DIY सौंदर्य

चेहरा धुताना फॉलो करा या स्किन केअर टिप्स

Trupti Paradkar  |  Jul 28, 2021
चेहरा धुताना फॉलो करा या स्किन केअर टिप्स

चेहरा नियमित धुतल्यामुळे त्वचा स्वच्छ आणि टवटवीत होते. मात्र यासाठि दिवसभरात किती वेळा आणि कसा चेहरा धुवावा हे  प्रत्येकाला माहीत असायला हवा. कारण जर चेहरा धुताना जर तुमच्याकडून एखाादी चूक झाली तर त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. चेहरा नियमित धुतल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील धुळ, माती, प्रदूषण, मेकअपचे कण, डेड स्किन, घाम निघून जातो. मात्र यासाठी तुम्हाला हे स्किन केअर रूटिन फॉलो करायला हवे.

चेहरा धुण्यासाठी परफेक्ट स्किन केअर 

चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी तो दिवसभरात कमीत कमी दोन वेळा धुवावा मात्र धुताना हे स्किन केअर फॉलो करायला विसरू नका.

हात स्वच्छ धुवा –

चेहरा धुण्यासाठी जर तुम्ही अस्वच्छ हातांचा वापर केला तर तुमच्या त्वचेचे जास्त नुकसान होऊ शकते. यासाठी चेहरा धुण्यापूर्वी हात स्वच्छ करणे खूप गरजेचे आहे. यासाठी चेहरा धुण्यापूर्वी ही गोष्ट आवर्जून पाळा.

मेकअप रिमूव्ह करा –

हात स्वच्छ धुतल्यानंतर चेहऱ्यावरील मेकअप काढायला विसरू नका. तुम्ही जरी साधी लिपस्टिक, काजळ लावलं असेल तरी ते व्यवस्थित काढून मगच चेहरा धुण्याची तयारी करायला हवी. यासाठी चांगल्या मेकअप रिमूव्हरने आधी मेकअप काढा. बदाम तेलापासून अशी बनवा नाईट क्रिम, त्वचा दिसेल चमकदार

पाणी थंड की गरम –

चेहरा धुण्यासाठी तुम्ही कोणते पाणी वापरता हेही खूप महत्त्वाचे आहे. अनेकींना वाटते गरम पाण्याने चेहरा धुतल्यास तो अधिक लवकर स्वच्छ होतो असं मुळीच नाही चेहरा धुण्यासाठी कधीच गरम पाण्याचा वापर करू नये. नेहमी कोमट अथवा साध्या पाण्याने चेहरा धुवावा. वाचा मधाचा वापर करून चेहऱ्यावरील मुरूमं करा दूर

चांगल्या गुणवत्तेचे फेसवॉशच वापरा –

आजकाल बाजारात विविध प्रकारचे  फेसवॉश मिळतात. त्यामुळे चेहरा हार्श साबणाने कधीच धुवू नका. शिवाय तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार योग्य क्लिंझर अथवा फेसवॉश निवडा आणि चेहरा स्वच्छ करा. यासोबत जाणून घ्या फेसपॅक लावूनही येत नाही चेहऱ्यावर ग्लो, हे आहे कारण

स्वच्छ आणि मऊ टॉवेल –

चेहरा धुण्याप्रमाणेच चेहरा पुसण्यासाठी  तुम्ही काय वापरता हे महत्त्वाचे आहे. कारण कठीण कापडाच्या हार्श टॉवेलने रगडून त्वचा पुसल्यामुळे ती कोरडी होते मात्र त्वचेवर रॅशेस आणि पुरळ येण्याची शक्यता असते. यासाठी स्वच्छ सूती अथवा टर्किशच्या टॉवेलने चेहऱ्यावरील पाणी टिपून घ्या आणि चेहरा कोरडा करा.

चांगले मॉईच्सराईझर वापरा –

चेहरा स्वच्छ करणे म्हणजे चेहरा धुणे आणि पुसणे इतकंच मर्यादित नाही. चेहरा पुसल्यावर तो कोरडा झाल्यावर त्वचेचे पोषण करणाऱ्या चांगल्या मॉईस्चराईझरने चेहऱ्याला मालिश करायला हवी. यासाठी एखादे चांगले स्किन ऑईल, सीरम अथवा क्रिम त्वचेवर लावा  आणि गोलाकार बोटं फिरवत ते त्वचेत मुरवा. 

चेहरा धुताना या गोष्टी ठेवा लक्षात –

Read More From DIY सौंदर्य