लाईफस्टाईल

Lockdown च्या काळातील अनोखी लॉकआऊट कोरोना स्पर्धा

Aaditi Datar  |  Mar 29, 2020
Lockdown च्या काळातील अनोखी लॉकआऊट कोरोना स्पर्धा

गरज ही शोधाची जननी असते. सध्या संपूर्ण देश लॉकडाऊन असताना बाहेर न पडता लोकसहभागातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा पर्याय मिळणं तसं कठीणच, पण ही गरज भासताच एक शोध लागला. “लॉक आउट कोरोना स्पर्धा” हे त्या शोधाचं नाव. घरात बसून फावल्या वेळात सहभागी होता येणारी ही ऑनलाईन स्पर्धा आहे. सध्या अ्नेकांपुढे वेळ कसा घालवायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, या प्रश्नाला समर्पक असं उत्तर नाशिकच्या काही तरुणांनी दिलयं. अर्थात घरात बसूनच या स्पर्धेत तुम्हाला भाग घ्यायचा आहे. कारण सध्या कोरोना रोखण्यासाठी सगळ्यांनाच आपापल्या परीने प्रयत्न करायचेत, पण घरातून बाहेर नं पडता. अश्या परिस्थितीत जनजागृती करणारी आणि सगळ्यांना घरात राहण्यासाठी प्रोत्साहित करणारी ही स्पर्धा योजण्यात आली आहे.

नेमकी काय आहे ही स्पर्धा?

स्पर्धेला खरंतर सुरूवात झाली आहे. तब्बल 3 आठवड्यात पार पडणारी ही स्पर्धा आहे. ज्यामध्ये 3 प्रकार करण्यात आले आहेत. पहिली स्पर्धा आहे ती घोषणांची, सर्व स्पर्धक या स्पर्धेत कोरोनाबद्दल जनजागृती करणाऱ्या घोषणा बनवून पाठवतील. या सर्व घोषणाा सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्याकरिता वापरण्यात येतील ते देखील लेखकांच्या नावानिशी. सर्वोत्कृष्ट घोषणेला प्रथम पारितोषिक रु 5000 असे देण्यात येईल. दुसरी स्पर्धा आहे मीम्स बनवण्याची. सध्या सोशल मीडियावर सगळ्यात चलती आणि गमतीशीर भाग असलेले मीम आता कोरोनाबद्दल जनजागृती करण्याकरिता वापरले जातील. या स्पर्धेत पण विजेत्याला रु 5000 असं पारितोषिक आणि सर्व स्पर्धकांचं मीम नावानिशी शेअर केलं जाईल. तिसरी स्पर्धा आहे बॅनर बनवण्याची, या स्पर्धेत पारितोषिक आणि बाकी सगळं पहिल्या 2 स्पर्धांप्रमाणेच असेल, फरक इतकाच की जनजागृतीसाठी माहितीपत्रक आणि बॅनर स्पर्धक बनवतील.

स्पर्धेच्या माध्यमातून गरजूंना मदतीचा हात

आता यात सामाजिक बांधिलकी फक्त जनजागृतीपर्यंतच मर्यादित नाही तर या स्पर्धेचा पुढचा भाग म्हणजे स्पर्धकांकडून घेण्यात येणारे स्पर्धा शुल्क (मात्र 21 रुपये) हे नाशिकमधील बेघर आणि रोजदारी मजूर यांच्या लॉकडाउन काळातील अन्नधान्यासाठी वापरले जाणार आहे. मानव उत्थान मंच या सेवाभावी संस्थेकरवी हे वाटप होणार आहे.

स्पर्धेचे नियम

स्पर्धेचे तीनच नियम आहेत, तुम्ही पाठवाल ती कलाकृती तुमची स्वतःची असावी, त्यातून कोरोनाबद्दल जनजागृती व्हावी आणि जनजागृतीकरिता वापरली जाणारी कोरोनाबद्दलची माहिती ही योग्य असावी, सोशल मीडियावरून मिळालेली चुकीची माहिती वापरल्यास त्या स्पर्धकाला आणि कलाकृतीला स्पर्धेतून बाद करण्यात येईल आणि त्या कलाकृतीचा वापर जनजागृती करिता केला जाणार नाही.

या स्पर्धेत सहभाग घेण्याबाबत कोणतीही माहिती हवी असल्यास Om_Jyoti या Instagraam हॅन्डलवरती अथवा ०९२२५१ २७२७० या क्रमांकावर संपर्क साधावा. या स्पर्धेकरिता सर्व सोशल मीडियावर वेगळं पेज लवकरच सुरु होईल. मग तुम्हीही या स्पर्धेत सहभाग घ्या आणि घरात जर कंटाळा आला असेल तर काहीतरी क्रिएटीव्ह नक्की करा. तसंच सोबतच सहभाग नोंदवून गरजूंनाही मदतीचा हात द्या.

#Corona च्या निमित्ताने गुगलचं खास डूडल

#Coronavirus चा फटका आता मालिकांच्या चित्रीकरणालाही

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

 

Read More From लाईफस्टाईल