DIY फॅशन

बूटांची स्टाईल करुन दिसा हटके.. तुम्ही ट्राय केलेत का हे प्रकार (Types Of Boots For Women)

Leenal Gawade  |  Nov 21, 2019
बूटांची स्टाईल करुन दिसा हटके.. तुम्ही ट्राय केलेत का हे प्रकार (Types Of Boots For Women)

फुटवेअरच्या बाबतीत अनेक जण लेटेस्ट फॅशन अगदी हमखास फॉलो करतात. पावसाळा वगळता उन्हाळा आणि हिवाळा शूजची फॅशन करण्यासाठी एकदमच चांगला असतो. त्यातल्या त्यात हिवाळ्यात जरा जाड, मोठे बूट घालण्याची संधी मिळते. भारतातील काही भागात फार थंडी पडत नसली तरी फॅशन म्हणून तुम्ही बाजारात मिळणारे हे बूटांचे प्रकार नक्की ट्राय करायला हवेत .म्हणूनच आज आम्ही तुम्हाला बूटांविषयी सगळी माहिती देणार आहोत. बूटांच्या प्रकारापासून ते त्यांच्या स्टाईलिंग टिप्सपर्यंत जाणून घ्या सर्वकाही

बूटांचे वेगवेगळे प्रकार (Types of Boots for Women In Marathi)

आता तुम्ही बाजारात एक फेरी मारली तरी तुम्हाला बूटांचे सतराशे साठ प्रकार दिसतील. पण प्रामुख्याने काही प्रकार अगदी हमखास मिळतात ते कोणते ते आधी जाणून घेऊया.

1. अँकल बूट्स (Ankle Boots)

Instagram

बूट्सचा हा प्रकार अगदी सगळीकडेच मिळतो. अँकल बुट्स हे तुमच्या पायाच्या घोटापर्यंत येतात. त्यामुळेच त्यांना अँकल बुट्स असे म्हटले जाते. या प्रकाराचे बूट्स तुम्हाला अगदी कधीही घालता येतात. हे बूट्स तुम्हाला अगदी कोणत्याही फॅशन स्ट्रिटवर किंवा दुकानात उपलब्ध होतात. 

2. हाय नी बूट्स (High Knee Boots)

Instagram

आता अँकल बूट्सप्रमाणेच या बुटाचाही अर्थ अगदी शब्दश: घेण्यासारखा आहे.  बूटाचा हा प्रकार तुमच्या गुडघ्यापर्यंत येणारा असतो. बूटांचा हा प्रकार भारतात फारसा घातला जात नाही. कारण आपल्याकडे इतकी थंडी नसते. परदेशात विशेषत: अमेरिकेत अशा प्रकारच्या बूटांची फारच क्रेझ आहे. हे बूट लांब असल्यामुळे त्याला एका बाजूने चेन दिली जाते. त्यामुळे ते घातल्यानंतर ते बंद करण्यासाठी तुम्ही चेन लावू शकता.

3. बाईकर बूट्स (Biker Boots)

Instagram

जर तुम्ही बायकर असाल तर मात्र तुम्हाला हे बूट्स अगदी हमखास माहीत हवेत. कारण जे बाईक चालवतात त्यांना बाईकसाठी सुरक्षित असे बूट्स हवे असतात. इतर कोणत्याही बूट्सच्या तुलनेत हे बूट्स थोडे मजबूत आणि जाड असतात. यांचे काम तुमच्या पायांची काळजी करणे असे असते. त्यामुळे यांचे सोल जाड असतात. तुम्ही वापरत असलेल्या इतर कोणत्याही स्टाईलिश बूट्ससारखे ते नाजूक नसतात.

4. काफ बूट्स (Calf Boots)

Instagram

आता ज्याप्रमाणे नी लेंथ शूज आहेत अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला काफ शूजही मिळू शकतील . काफ शूज हे तुमच्या पोटऱ्यांपर्यत येतात. आता त्यामध्ये तुम्हाला फ्लॅट आणि हिल्स असे प्रकारही मिळू शकतात. हे बूट घालताना तुम्हाला काही ठराविक कपड्यांवरच घालता येतात. 

वाचा – यंदा हिवाळ्यात नक्की ट्राय करा हे विंटर जॅकेट्स

5. वेज हिल्स बूट्स (Wedge Heel Boots)

Instagram

आता बूट्समध्ये वेगवेगळे प्रकार सांगताना त्यामध्ये हिल्सचाही पर्याय तुम्हाला असतो. आता हिल्समध्ये असलेले वेज हिल्स हा प्रकार अनेकांना आवडणारा आहे. कारण यामध्ये चालणे फारच सोपे असते. स्टायलिश असे हे शूज तुम्हाला जीन्स, स्कर्ट किंवा ड्रेसवर घालता येतात. त्यामुळे जर तुम्हाला स्टाईलिंगसाठी शूज हवे असतील तर तुम्ही असे बूट घेऊ शकत.

6. रायडिंग बूट्स (Riding Boots)

Instagram

बाईकर बुट्सप्रमाणेच थोडेसे राऊडी असे हे रायडींग बूट्स असतात. तुम्ही जर अॅडव्हेंचर करणारे  असाल तर तुम्हाला अशा प्रकारच्या बूट्सची गरज असते. हे बुट्स थोडे टफ असतात. तुम्हाला इतरवेळी ते घालता येणार नाही. पण तुमच्या अॅडव्हेंचर टूरसाठी तुमच्याकडे अशा प्रकारचे शूज नक्की हवेत.

7. चेल्सी बूट्स (Chelsea Boots)

Instagram

बूटांचा हा प्रकारही तुम्ही पाहिला असेल यात आणि अँकल लेंथ बूट्समध्ये फार काही फरक नाही. लेदर मटेरिअलमध्ये तुम्हाला हे बूट्स मिळू शकतात चेल्सी बूट्स घालणे सोपे असते कारण यामध्ये इलास्टिक असते. हे बूट्स थोडे वरच्या बाजूल सैल असतात. कापण आणि लेदर अशा दोन्ही मटेरिअलमध्ये हे शूज मिळतात.

अशाप्रकारे करता येईल बूटांची स्टाईल (Styling Tips for Boots)

आता तुम्ही वरील बूटांच्या प्रकारापैकी काही बूट घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही अशा प्रकारे स्टाईलिंग करु शकता. तुमच्यासाठी या स्टाईलिंग टिप्स

Instagram

पार्टीसाठी बूट्स घालण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला तुमच्या शॉर्ट ड्रेसवर अशा पद्धतीने हाय नी शूज घालता येतील. आता तुम्ही लेदर की कापडाचे बूट्स हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही निवडा. पण जर तुमचा स्कर्ट शॉर्ट असेल तर तुम्हाला थोडे लूझ बूट्स चालू शकतात. मग तुम्ही हिल्स किंवा असा पर्याय निवडू शकता.

Instagram

जर तुम्ही स्कर्ट आणि ब्लाऊज असे कपडे घालणार असाल तरी देखील तुम्हाला बूट्स घालता येतील. जर तुम्ही थोडा फ्लेरी आणि मोठा स्कर्ट घातला असेल तर असा लुकही चांगला दिसतो. पण तुम्हाला या बुट्समध्ये थोडे हिल्स निवडता आले तर फारच उत्तम

Instagram

जर तुम्ही अँकल लेंथ बूट घालणार असाल तर तुम्हाला अशा पद्धतीने त्याची स्टायलिंग करता येईल. स्कर्ट, मॅक्सी ड्रेस किंवा पँट या सगळ्यावर तुम्हाला अँकल लेंथ बूट घालता येऊ शकतात. 

Instagram

जर तुम्ही तुमच्या फॉर्मल वेअरवर बूट्स घालण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अशा प्रकारे काहीतरी नक्की ट्राय करता येऊ शकते. या बूटांमुळे तुमची पर्सनॅलिटी खुलून दिसेल.

Instagram

पार्टीवेअरसाठी तुम्ही काही सेक्सी बूट घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अशा प्रकारच्या प्रिंटचे बूट घ्यायला हरकत नाही कारण असे बूट सगळ्यांचेच लक्ष वेधून घेईल.

Instagram

तुम्ही खरेदी करु शकता हे बुट्स (Best Boots for Women)

आता तुम्हाला ही बूट्स खरेदी करण्याची इच्छा झाली असेल तर तुम्ही या पैकी काही बूट्स नक्कीच खरेदी करु शकता हे तुमच्या बजेटमध्ये येणारे बूट्स आहेत.

1. Leather Design Stylish Look Boots Shoes Boots For Women

जर तुम्हाला लेस प्रकारामध्ये बूट आवडत असतील तर तुम्ही स्वस्तात मस्त असा हा बूटचा प्रकार निवडू शकता. हे बूट तुम्हाला स्कर्ट, जीन्स कशावरही घालता येतील

वाचा – गरोदरपणात म्हणून वापरायला हवेत ‘प्रेग्नंसी गाऊन’

2. Motorcycle Boots Women Cool Goth Punk AnkleMilitary Lace-up Black

आपण वर स्पोर्टस बूट्सचा प्रकार पाहिला त्यापैकीच हे एक आहेत आता स्टायलिंगचे म्हणाल तर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार याची स्टाईलिंग करता येईल. 

3. Black Boots For Women

हाय नी लेंथचे बूट्स दिसायला फारच सुंदर असतात त्यामुळे तुम्ही हा प्रकारही वापरुन पाहायला काहीच हरकत नाही. या बूट्सची विशेष काळजी तुम्हाला घ्यावी लागते.

4. Ankle Boots

लेदरमधील अँकल बूट्सचा प्रकार थोडा ट्रेंडी आहे. तुम्हाला एखाद्याला पार्टीला हे बूट्स अगदी हमखास वापरता येतील.

5. Pink Heel Boots

जर तुम्ही हिल्समध्ये काही शोधत असाल तर तुम्हाला अशाप्रकारचे बूट घेता येतील. हे तुम्हाला पार्टी ड्रेसवर घालायला नक्कीच चांगले दिसतील

6. Panelled Boots with Tie-up & Embellishments

जर तुम्हाला फार स्टीफ बूट्स नको असतील तर तुम्ही हा प्रकारही नक्की ट्राय करुन पाहू शकता. कारण याचा त्रास तुम्हाला होणार नाही.

वाचा – उंची कमी असली तरी तुम्ही घालू शकता ‘मॅक्सी’ ड्रेस, वाचा टीप्स

7. Textured Ankle-Length Boots

 जर तुम्हाला अँकल बूट्समध्ये काही व्हरायटी हवी असेल तर तुम्ही हे सुद्धा ट्राय करु शकता. कारण हे शूज तुम्हाला चांगले दिसतात.

8. Hush Puppies Women’s Boots

बाईकर स्टाईलमध्ये असलेले हे बूट्स तुम्हाला छान रस्टी लुक देऊ शकतील. तुम्ही अशाप्रकारचे बूट्स नक्कीच निवडू शकता. 

9. Deeanne London High Neck Beautiful Boots

तुम्हाला जर काही वेगळा रंग ट्राय करायचं असेल तर तुम्ही हा रंग नक्की ट्राय करु शकता. हा प्रकार थोडा सैल असल्यामुळे तो चांगला दिसू शकतो.

10. Deeanne London Women’s Laces Boots

स्पोर्टस लुक देणारा हा आणखी एक प्रकार तुम्ही नक्की ट्राय करायला हवा. तुम्हाला कॅज्युअल किंवा इतर कोणत्याही वेअरवर काय घालू असा प्रश्न पडला असेल तर तुम्ही हे नक्की ट्राय करायला हवे.

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQs)

1. बूट आणि शूजमध्ये काय फरक आहे?

बूट हे तुमच्या गुडघ्यापर्यंत सुद्धा येणारे असतात. यामध्ये कव्हरेज जास्त असतो. तर शूजचे उद्दिष्ट हे तुमचा फक्त पाय कव्हर करणे असा असतो. त्यामुळे बूट आणि शूजमध्ये फरक असतो.

2. बूट्स पार्टीमध्ये घालता येतात का?

Instagram

हो, आरामात तुम्हाला लेदर आणि हिल्समधील प्रकार पार्टी ड्रेसवर चांगले दिसतात. त्यामुळे तुम्ही बूट्स घालायला काहीच हरकत नाही. लेदर मटेरिअलमधील चकचकीत शूज नक्कीच तुमच्या पार्टीसाठी बेस्ट ऑप्शन आहे.

3. बूटांची काळजी कशी घ्यावी ?

लेदर किंवा कपड्याचे कोणतेही बूट असो तुम्हाला त्यांची काळजी घेणे फारच गरजेचे असते.  लेदर शूज तुम्ही कसेही ठेवून चालत नाही. त्यांच्यावर घडी आली की, ते लवकर खराब होण्याची शक्यता असते. जर लेदर फारच मऊ असेल तर तुम्हाला तर त्याची अधिक काळजी घ्यावी लागते आणि कापडाचे बूट असतील तर तुम्हाला त्यासाठी विशेष डिटर्जंट वापरुन त्याची स्वच्छता करावी लागेल.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच  POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty  लिंकवर क्लिक करा. 

Read More From DIY फॅशन