Ayurveda

सौंदर्य खुलविण्यासाठी फॉलो करा ’20’ आयुर्वेदिक ब्युटी टीप्स

Trupti Paradkar  |  May 14, 2019
सौंदर्य खुलविण्यासाठी फॉलो करा  ’20’ आयुर्वेदिक ब्युटी टीप्स

भारतीय संस्कृतीत आयुर्वेद शास्त्राला फार महत्त्व आहे. आता तर भारताप्रमाणे परदेशातदेखील आयुर्वेद शास्त्र लोकप्रिय होत आहे. आजकाल वाढते प्रदूषण आणि कामाचा ताण यामुळे अनेक आरोग्य समस्या, सौंदर्य समस्या निर्माण होतात. मात्र आयुर्वेदात यावर अनेक उपाय आहेत. ज्यामुळे तुम्ही या समस्यांपासून सुटका करून घेऊ शकता. आयुर्वेद हे एक नैसर्गिक शास्त्र आहे. त्यामुळे या लेखातून आपण  सौंदर्य समस्यांवरील उपाययोजनांचा विचार करणारच आहोत. त्याशिवाय जीवनशैलीमध्ये काही  ठराविक बदल करून सुंदर आणि निरोगी त्वचा कशी मिळेल हे ही पाहणार आहोत. हे उपाय तुम्ही तुमच्यया दैनंदिन जीवनशैलीत नक्कीच करू शकता.

सुंदर आणि नितळ त्वचेसाठी 20 आयुर्वेदिक टीप्स – 20 Ayurvedic Lifestyle Tips for Skin

जर तुमची जीवनशैली निरोगी असेल तर त्याचे चांगले परिणाम तुमच्या आरोग्य आणि चेहऱ्यावर दिसतात. चुकीच्या जीवनशैलीमुळे कमी वयातच तुमच्या चेहऱ्यावर एजिंगच्या खुणा दिसू लागतात. यासाठी निसर्गनियमानुसार जगणं फार गरजेचं आहे. कारण शरीर निसर्गातून निर्माण झालेलं असतं आणि ते निसर्गनियमानुसार चालतं. यासाठी निसर्गचक्राचा आदर करत काही गोष्टींमध्ये योग्य बदल केल्यास तुम्हाला फायदाच होऊ शकतो.

Sundarta Quotes in Marathi

1. संतुलित आहार (Proper Diet)

पुरेसा आणि संतुलित आहार तुमच्या आरोग्यस्वास्थासाठी गरजेचा आहे. यासाठीच नियमित योग्य आहार घेण्याबाबत सावध रहा. मात्र आहारज्ञान असूनही आपण दिवसभर अपथ्यकारक गोष्टींचे सेवन करत असतो. अन्नामुळे तुमच्या शरीराला मुबलक उर्जेचा पुरवठा होतो. मात्र अन्न जर चुकीच्या कॉम्बिनेशनमध्ये सेवन केलं तर त्याच अन्नाचं विष तयार होऊ शकतं. सुंदर त्वचेसाठीदेखील या गोष्टीची विशेष काळजी घेणं  गरजेचं आहे. कारण काही पदार्थ्यांच्या एकत्र केलेल्या सेवनामुळे तुम्हाला त्वचा समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. यासाठी दूध आणि फळे अथवा दूध आणि मटण,चिकन कधीच एकत्र खाऊ नका.

2. रात्री लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठा (Early to Bed and Early to Rise)

असं म्हणतात ‘लवकर निजे आणि लवकर उठे त्यास आरोग्यआयु लाभे’ यासाठी पूर्वीच्या काळी रात्री लवकर झोपून पहाटे उठण्याची प्रथा होती. आता मात्र आपल्या बदलेल्या चुकीच्या सवयींचे परिणाम चेहरा आणि आरोग्यावर दिसू लागले आहेत. रात्री उशीरापर्यंत लॅपटॉपवर काम करणं, फोनवर चॅट करणं यामुळे पफी आईज, डार्क सर्कल्स, सुरकुत्या अशा सौंदर्य समस्या निर्माण होतात. जर तुम्हाला सकाळी उठल्यावर फ्रेश दिसावं असं वाटत असेल तर रात्री उशीरा झोपणं बंद करा. रात्री कमीत कमी सात ते आठ तास झोप घेणं फार गरजेचं आहे.

3. हर्बल टी प्या

दिवसभर शरीर हायड्रेट राहण्यासाठी सतत पाणी पिणं फार गरजेचं  आहे. पण सतत पाणी पिण्याचा कंटाळा येत असेल तर काही वेळा हर्बल टी तुम्ही नक्कीच घेऊ शकता. यासाठी तुम्ही दिवसभरात एक दोन वेळी कॅमोमाईल टी, ग्रीन टी, जिंजर टी अथवा लेमन टी घेऊ शकता. यामुळे तुमची पचनशक्ती सुधारेल. जर तुमचे आरोग्य चांगले असेल तर त्याचा योग्य परिणाम तुमच्या त्वचेवरदेखील दिसू लागतो.

4. नियमित व्यायाम करा (Excersise)

व्यायामामुळे तुमचे शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहते. ह्रदयाचे कार्य उत्तम राहण्यासाठी व्यायाम करणं फार गरजेचं आहे. ह्रदय निरोगी असेल तर रक्ताभिरसण व्यवस्थित होतं. ज्याचा परिणाम तुमच्या त्वचेवरदेखील होतो. शरीरातील सर्व त्वचापेशींना रक्ताचा आणि ऑक्सिजनचा योग्य पुरवठा झाल्याने तुमची त्वचा फ्रेश दिसते. नितळ आणि चमकदार त्वचेसाठी दिवसातून कमीत कमी अर्धा तास व्यायामासाठी अवश्य द्या.

5. मेडीटेशन (Meditation)

मेडीटेशन आणि त्वचेचा काय सबंध असं तुम्हाला वाटत असेल तर लक्षात ठेवा सुंदर त्वचेसाठी मेडीटेशन फार गरजेचं आहे. कारण मेडीटेशनने तुमचे मन शांत आणि निवांत होते. यामुळे तुमच्या मेंदूला रक्त आणि ऑक्सिजनचा मुबलक पुरवठा होतो. शांत आणि प्रसन्न मनात सकारात्मक विचार येतात. ज्याचा परिणाम तुमच्या शरीराला पॉझिटिव्ह ऊर्जा मिळते. ताण-तणाव कमी होतो. याचा चांगला परिणाम तुमच्या चेहरा आणि त्वचेवर होतो. चेहरा  फ्रेश आणि त्वचा नितळ दिसण्यासाठी दिवसातून कमीत कमी पंधरा ते वीस मिनीटे मेडीटेशन करा.

6. सुकामेव्याचा आहारात समावेश करा (Consume Dry Fruits)

आयुर्वेदानुसार स्वस्थ आणि चमकदार त्वचेसाठी सुकामेवा आहारात असणे गरजेचे आहे. सुकामेव्यामध्ये मुबलकप्रमाणात ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि फायबर असतात. यामुळे तुमच्या त्वचेला चांगले पोषण मिळते. दररोज मुठभर बदाम, काजू, मनुका आणि अक्रोड खाण्यामुळे तुम्ही सुंदर आणि फ्रेश दिसाल. मात्र लक्षात ठेवा हे प्रमाण मुठभरच असावे कारण अतीप्रमाणात सुकामेवा खाण्याचा तुमच्या आरोग्यावर चुकीचा परिणाम होऊ शकतो.

7. साखर आणि मीठाचे प्रमाण आहारात कमी करा  (Limit Sugar and Salt Intake)

काही लोकांना अती प्रमाणात साखर आणि मीठ असलेले पदार्थ खाण्याची सवय असते. जर तुम्हालादेखील अशी सवय असेल तर आजच ती बदला. कारण आयुर्वेदानुसार या पदार्थांच्या अतीसेवनामुळे शरीरातील लवचिकता कमी होते आणि शरीर कडक होतं. त्वचा कडक आणि कोरडी झाल्यास ती रखरखीत दिसते. यासाठीच या पदार्थांचे सेवन शक्य तितके कमी करा. शिवाय या पदार्थांमुळे तुम्हाला रक्तदाब अथवा मधूमेहाच्या आरोग्यसमस्या निर्माण होऊ शकतात.

8. अती कडक उन्हात फिरू नका (Protect your Skin from Sun)

बऱ्याचदा शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर डॉक्टर तुम्हाला सकाळच्या कोवळ्या सुर्यकिरणांमध्ये फिरण्याचा सल्ला देतात. मात्र कडक उन्हात फिरण्याने तुमच्या त्वचेचे नुकसानदेखील होऊ शकते. सुर्याची अतिनील किरणं तुमच्या त्वचेला टॅन करतात. यासाठी शक्य असल्यास कडक उन्हात घराबाहेर पडणं टाळा. शिवाय जर तुम्हाला उन्हात घराबाहेर पडणं गरजेचं असेल तर छत्री, स्कार्फ, सनस्क्रीन या गोष्टी जरूर जवळ ठेवा.

9. त्वचेला मॉश्चराईझ करा

दररोज त्वचेला मॉश्चराईझ करणं फआर गरजेचं आहे. कारण असं न केल्यास तुमची त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. अंघोळीनंतर तुमच्या त्वचेला कोरफडाचा गर अथवा  पपईचा गर लावा ज्यामुळे तुमची त्वचा मॉश्चराईझ होईल.

10. भरपूर पाणी प्या

त्वचा हायड्रेट राहण्यासाठी दिवसभरात कमीतकमी आठ ग्लास पाणी प्या. पाणी पिणे लक्षात राहण्यासाठी दर पंधरा मिनीटांचा अलार्म लावा. दर पंधरा मिनीटांनी एक घोट पाणी प्या. ज्यामुळे तुमची त्वचा फ्रेश राहील.

सुंदर त्वचेसाठी आयुर्वेदिक ब्युटी टीप्स – Ayurveda Beauty Tips for Skin

11. एक चमच ऑरेंज पील पावडर घ्या त्यात दोन मोठे चमचे दही मिक्स करा. एका फेसपॅक ब्रशच्या मदतीने हा फेसपॅक चेहरा आणि मानेवर लावा. वीस मिनीटांनी चेहरा थंड पाण्याने धुवून टाका. संत्र्याच्या सालींमध्ये व्हिटॅमिन सी असतं ज्यामुळे त्वचा मुळापासून स्वच्छ होते. चेहऱ्यामधील अतिरिक्त तेल कमी झाल्यामुळे पिंपल्सची समस्या कमी होते. तुम्ही हा पॅक तयार करण्यासाठी संत्र्याच्या साली सुकवून त्याची पावडर करून ठेऊ शकता.

12. बदामामुळे तुमचे आरोग्य आणि मेंदू मजबूत होतेच शिवाय बदामामुळे तुमचे सौंदर्यही खुलते. यासाठी बदाम, मध आणि दूध यांची पेस्ट तयार करा. अंघोळीपूर्वी काही मिनीटे हे मिश्रण तुमच्या त्वचेवर लावा आणि अंघोळ करा. यामुळे तुमची त्वचा मऊ आणि मुलायम दिसू लागेल.

13. बेसणामध्ये गुलाबपाणी मिसळून एक पेस्ट तयार करा. हे मिश्रण त्वचेचं सन टॅन काढण्यासाठी फारच उपयुक्त आहे. नियमित हे मिश्रण लावून अंघोळ केल्यामुळे तुमचे सन टॅन कमी होऊ लागेल. हे मिश्रण अंगाला लावून कमीत कमी 20 मिनीटांनी कोमट पाण्याने स्नान करा.

14. त्वचेच्या कोणत्याही समस्येसाठी कडूलिंबाची पाने गुणकारी ठरतात. कडूलिंबाच्या पानांमुळे तुमच्या त्वचेवर नैसर्गिक उजळपणा येतो. कारण यात अॅंटी-बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. यासाठी कडूलिंबाच्या पानांची पावडर आणि गुलाबाच्या पाकळ्या लिंबाच्या  रसात मिसळून त्याचा एक फेसपॅक तयार करा. या फेसपॅकला त्वचेवर लावून काही मिनीटानी चेहरा धुवून टाका.

15. कोरफडाचा रस काढून त्याची एक चांगली पेस्ट तयार करा. चेहऱ्यावर ही पेस्ट लावून दहा ते पंधरा मिनीटांनी चेहरा स्वच्छ करा. कोरफडामुळे तुमच्या त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी होते. ज्यामुळे त्वचा नितळ आणि फ्रेश दिसू लागेल.

16. आयुर्वेदिक शास्त्रानुसार दररोज रात्री नाभीत तिळाच्या तेलाचे काही थेंब टाकण्याचे चागंले फायदे आरोग्यावर होतात. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने अंघोळ करा. झोपताना तिळाच्या तेलाचे चार थेंब नाभीत टाकून झोपी जा. असे कमीत कमी चाळीस दिवस केल्यास तुमचे आरोग्य आणि त्वचा निरोगी राहण्यास मदत होईल.

17. आवळा हे एक आयुर्वेदिक औषधच आहे. नियमित आवळ्याचे सेवन केल्यास तुमची त्वचा निरोगी राहते. चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या असतील तर कमीत कमी दोन महिने आवळ्याचा मुंरबा खा. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होऊ लागतील.

18. चण्याचे पीठ सौंदर्य उपचारांसाठी फआरच  उपयुक्त आहे. बेसणात एक ते दोन चमचे बदामाचे तेल टाकून त्याचे उटणे तयार करा. हे उटणं  एखाद्या स्क्रबप्रमाणे अंगाला लावून हळूवार हाताने अंगाला मालिश करा. नियमित असे केल्यामुळे तुमची त्वचा नितळ आणि मुलायम होईल.

19. दोन चमचे चंदन पावडरमध्ये एक पाव चमचा हळद मिसळा. गुलाबपाणी अथवा पाणी टाकून एक फेसपॅक तयार करा. हा फेसपॅक चेहरा आणि मानेला लावा. दहा ते पंधरा मिनीटांनी थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून टाका.

20. एक चमचा मिल्क पावडर एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा बदामाचे तेल एकत्र करून चेहऱ्यावर लावा. पंधरा ते वीस मिनीटांनी चेहरा थंड पाण्याने धुवून टाका. आठवड्यातून कमीत कमी तीन वेळा हा फेसपॅक लावल्यामुळे तुमची त्वचा चमकदार दिसेल. कारण त्वचेवर मिल्क पावडचे अनेक चांगले फायदे होतात.

बेस्ट आयुर्वेदिक प्रॉडक्टस – Best Ayurvedic Beauty Products

आपली त्वचा नाजुक आणि कोमल असते. म्हणूनच त्याची अधिक काळजी घेणे गरजेचे असते . केमिकलयुक्त उत्पादनांमुळे तुमच्या मऊ आणि मुलायम त्वचेचं नुकसान होऊ शकतं. बाजारात अनेक आयुर्वेदिक उत्पादने असतात. जी तुमच्या त्वचेचं योग्य रक्षण आणि पोषण करतात. म्हणूनच आम्ही तुम्हाला काही आयुर्वेदिक उत्पादने सूचवत आहोत. जे तुमच्या नाजूक त्वचेसाठी नक्कीच उपयोगी ठरतील.

1.पतंजली सौंदर्या फेस वॉश (Patanjali Saundarya Face Wash)

पतंजलीचे हे फेस वॉश चार नैसर्गिक घटकांपासून तयार करण्यात आलेले आहे. यात कोरफड, संत्र, कडूलिंब, तुळस हे घटक उपलब्ध आहेत. कोरफडामुळे तुमची त्वचा निरोगी राहते, संत्रे तुमच्या त्वचेला फ्रेश आणि तरूण ठेवतं. कडूलिंब आणि तुळस चेहऱ्यावरील डाग आणि पिम्पल्स कमी करतं. शिवाय या फेसवॉशच्या वापरामुळे तुमची त्वचा कोरडी होत नाही.

2. पतंजली सौंदर्या  मुलतानी माती फेस स्क्रब  (Patanjali Saundarya Multani Mitti Face Scrub)

सौंदर्य खुलविण्यासाठी प्राचीन काळापासून मुलतानी मातीचा वापर केला जात आहे. या फेस स्क्रबमुळे तुमच्या त्वचेवरील डेड स्किन निघून जाते. त्वचा मऊ आणि मुलायम करण्यासाठी हे स्क्रब फारच उत्तम आहे. या स्क्रबमुळे तुमच्या चेहऱ्यावरील ब्लॅक हेड्सदेखील आपोआप कमी होतात.

3. लोटस हर्बल लेमनप्युअर टर्मरिक अॅंड लेमन क्लिझिंग मिल्क  (Lotus Herbals Lemonpure Turmeric and Lemon Cleansing Milk)

लोटस कंपनीचे हे उत्पादन आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स कमी करण्यासाठी तुम्ही ते नक्कीच वापरू शकता. चेहऱ्यावरील मेकअप काढण्यासाठी देखील हे उत्पादन अगदी उपयुक्त आहे.

4. पतंजली नीम अॅलोव्हिरा कुकुम्बर फेस पॅक  (Neem Aloe Vera with Cucumber Face Pack)

कडूलिंब, तुळस आणि काकडी या घटकांपासून तयार केलेला हा फेसपॅक तुमच्या चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढण्यास मदत करतो. या पॅकमुळे तुमच्या चेहऱ्यावरील डाग आणि प्लॅकहेडस् कमी होण्यास मदत होते. यातील अॅंटी बॅक्टेरिअल गुणधर्मांमुळे चेहऱ्यावरील ओपन पोर्स बंद होतात.  आठवड्यातून एकदा या फेसपॅकला लावा आणि त्वचेतील फरक बघा.आम्ही दिलेले हे आयुर्वेदिक उपाय तुम्हाला कसे वाटले आणि त्यामुळे तुम्हाला काय परिणाम दिसून आला हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा.

नितळ त्वचा हवी असेल तर असा करा हळदीचा वापर

त्वचेची अशी काळजी घ्याल तर तुमची त्वचा ही राहील छान (Skin Care Tips In Marathi)

चेहऱ्यावर ग्लो हवाय? या आयुर्वेदिक टीप्स करतील तुम्हाला मदत (Ayurvedic Skin Care In Marathi)

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक

Read More From Ayurveda