Recipes

दिवाळीत पहिल्या दिवशी नक्की करुन पाहा हे काही पदार्थ

Leenal Gawade  |  Oct 24, 2019
दिवाळीत पहिल्या दिवशी नक्की करुन पाहा हे काही पदार्थ

दिवाळी हा सण असतोच खास…दारासमोर रांगोळी काढली जाते. पणत्या लावल्या जातात. मस्त आकाशकंदील लावून रोषणाई केली जाते. दिवाळीच्या दिवसाचे आणखी एक खासियत म्हणजे दिवाळी फराळ. लाडू, चकली, करंजी, अनारसे, शेव असे अनेक पदार्थ केले जातात. पण दिवाळीच्या पहिल्या दिवशी काही खास पदार्थ करण्याची पद्धत ही आहे. म्हणजे दिवाळीत नरकचतुर्थीच्या दिवशी आंघोळ केल्यानंतर सकाळी फराळासोबत काही खास पदार्थ केले जातात.तुम्ही जर हे पदार्थ कधीच ट्राय केले नसतील तर आज आपण अशाच काही पदार्थांच्या रेसिपी पाहुयात. तसंच भाऊबीज च्या शुभेच्छा देतानाही भाऊबीजेच्या दिवशीही तुम्ही हे पदार्थ करून पाहू शकता.

 यंदाच्या दिवाळीला बनवा खास, शेअर करा दिवाळीच्या शुभेच्छा खास

गुळ पोहे

Instagram

इतरवेळी केले जाणारे पोहे आणि गुळ पोहे यामध्ये अगदी थोडासाच फरक आहे. हे पोहे झटपट तयार होतात. कोकणात अनेक ठिकाणी हा पदार्थ केला जातो. 

साहित्य : लाल पोहे किंवा साधे पोहे, गुळ, मीठ, खोबरं, वेलची पूड

कृती:  फोडणीच्या पोह्यासाठी ज्या प्रमाणे आपण पोहे भिजवा. पोह्यामध्ये चवीपुरतं मीठ, किसलेलं गुळ( तुम्हाला किती गोड आवडत त्यानुसार) ,वर खोबरं भुरभुरा.त्यात थोडी वेलची पूड घालून पोहे सर्व्ह करा. 

रवा ढोकळा

Instagram

आता तुम्ही म्हणाल की, ढोकळा कोण खात असेल पण फराळासोबत ढोकळ्याची चवही छान लागते. अनेक घरांमध्ये ढोकळा हा इतर दिवशीही करतात. दिवाळीच्या दिवशीही सकाळी तुम्ही मस्तपैकी ढोकळा करु शकता. 

साहित्य:  एक कप रवा, चार चमचे दही, तेल, बेकींग सोडा, आलं, बेकींग पावडर, मोहरी, मिरची, मीठ 

कृती: एका भांड्यात रवा घेऊन त्यात किसलेलं आलं, दही, एक मोठा चमचा तेल घालून मिश्रण एकजीव करुन घ्या. साधारण अर्धा कप पाणी घाला.. आता तयार ढोकळ्याचे बॅटर एका  तेल लावलेल्या भांड्यात घ्या. जर बॅटर खूप घट्ट झाले असेल तर थोडे पाणी घाला. गॅसवर पाणी गरम करायला घ्या. पाणी उकळल्यानंतर तुम्ही तयार बॅटरमध्ये मीठ घाला. बेकींग सोडा आणि बेकींग पावडर घालून जास्त न ढवळता. बॅटर ग्रीस केलेल्या भांड्यात घ्या आणि ढोकळा वाफवायला घ्या. साधारण 20 मिनिटे हा ढोकळा शिजवून घ्या. भांडं थंड होण्याची वाट पाहा. नंतर सुरी घालून ढोकळा शिजला का तपासा. ढोकळ्याने जर कडा सोडल्या असतील तर भांडे उलटून ढोकळा काढून घ्या. छान जाळीदार ढोकळा तयार होईल. आता तुम्हाला फोडणीची तयारी करायची आहे. तेल गरम करुन त्यात मोहरी, मिरची घाला. तयार फोडणी ढोकळ्यावर टाका. तुमचा रवा ढोकळा तयार

दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणून केले जाते अभ्यंगस्नान

दडपे पोहे

Instagram

आता दडपे पोहे हा पदार्थ आपम नेहमीच खातो. पण दिवाळीच्या दिवसात गोड पदार्थांसोबत दडपे पोहेही खायला चांगले वाटतात. 

साहित्य: पोहे, कांदा, ओलं खोबरं, साखर, मीठ, फोडणीसाठी तेल, मोेहरी, जीरं, हिंग, हळद, मिरची

कृती: पोहे चाळून घ्या. त्यात भरपूर कांदा, ओलं खोबरं, साखर, मीठ घालून एकजीव करुन घ्या. फोडणीच्या भांड्यात तेल गरम करुन त्यात मोहरी, जीर, हिंग, हळद घालून गॅस बंद करा.गरम तेलात मिरची घालून मिश्रण एकजीव करुन सर्व्ह करा दडपे पोहे खा. 

खांडवी

Instagram

आता खांडवी हा पदार्थ ही खायला एकदम लाईट आहे. पण तोंडाला चव आणणारा आहे. त्यामुळे तुम्हाला सकाळी सकाळी खांडवी करायलाही काहीच हरकत नाही. 

साहित्य:  एक कप बेसन, एक कप आंबट ताक, दोन वाट्या पाणी, आलं आणि हिरव्या मिरचीची पेस्ट, मीठ, हळद, किंचितशी साखर

फोडणीसाठी साहित्य: तेल, मोहरी, मिरची, ओलं खोबरं, कढीपत्ता

कृती: एका भांड्यत बेसन घ्या. त्यात एक कप आबंट ताक घालून त्यात दोन वाट्या पाणी घाला. त्यात आलं-हिरव्या मिरचीची पेस्ट, मीठ, हळद आणि किंचितशी साखर घालून तुम्हाला मिश्रण एकजीव करुन घ्यायचे आहे. 5 मिनिटं मिश्रण बाजूला ठेवून तुम्हाला मिश्रण चाळून घ्यायचे आहे. म्हणजे खांडवी करताना तुम्हाला त्रास होणार नाही. तयार मिश्रण एका कुकरच्या भांड्यात घेऊन त्याच्या 3 ते 7 शिट्ट्या काढून घ्या.  कुकर उघडून तुम्हाला बॅटर चांगले बीट करुन घ्यायचे आहेत. गरम गरमच तुम्हाला त्याचे रोल करुन घ्यायचे आहेत. हे रोल करायला सोपे पडतात. 

ढोकळ्याप्रमाणे तुम्हाला फोडणी द्यायची आहे आणि त्यावर तुम्हाला ओलं खोबरं घालायचे आहे. 

मग आता फराळासोबत हे पदार्थ नक्की ट्राय करा.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

Read More From Recipes