला पँट्स घालायला आवडत नसतील अशांसाठी मोकळा असा पर्याय म्हणजे या नाईटवेअरचा. एखाद्या गाऊनप्रमाणेच हे नाईटवेअर असतात. पण त्याचा वरचा भाग हा थोडासा फॉर्मल शर्टसारखा असतो त्यामुळे तुम्ही शर्ट घातला आहे असे दिसते. हे असे नाईटवेअर कॉटन आणि होजिअरी मटेरिअलमध्ये मिळतात. जर तुम्हाला अशा प्रकारचे कपडे निवडायचे असतील तर  तुम्ही त्यामध्ये कमीत कमी प्रिंटचे कपडे निवडा. त्यामुळे ते अधिक फॉर्मल आणि चांगले दिसू लागतात. 

चोकर सेट जे वाढवतील तुमच्या गळ्याची शोभा

शर्ट स्टाईल नाईट ड्रेस

Instagram

शर्ट ड्रेसप्रमाणेच असलेला हा एक प्रकार टू पीसमध्ये येतो. हा प्रकारही दिसायला चांगला  दिसतो. कॉटन मटेरिअलमध्येही तुम्हाला असे ड्रेस मिळतात. जे तुम्हाला झूम मीटिंगसाठी एकदम परफेक्ट आहे . यामध्ये शर्टचे असे काही पर्याय येतात जे दिसायला एखाद्या फार्मल शर्टसारखे असतात.ज्यामुळे तुम्ही एखाद्या मीटिंगला पटकन हजर राहू शकता किंवा त्यावरच जॅकेट चढवू शकता. हे असे कपडे एकदम चांगले दिसतात. यामध्ये तुम्ही शॉर्टसचा पर्यायही निवडू शकता.  

 

आता तुम्हाला नाईटवेअरचा हा पर्याय ट्राय करायला काहीच हरकत नाही जे तुम्हाला तुमच्या बोअरींग कपड्यापासून थोड्या काळासाठी नक्कीच सूट देतील. 

Read More From DIY फॅशन