छत्रपती शिवाजी महाराज कोणाला माहीत नाहीत अशी व्यक्ती या भूतलावर मिळणे अशक्यप्राय अशी गोष्ट आहे. शिवाजी महाराजांची महती हे महाराष्ट्रातच नाही तर सबंध जगात पसरलेली आहे. शिवाजी महाराजांच्या अनेक गोष्टी इतिहास रुपात आपण अभ्यासल्या आहेत.त्यांच्याबद्दल अनेकांनी आपले विचार मांडल आहेत. त्यांच्या साहसकथा देखील लिहिल्या आहेत. शिवाजी महाराजांवरील शेर अनेकांना माहीत असतील. पण शिवाजी महाराजांच्या आयुष्याशी निगडीत अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण जाणून घ्यायलाच हव्यात अशा आहेत. जाणून घेऊया शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अशात काही माहीत नसलेल्या गोष्टी
शिवाजी महाराजांचे सार्वभौमत्व
शिवाजी महाराज हे खुल्या विचारसरणीचे होते. जातीभेद, धर्मभेद त्यांना मुळीच मान्य नव्हता. कट्टर हिंदूत्ववादी असूनही त्यांनी कोणत्याही धर्माचा अनादर केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये अनेक मुस्लिम मावळे होते. त्यांनी आजन्म मुस्लिमांविरोधात स्वराज्याची लढाई लढली असेल तरी देखील त्यांनी जातपात, धर्मभेद केला नाही. ते कायम रयतेचा राजा बनून राहिले. शिवाजी महाराजांचे सुविचार हेच त्यांची कयम ओळख बनून राहिले.
शिवाजी महाराजांचे नाव ‘शिवाई’वरुन
शिवाजी महाराज यांचे नाव भगवान शिवावरुन ठेवण्यात आले असे अनेकांना वाटते. कारण संपूर्ण भोसले घराणे हे भगवान शंकराचे भक्त होते. पण त्यांचे नाव हे भगवान शिव यांच्या नावावरुन ठेवलेले नाही तर त्यांचे नाव शिवाई देवीवरुन ठेवण्यात आले आहे.
2,000 सैन्यबळावरुन 10000 सैनिक
शिवाजी महाराज यांची रणणिती ही जाणून घेण्यासारखी आहे. शहाजी महाराज म्हणजे शिवाजी यांचे वडील त्यांच्याकडे 2,000 इतकेच सैन्यबळ होते. पण शिवाजी महाराजांनी स्वकर्तृत्वाने अधिकाअधिक माणसं जोडत आणि त्यांना योग्य प्रशिक्षण देत ही संख्या 10,000 इतकी केली.
आवर्जून वाचावीत छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तके
भारतीय आरमाराचे जनक
शिवाजी महाराजांना भारतीय आरमाराचे जनक असे देखील म्हटले जाते. शिवाजी महाराजांना हे चांगले माहीत होते की, समुद्र हातात असेल तर तेथून हल्ला होणे शक्य नाही. म्हणून ज्या ज्या ठिकाणी इंग्रजांचे, मुघलांचे हल्ले होण्याची शक्यता होती. त्या ठिकाणी त्यांनी सुरक्षेची अधिक काळजी घेतली. त्या काळात कोणाला हे सुचले नाही ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना सुचले म्हणूनच त्यांनी समुद्रात किल्ले अशा पद्धतीने बांधले की, त्यांनी समुद्राकडून येणारा शत्रूचा हल्ला परतवून लावला.
महिलांविषयी अतिशय आदर
महिलांसंदर्भात कोणतीही वाईट गोष्ट शिवाजी महाराजांना मान्य नव्हती. जर महिलांशी कोणी असभ्य वर्तन केले असेल. हल्लीच्या भाषेत बलात्कार किंवा लैगिंक शोषण केले असेल तर अशांना कडक शिक्षा देण्यासाठी ते मुळीच कचरायचे नाही. त्यांच्या या संदर्भातील शिक्षा या फारच गंभीर स्वरुपाच्या होत्या. त्यामुळेच राज्यात महिला या मान उंचावून जगू शकत होत्या.
लहान वयात जिंकले किल्ले
शिवाजी महाराज अंगकाठी किंवा सैन्यबळाने मोठे नसले तरी देखील त्यांची योग्य रणणिती ही त्यांना प्रत्येक वेळी विजय मिळवून देण्यास सक्षम होती. त्यांनी लहान असतानाच बिजापूरच्या सुलतानाला धक्का देत तोरणा हा किल्ला आपल्या नावी केला होता. त्यानंतर कोंडाणा, जावळी असे एक एक करत किल्ले काबीज केले. संपूर्ण कोकण आणि पश्चिम घाट हा आपल्या अख्यतारीत आणला.
या काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहीत असायलाच हव्यात. तरच तुम्हाला शिवाजी महाराजांचे खरे महत्व कळेल.
छत्रपती शिवरायांची किल्लेबांधणी म्हणून होती वाखाणण्यासारखी